मान काळी (Neck Tanning) असण्याचा त्रास प्रत्येक महिलेला सहन करावा लागतो. (Skin Care Tips) याची अनेक कारणं असू शकतात जसं की धूळ, प्रदूषण, त्वचेची देखभाल करण्यात कमतरता या घरगुती उपायांनी तुम्ही त्वचेच्या समस्यांपासून सुटका मिळवू शकता. यातीलच एक प्रभावी उपाय म्हणजे बेसन. त्वचेचा काळेपणा दूर करण्यासाठी तुम्ही बेसनाचा वापर करू शकता. (How To Remove Neck Tanning Using Home Remedies)
बेसन ज्याला चण्याचे पीठ असेही म्हटले जाते. त्वचेसाठी हे एक नॅच्युरल एक्सफोलिएटर आहे. यामुळे स्किन साफ होण्यास मदत होते, त्वचेच्या मृतपेशी निघून जातात, त्वचेचा रंग सुधारण्यास मदत होते. याव्यतिरिक्त यात एंटी इंफ्लेमेटरी आणि एंटी फंगल गुण असतात ते त्वचेला सुरक्षित ठेवतात. (How To Get Rid Of Neck Tanning)
स्किन एण्ड हेअर एकेडमीच्या रिपोर्टनुसार दूध, हळद, बदामाचा फेस पॅक फायदेशीर ठरतो. बदामाची पेस्ट करून ती दुधासोबत मानेला लावल्यास चांगला परिणाम दिसून येईल. काकडीचे काप करून ते मानेला घासल्यास मान उजळ दिसेल. कोमट पाण्यात लिंबाचा रस घालून कापसाच्या साहाय्याने तो रस मानेला लावा. हा रस लावल्यानं मान उजळ दिसेल आणि काळेपणा कमी होईल. दही आणि टोमॅटोचा फेसपॅकसुद्धा तुम्ही मानेवर लावा शकता. हे सर्व घरगुती उपाय मान आणि चेहऱ्याचा काळेपणा काढून टाकतात.
रोजच्या वापरासाठी चांदीच्या पैंजणांच्या नाजूक डिजाईन्स; आकर्षक-सुंदर पैंजणांनी पाय उठून दिसतील
बेसन आणि हळदीचा पॅक
२ चमचे बेसनात १ चुटकी हळद आणि पाणी घालून पेस्ट तयार करा. नंतर ही पेस्ट आपल्या गळ्याला लावा. २० मिनिटं सुकल्या त्यानंतर कोमट पाण्यानं चेहरा धुवून घ्या. ज्यामुळे त्वचा चमकदार राहण्यास मदत होईल.
बेसन आणि दह्याचं मिश्रण
२ चमचे बेसन, २ चमचे दही आणि १ चमचे लिंबाचा रस एका भांड्यात व्यवस्थित मिसळा. हे मिश्रण आपल्या गळ्यावर लावा आणि ३० मिनिटं तसंच ठेवा. नंतर कोमट पाण्यानं धुवून घ्या. दह्यातील लॅक्टिक एसिड त्वचेचा रंग सुधारण्यास मदत करते.
नवरात्र: ९ दिवस उपवास करताय तर लक्षात ठेवा ५ नियम, पित्त होऊन तब्येत बिघडणार नाही
सगळ्यात आधी २ चमचे बेसन, १ चमचे मोहोरीचे तेल आणि १ चुटकी मीठ घालून एक पेस्ट तयार करा. नंतर गळ्यावर लावून हलक्या हातानं मसाज करा. नंतर १५ ते २० मिनिटांनी धुवून टाका. हा उपाय केल्यास त्वचेचं मॉईश्चर टिकून राहण्यास मदत होईल.