Join us  

तेलकट त्वचेमुळे चेहरा काळा दिसतो? होमिओपेथी डॉक्टर सांगतात १ उपाय, टॅनिंग निघेल

By ऑनलाइन लोकमत | Published: October 11, 2024 11:14 AM

How To Remove Oil From Skin With Multani Mitti : डॉ. गोयल यांनी आपला होमिओपेथी उपाय सांगत मुल्तानी मातीचे फायदेसुद्धा सांगितले आहेत.

चेहऱ्यावर वेगवेगळ्या क्रिम्स लावल्यानंतरही दर ५ मिनिटाला चेहरा तेलकट होतो. अशा स्थितीत महागड्या ब्युटी  प्रोडक्टचा वापर करूनही हवा तसा ग्लो मिळत नाही. चेहऱ्यावर काही लावा किंवा नका लावू चेहऱ्यावर तेल खूप येतं अशी अनेकांची तक्रार असते. होमिओपेथी डॉक्टर राजू राम गोयल यांनी एक उपाय सांगितला आहे. ज्याचा वापर चेहऱ्यावर करून तुम्ही चेहऱ्यावर साचलेलं एक्स्ट्रा तेल काढून टाकू शकता आणि चेहऱ्यावर कमालीचा ग्लो येईल. (How To Remove Oil From Skin With Multani Mitti  Face Pack By Homeopathy Doctor Raju Ram Goyal)

त्वचा तेलकट होऊ नये यासाठी ..

डॉक्टर  राजू यांनी इंस्टाग्रामवर एक उपाय सांगितला आहे की तेलकट स्किन असल्यास चेहऱ्यावर भरपूर तेल जमा होतं. अशावेळी क्रिमी उत्पादनांचा वापर करण्यापासून बचाव करायला हवा. डॉक्टरांनी मुल्तानी माती फायदेशीर असल्याचं सांगितलं आहे. हा फेस पॅक करण्याची रेसिपीसुद्धा शेअर केली आहे. हा उपाय करण्याासाठी तुम्हाला १ चमचा मुल्तानी माती, १ चमचा दही, १ चमचा बेसन हे साहित्य लागेल.

हा पॅक तयार करण्यसाठी  १ चमचा मुल्तानी माती, दही आणि बेसन घालून व्यवस्थित मिक्स करा. नंतर हा पॅक आपल्या चेहऱ्याला लावून ठेवा ३० मिनिटं सुकू द्या. त्यानंतर चेहरा स्वच्छ पाण्यानं धुवून घ्या. नंतर चेहऱ्यावरचं तेल कमी झालेलं दिसेल आणि त्वचेवर ग्लोसुद्धा येईल. या फेस पॅकमुळे त्वचेचं संपूर्ण तेल निघून जाईल आणि एक्ने वाढण्यापासून रोखता येईल.

डॉ. गोयल यांनी आपला होमिओपेथी उपाय सांगत मुल्तानी मातीचे फायदेसुद्धा सांगितले आहेत. त्यांनी सांगितले  या मातीत तेल शोषून घेण्याचे गुण असतात.  ज्यामुळे एक्नेची समस्या टाळता येते. स्किन पोर्स साफ होतात याशिवाय मुल्तानी माती चेहऱ्यावर ग्लो आणते आणि  डाग कमी करण्यास मदत  करते.

टॅग्स :ब्यूटी टिप्सत्वचेची काळजी