त्वचेसंबंधित समस्यामध्ये पिंपल्स येणं, काळे डाग, मुरूम, खाज येणं असे त्रास प्रत्येक महिलेला होतात. चेहऱ्यावरचे ओपन पोर्स म्हणजे मोठे खड्डे असतात. (Skin Problems Solution) जे नाक आणि घश्यावर दिसून येतात. (Skin Care Tips) या ओपन पोर्समुळे (Open Pores) अनेकदा त्वचेचं सौंदर्य हरवते आणि त्वचेचं टेक्सचरही बिघडते. ओपन पोर्सची समस्या जेनेटिक्स, एजिंग आणि तेलकट त्वचेमुळे उद्भवते. ओपन पोर्स कमी करण्यासाठी काही घरगुती उपायदेखील करू शकता. हे उपाय केल्यानं चेहरा क्लिअर होईल आणि त्वचेच्या इतर समस्याही उद्भवणार नाहीत. (How To Get Rid Of Open Pores)
होमिओपेथी डॉक्टर राजेंद्र गोयल सागंतात की कॅलेनडुला या क्रिमचा आपल्या चेहऱ्यावर वापर करू शकता. ही एंटीसेप्टीक आणि हिलिंग, एक्ने क्रिम आहे. यामुळे त्वचेवर होणारं इरिटेशन कमी होण्यास मदत होते. कॅलेनडोसा क्रिममुले सन प्रोटेक्शन होण्यास मदत होते. २०१२ च्या एका अभ्यासानुसार कॅलेनडुला तेलात एसपीएम प्रॉप्रटीज असतात (Ref). सनस्क्रीनप्रमाणे वापरली जाते. यामुळे स्किन कॅन्सर होण्याची शक्यताही कमी होते. एक्ने रोखण्यासाठी ही कॅलेनडुला तेलाचा वापर केला जातो. एका प्रयोगशाळेतील अभ्यासात दिसून आले की कॅलेनडुलाचा अर्क मुरूमांवर उपचार आणि प्रतिबंब म्हणून उपयुक्त ठरतो. या निष्कर्षांना समर्थन देण्यासाठी अधिक संशोधन करणं बाकी आहे.
ओपन पोर्स कमी करण्यासाठी घरगुती उपाय (Home Remedies For Open Pores)
१) एका वाटीत १ चमचा हळद आणि १ चमचा गुलाबपाणी मिसळून पेस्ट तयार करा. ही पेस्ट ओपन पोर्स असलेल्या भागात १५ मिनिटांसाठी लावून ठेवा त्यानंतर चेहरा स्वच्छ पाण्याने धुवा. ओपन पोर्स कमी करण्यासाठी तुम्ही आठवड्यातून १ ते २ वेळा घरगुती उपाय करू शकता.
कोण म्हणतं बारीक होण्यसााठी चपाती सोडा? ५ गोष्टी करा, वजन आपोआप होईल कमी-मेंटेन राहाल
२) ताजं एलोवेरा जेल नियमित चेहऱ्याला लावल्याने ओपन पोर्स कमी होतात. यासाठी ताज्या एलोवेराची पानं काढून फ्रिजमध्ये एक तासासाठी तसंच ठेवून द्या. नंतर चेहऱ्याला १० ते मिनिटं लावून ठेवा मग थंड पाण्याने चेहरा धुवून घ्या. रात्रीच्यावेळी चेहऱ्याला एलोवेरा जेल लावूनसुद्धा तुम्ही झोपू शकता.
दातांवर पिवळा थर-आत कीड लागली? १ चिमूट हळदीत 'हा' पदार्थ मिसळून दातांना लावा, पांढरेशुभ्र होतील दात
३) त्वचेला एक्सफोलिएट केल्यानंही ओपन पोर्स कमी होता. एका कपात चमचाभर ब्राऊन शुगर घ्या त्यात एक चमचा लिंबाचा रस आणि एक चमचा मध मिसळा हे तयार शुगर स्क्रब ओपन पोर्सवर लावून बोटांच्या मदतीने २ मिनिटं चोळून धुवून टाका. आठवड्यातून एकदा हा उपाय केल्यास चांगला परिणाम दिसून येईल.