Join us  

पिगमेंटेशन, ब्लॅकहेड्स, व्हाईटहेड्स वाढले? खोबऱ्याचा करा खास वापर- चेहरा होईल स्वच्छ- नितळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 05, 2024 3:29 PM

How To Get Rid Of Pigmentation, Blackheads, Whiteheads: त्वचेवर पिगमेंटेशन, ब्लॅकहेड्स, व्हाईटहेड्सचे प्रमाण वाढले असेल तर हा एक सोपा घरगुती उपाय करून पाहा...(use of dry coconut face pack for skin)

ठळक मुद्देतुमचीही त्वचा अशाच पद्धतीची झाली असेल तर त्यासाठी स्वयंपाक घरातलं थोडंसं खोबरं घेऊन हा एक सोपा उपाय करून पाहा..

हल्ली प्रत्येक जण आपापल्या कामामध्ये एवढा जास्त अडकून गेला आहे की स्वत:कडे लक्ष देण्यासाठी पुरेसा वेळच मिळत नाही. त्यातही स्वत:ची त्वचा, केस यांच्याकडे तर मुळीच पाहाणं होत नाही. त्यातच आपल्या त्वचेला नेहमीच ऊन, प्रदुषण, धूळ यांचा सामना करावा लागतो. आहारातूनही सगळे पोषक पदार्थ मिळतीलच असे नाही. त्यामुळे मग हळूहळू या सगळ्या गोष्टींचा परिणाम आपल्या त्वचेवर होऊ लागतो आणि मग त्वचेवर पिगमेंटेशन, ब्लॅकहेड्स, व्हाईटहेड्स वाढलेले दिसतात (How to remove pigmentation, blackheads, whiteheads from skin). तुमचीही त्वचा अशाच पद्धतीची झाली असेल तर त्यासाठी स्वयंपाक घरातलं थोडंसं खोबरं घेऊन हा एक सोपा उपाय करून पाहा...(use of dry coconut facepack for skin)

 

स्वच्छ, नितळ त्वचेसाठी खोबऱ्याचा फेसपॅक

आपल्याला माहितीच आहे आणि बऱ्यांच अभ्यासांमधूनही हे सिद्ध झालं आहे की खोबऱ्याचं तेल हे त्वचा नितळ, चमकदार ठेवण्यास मदत करतं.

कमी वयातच चेहरा वयस्कर दिसतो-वजनही वाढलं? प्या केशराचं पाणी, बघा ५ जबरदस्त फायदे

त्याच्यामध्ये असणाऱ्या ॲण्टीबॅक्टेरियल आणि ॲण्टीफंगल गुणधर्म त्वचेचे संरक्षण करतात. तसेच खोबरेल तेलाचा त्वचेसाठी नियमितपणे वापर केल्यास त्वचा छान माॅईश्चराईज, हायड्रेटेड राहाते आणि त्यामुळे एजिंग प्रोसेस बरीच हळूवार होते. म्हणूनच आता खोबरेल तेलाऐवजी खोबऱ्याचाच वापर त्वचेचं सौंदर्य खुलविण्यासाठी कसा करायचा ते पाहूया... 

 

पिगमेंटेशन, ब्लॅकहेड्स, व्हाईटहेड्स काढण्यासाठी खोबऱ्याचा फेसपॅक

त्वचेवरचे काळे डाग तसेच ब्लॅकहेड्स, पिंपल्स, व्हाईटहेड्स असं सगळं कमी करून त्वचा नितळ, चमकदार होण्यासाठी खोबऱ्याचा कसा वापर करावा, याविषयीची माहिती merishrushti या इन्स्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आली आहे. यासाठी आपल्याला एका वाटीमध्ये खोबऱ्याचा कीस घ्यायचा आहे.

श्रावणी सोमवार विशेष- उपवासामुळे ॲसिडीटी वाढते? ३ गोष्टी करा- उपवासाचा त्रास मुळीच होणार नाही 

त्यामध्ये दही किंवा योगर्ट टाका आणि ते सगळं व्यवस्थित हलवून घ्या. आता हा लेप तुमच्या चेहऱ्यावर लावा आणि चेहऱ्याला ५ ते १० मिनिटे हलक्या हाताने मसाज करा. जर चेहऱ्यावर पिंपल्स असतील तर मसाज करू नये. यानंतर तो लेप जेव्हा सुकेल तेव्हा चेहरा धुवून घ्या. हा उपाय केल्यामुळे डेडस्किन निघून जाईल तसेच टॅनिंग कमी होण्यासही मदत होईल. 

 

टॅग्स :ब्यूटी टिप्सत्वचेची काळजीहोम रेमेडी