पिग्मेंटेशन (Pigmentation) एक अशी समस्या आहे ज्यामुळे तुमच्या त्वचेची सुंदरता कमी होऊ शकते. दीर्घकाळ उन्हात राहणं, हॉर्मोनल बदल, एज स्पॉट्स आणि इतर कारणांमुळे पिग्मेंटेशनची समस्या उद्भवतात. बाजारात त्वचेचं पिग्मेंटेशन दूर करण्यासाठी अनेक क्रिम्स आणि उत्पादनं उपलब्ध आहेत. (Home Remedies for Hyper Pigmentation) पण या सगळ्यावर होम रिमेडिजपेक्षा दुसरा कोणताच चांगला उपाय नाही. हे पॉकेट फ्रेडली असते आणि दुसरं म्हणजे यामुळे कोणत्याही प्रकारचं नुकसान होण्याचा धोका नसतो. (Effective ways to use potato for skin pigmentation)
बटाटा आपल्या सर्वांच्याच घरी वापरला जातो. बटाट्याचा वापर करून तुम्ही त्वचेच्या अनेक समस्या कमी करू शकता. यात नॅच्युरली ब्लिचिंग एजंट असतात जे डार्क स्पॉट्स आणि स्किन पिग्मेंटेनश कमी करतात. बटाटा तुम्ही वेगवेगळ्या प्रकारे त्वचेवर वापरू शकता. पिग्मेंटेशन दूर करण्यासाठी बटाट्याचा रस वापरणं हा उत्तम पर्याय आहे. (Get Rid Off Pigmentation with Potato)
यासाठी सगळ्यात आधी बटाटा किसून घ्या. त्यानंतर बटाट्याचा रस काढा. आता हा रस स्वच्छ कापसाच्या बोळ्याच्या मदतीनं त्वचेवर लावा आणि १५ - २० मिनिटांसाठी तसेच सोडा. हा रस काढण्यासाठी तुम्हाला जास्त मेहनत करावी लागणार नाही. एक बटाटा धुवून गोल तुकड्यांमध्ये कापा. आता बटाट्याचे स्लाईस त्वचेवर रब करा. जवळपास १० ते १५ मिनिटांसाठी तसंच राहू द्या. त्यानंतर पाण्याने चेहरा धुवा.
बटाटा आणि काकडी
जर तुमची त्वचा सेंसेटिव्ह असेल तर तुम्ही बटाट्याबरोबर त्यात काकडीसुद्धा घालू शकता. यामुळे त्वचेला गारवा मिळतो. एक बटाटा आणि अर्धी काकडी घेऊन धुवून सालं काढून घ्या. नंतर हे दोन्ही पदार्थ ब्लेंड करून एक स्मूथ पेस्ट तयार करा आणि त्वचेवर लावा नंतर चेहरा स्वच्छ धुवा.
बटाटा आणि एलोवेरा
पिग्मेंटेशन दूर करण्याबरोबरच तुम्हाला ग्लोईंग चेहरा हवा असेल तर बटाटा आणि एलोवेरा जेलचा वापर करू शकता. यामुळे फक्त पिग्मेंटेशन दूर होत नाही तर स्किन हायड्रेट राहते. यामुळे तुम्ही २ चमचा एलोवेरा जेल आणि एक बटाटा ब्लेंड करून एक स्मूथ पेस्ट बनवा. ही पेस्ट त्वचेला लावा आणि २० मिनिटांसाठी तसेच सोडा. शेवटी स्वच्छ पाण्यानं चेहरा धुवा.
बटाटा आणि दूध
बटाटा आणि दूधाचा वापर स्किन एक्सफोलिएट करण्यासाठी आणि टेक्चर सुधारण्यासाठी केला जातो. हे सोल्यूशन पिग्मेंटेशन दूर करण्यासाठी दूर करण्यास मदत करते. दुधातील लॅक्टिक एसिड स्किन टेक्चर सुधारते. हे मिश्रण लावून १५ ते २० मिनिटं सुकू द्या. त्यानंतर स्वच्छ पाण्यानं चेहरा धुवा.