Lokmat Sakhi >Beauty > पिग्मेंटेशन, डागांमुळे चेहरा खराब दिसतोय? किचनमधील ४ पदार्थ लावा, ग्लोईंग दिसेल चेहरा

पिग्मेंटेशन, डागांमुळे चेहरा खराब दिसतोय? किचनमधील ४ पदार्थ लावा, ग्लोईंग दिसेल चेहरा

How to Remove Pigmentation From Face Permanently : पिग्मेंटेशन दूर ठेवण्यासाठी काही घरगुती उपाय फायदेशीर ठरू शकतात. (How to Remove Pigmentation From Face Permanently)

By ऑनलाइन लोकमत | Published: July 27, 2023 03:32 PM2023-07-27T15:32:19+5:302023-07-27T17:06:30+5:30

How to Remove Pigmentation From Face Permanently : पिग्मेंटेशन दूर ठेवण्यासाठी काही घरगुती उपाय फायदेशीर ठरू शकतात. (How to Remove Pigmentation From Face Permanently)

How to Remove Pigmentation From Face Permanently : Natural Home Remedies for Hyperpigmentation | पिग्मेंटेशन, डागांमुळे चेहरा खराब दिसतोय? किचनमधील ४ पदार्थ लावा, ग्लोईंग दिसेल चेहरा

पिग्मेंटेशन, डागांमुळे चेहरा खराब दिसतोय? किचनमधील ४ पदार्थ लावा, ग्लोईंग दिसेल चेहरा

 वाढत्या वयात त्वचेत मेलानिनचं जास्त उत्पादन झाल्यामुळे पिंग्मेंटेशन येते.(Pigmentation)  यात त्वचेचा रंग नैसर्गिकरित्या डार्क होत जातो आणि पॅचेस दिसतात. पिग्मेंटेशन हार्मोनल बदल, उन्हामुळे होणार बदल, जेनेटिक कारणांमुळेही उद्भवते. अनेक महिलांना प्रेग्नंसीनंतर त्वचेत हा बदल झालेला दिसून येतो.  (Natural Home Remedies for Hyperpigmentation) वाढत्या वयात त्वचेत असा बदल दिसणं सामान्य आहे. पिग्मेंटेशन दूर ठेवण्यासाठी काही घरगुती उपाय फायदेशीर ठरू शकतात. (How to Remove Pigmentation From Face Permanently)

एलोवेरा

एलोवेरा हायपर पिगमेंटेशन दूर करण्यासाठी वापरले जाते. (Hyperpigmentation)  एलोवराचा ताजा  रस त्वचेसाठी बराच फायदेशीर ठरतो. बाजारातील एलोवेरा जेल विकत घेण्यापेक्षा घरीच ताजे एलोवेरा जेल  रोज रात्री चेहऱ्याला लावा आणि सकाळी चेहरा धुवा.  यामुळे चेहरा टवटवित राहील आणि मॉईश्चराईजही राहून कोरडा पडणार नाही

हळद आणि दूध

हळदीत एंटी बॅक्टेरिअल गुण असतात ज्यामुळे त्वचेच्या समस्या कमी होतात. हळद आणि दूधाचा चेहऱ्यावर वापर करण्यासाठी अर्धी वाटी दूध घेऊन त्यात अर्धा चमचा हळद मिसळा. हे मिश्रण चेहऱ्याला लावून २० मिनिटांनी चेहरा धुवा यामुळे त्वचा चमकदार दिसेल. हळदीत मध, बेसन आणि दूध मिसळून बनवलेला फेस पॅक त्वचेचा  ग्लो वाढवतो. आठवड्यातून २ वेळा तुम्ही हा फेसपॅक वापरू शकता.

बटाटा आणि लिंबाचा रस

बटाट्याचा रस लिंबाच्या रसात समान प्रमाणात मिसळून चेहऱ्याला लावा. हे दोन्ही रस मिक्स करून साधारण अर्धा तास चेहऱ्यावर ठेवा आणि नंतर चेहरा धुवून स्वच्छ करा. तुम्ही बटाटा किसून त्याचा रसही चेहऱ्याला लावू शकता. १० ते १५ मिनिटांनी चेहरा स्वच्छ धुवा. यामुळे काळपटपणाही कमी होईल.

लिंबाचा रस आणि मध

लिंबातील ब्लिचिंग गुण डागांपासून सुटका मिळवण्यास फायदेशीर ठरतात. लिंबू आणि मधाचा फेस मास्क बनवण्यासाठी २ चमचे लिंबाच्या रसात २ चमचे मध घालून पेस्ट तयार करा. तयार फेस मास्क चेहऱ्यावर २० मिनिटं लावून ठेवा नंतर चेहरा स्वच्छ पाण्यानं धुवा. आठवड्यातून एकदा हा फेसमास्क चेहऱ्याला लावल्यानं चांगला फरक दिसून येईल.

Web Title: How to Remove Pigmentation From Face Permanently : Natural Home Remedies for Hyperpigmentation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.