Lokmat Sakhi >Beauty > How to remove pimples : चेहरा काळवंडलाय, पिंपल्सचे काळे डागही खूप झालेत? ५ हेल्दी ड्रिंक्स, आठवडाभरात मिळेल ग्लोईंग स्किन

How to remove pimples : चेहरा काळवंडलाय, पिंपल्सचे काळे डागही खूप झालेत? ५ हेल्दी ड्रिंक्स, आठवडाभरात मिळेल ग्लोईंग स्किन

How to remove pimples from face : जर तुम्हाला वारंवार मुरुमांची समस्या येत असेल, तर तुमच्या आहारात या हेल्दी ड्रिंक्सचा नक्कीच समावेश करा. याचे रोज सेवन केल्याने तुम्हाला काही दिवसात फरक दिसेल.

By ऑनलाइन लोकमत | Published: February 24, 2022 12:30 PM2022-02-24T12:30:26+5:302022-02-24T12:49:21+5:30

How to remove pimples from face : जर तुम्हाला वारंवार मुरुमांची समस्या येत असेल, तर तुमच्या आहारात या हेल्दी ड्रिंक्सचा नक्कीच समावेश करा. याचे रोज सेवन केल्याने तुम्हाला काही दिवसात फरक दिसेल.

How to remove pimples from face : 5 herbal and healthy drinks to reduce acne problem | How to remove pimples : चेहरा काळवंडलाय, पिंपल्सचे काळे डागही खूप झालेत? ५ हेल्दी ड्रिंक्स, आठवडाभरात मिळेल ग्लोईंग स्किन

How to remove pimples : चेहरा काळवंडलाय, पिंपल्सचे काळे डागही खूप झालेत? ५ हेल्दी ड्रिंक्स, आठवडाभरात मिळेल ग्लोईंग स्किन

पिंपल्समुळे केवळ सौंदर्यच बिघडत नाही, तर चेहऱ्यावर डागही पडतात. असे अनेक लोक आहेत ज्यांच्या चेहर्‍यावर मुरुमं रोज उद्भवतात. स्किन केअर रूटीन आणि विविध प्रकारचे ब्युटी प्रॉडक्ट्स वापरूनही ते जात नाहीत. मुरुमांमागे सहसा अनेक कारणे असतात. (Skin Care Tips) ज्यामध्ये प्रदूषण, तणाव, अनियमित जीवनशैली इ. मात्र, काहीवेळा हा त्रास पोटाच्या विकारामुळेही होतो. यासाठी तुम्हाला काही पद्धती वापरून पहाव्या लागतील ज्यामुळे ते मुळापासून दूर करण्यात मदत होईल. अशा स्थितीत आहाराव्यतिरिक्त काही आरोग्यदायी पेयांचा आहारात समावेश करा. (Pimples remove home remedies)

अशी अनेक हेल्दी ड्रिंक्स आहेत,  (5 herbal and healthy drinks to reduce acne problem) ज्याचे रोज सेवन केल्याने तुम्ही त्वचेच्या समस्या वाढण्यापासून रोखू शकता. तसेच हर्बल असल्याने त्वचा आतून चमकदार बनते. आयुर्वेदात हे आरोग्यदायी पेय त्वचेसोबतच आरोग्यासाठीही फायदेशीर असल्याचे सांगितले आहे. जर तुम्हाला वारंवार मुरुमांची समस्या येत असेल, तर तुमच्या आहारात या हेल्दी ड्रिंक्सचा नक्कीच समावेश करा. याचे रोज सेवन केल्याने तुम्हाला काही दिवसात फरक दिसेल. (5 Natural Ways to Get Rid of Pimples Fast )

ग्रीन टी चे सेवन

जर तुम्हाला सकाळी लवकर चहा प्यायला आवडत असेल तर तुमच्या आहारात ग्रीन टीचा समावेश करा. व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असण्यासोबतच त्यात अनेक पोषक घटक असतात, जे त्वचेला आतून चमकदार आणि मुरुमांपासून मुक्त करण्यास मदत करतात. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही ग्रीन टीमध्ये लिंबूही मिसळू शकता. हे शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकते आणि चयापचय वाढवण्यास देखील मदत करते. हे शरीर आतून स्वच्छ करते, ज्यामुळे मुरुमांची समस्या देखील दूर होते.

कोण म्हणतं भात खाल्ल्यानं वजन वाढतं? रोजच्या जेवणात भात खाण्याचे ५ फायदे; नेहमी राहाल मेंटेन

आवळ्याचा रस

मुरुमांची समस्या दूर करण्यासाठी आणि शरीर आतून डिटॉक्स करण्यासाठी सकाळी लवकर आवळ्याचा रस प्या. मात्र, ते चवीला थोडे कडू असल्याने कोमट पाण्यात एक कप आवळ्याचा रस मिसळा. घरी तयार केलेला आवळा रस वापरून पहा. याशिवाय तुम्हाला हवं असल्यास स्मूदी किंवा इतर भाज्यांमध्ये मिसळून आवळ्याचे सेवन करू शकता.

फ्रुट ज्यूस

मुरुमांवर उपचार करण्यासाठी फळांचे रस अत्यंत प्रभावी मानले जातात. यासाठी तुम्ही गाजर, डाळिंब आणि बीटाचा रस बनवून सेवन करू शकता. गाजर आणि बीटरूटमध्ये व्हिटॅमिन ए असते, जे मुरुम, सुरकुत्या आणि पिगमेंटेशन प्रतिबंधित करते. यासोबतच ते त्वचेचा टोन सुधारण्यासही मदत करते. याशिवाय बीटरूट रक्ताभिसरण सुधारते. रोजच्या नाश्त्यामध्ये याचा समावेश केल्यास खूप फायदा होईल.

कडूलिंबाची पानं

कडुलिंबाची पाने त्यांच्या औषधी गुणधर्मांसाठी ओळखली जातात. त्यामुळे अनेक शारीरिक व्याधींपासूनही लोकांना आराम मिळतो. रस तयार करण्यासाठी कडुलिंबाची पाने धुवून मिक्सरमध्ये टाका. त्यात अर्धा ग्लास पाणी मिसळा आणि नंतर बारीक करा. आता ते गाळून प्या. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही त्यात मधही मिसळू शकता. चवीला ते अत्यंत कडू असले तरी मुरुमांवर उपचार करण्यासाठी ते अत्यंत प्रभावी आहे.

लेमन ग्रास ड्रिंक

लेमन ग्रास त्वचा आणि केसांचे सौंदर्य वाढवण्यासाठी अनेक प्रकारे काम करते. मुरुमांची समस्या दूर करण्यासाठी त्याचे पेय देखील बनवता येते. त्यामध्ये असलेले व्हिटॅमिन ए, फॉलिक अॅसिड, झिंक, लोह, पोटॅशियम इत्यादी घटक शरीराला डिटॉक्स करतात. मुरुमांची समस्या दूर करण्यासाठी त्याचा चहा देखील प्यायला जाऊ शकतो.
 

Web Title: How to remove pimples from face : 5 herbal and healthy drinks to reduce acne problem

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.