असं बऱ्याचदा होतं की आपल्याला कुठेतरी जायचं असतं. एखादा कार्यक्रम किंवा पार्टी असते. आणि त्यावेळी आपण छान स्पेशल दिसावं असं वाटत असतं. पण नेमकं त्या दिवसाच्या आसपासच आपल्या चेहऱ्यावर अगदीच नकोसा वाटणारा पिंपल उगवतो. त्यामुळे मग आपला सगळाच मुडऑफ होऊन जातो. असं तुमच्याही बाबतीत जर कधी झालं तर हा एक सोपा उपाय लक्षात ठेवा (How to remove pimples in overnight). हा उपाय केल्याने चेहऱ्यावरचे पिंपल्स लगेच दबतील आणि वाढणार नाहीत. (Home remedies for removing pimple)
चेहऱ्यावरचे पिंपल्स काढून टाकण्याचा उपाय
चेहऱ्यावरचे पिंपल्स कमी करण्यासाठी कोणता घरगुती उपाय करायचा, याविषयीचा व्हिडिओ anubeauty.tips या इन्स्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आला आहे.
हा उपाय करण्यासाठी आपल्याला मोहरीचं तेल, हळद आणि कडुलिंबाची पावडर एवढं साहित्य लागणार आहे.
राधिका मर्चंटने नेसली होती ती ‘लेहेंगा साडी’ नेमकी असते कशी? साडीचा नवा सुंदर ट्रेण्ड
सगळ्यात आधी तर १ टीस्पून मोहरीचं तेल थोडं गरम करून घ्या.
या तेलामध्ये पाव टीस्पून हळद आणि पाव टीस्पून कडुलिंबाची पावडर टाका. सगळं मिश्रण व्यवस्थित हलवून घ्या आणि जिथे पिंपल्स आलेले आहेत, त्यावर रात्री झोपण्यापुर्वी लावून टाका.
वर्षभराचं तिखट करून ठेवण्यासाठी मिरच्यांची खरेदी करताना ४ गोष्टी लक्षात ठेवा- तिखट चवदार होईल
सकाळी उठल्यानंतर चेहरा धुवून टाका. हा उपाय केल्यामुळे पिंपल्सचा आकार वाढणार नाही. ते तिथल्यातिथेच दबले जातील.
हा उपाय करण्यापुर्वी एकदा पॅचटेस्ट जरुर घ्या. तुम्हाला सहन झालं तरच सगळ्या पिंपल्सवर लावा.
हा उपायही करून पाहा
कोरफडीचा गरदेखील पिंपल्सचा आकार वाढू नये आणि ते दबून जावेत, यासाठी उपयोगी ठरतो.
शेफ कुणाल कपूर सांगतात बिर्याणी मसाल्याची स्पेशल रेसिपी, बिर्याणी होईल चमचमीत-परफेक्ट
हा उपाय करण्यासाठी कोरफडीच्या ताज्या गरामध्ये लिंबाच्या रसाचे काही थेंब टाका आणि हा लेप जिथे पिंपल्स आहेत, त्यावर लावा. २० ते २५ मिनिटांनी चेहरा धुवून टाका. हा उपाय दिवसातून दोन ते तीन वेळा करा.