Lokmat Sakhi >Beauty > How To Remove Pimples Using Aloe Vera : चेहऱ्यावर खूप पिंपल्स, काळे डागही पडलेत? 'या' पद्धतीनं ॲलोवेरा आईस क्यूब लावा, कायम दिसेल ग्लोईंग चेहरा

How To Remove Pimples Using Aloe Vera : चेहऱ्यावर खूप पिंपल्स, काळे डागही पडलेत? 'या' पद्धतीनं ॲलोवेरा आईस क्यूब लावा, कायम दिसेल ग्लोईंग चेहरा

How To Remove Pimples Using Aloe Vera : एलोवेरा जेल त्वचेची काळजी घेण्यासाठी वरदानापेक्षा कमी नाही. याच्या वापराने त्वचेशी संबंधित सर्व प्रकारच्या समस्या दूर होतात.

By ऑनलाइन लोकमत | Published: June 6, 2022 01:13 PM2022-06-06T13:13:38+5:302022-06-06T18:43:09+5:30

How To Remove Pimples Using Aloe Vera : एलोवेरा जेल त्वचेची काळजी घेण्यासाठी वरदानापेक्षा कमी नाही. याच्या वापराने त्वचेशी संबंधित सर्व प्रकारच्या समस्या दूर होतात.

How To Remove Pimples Using Aloe Vera :  How to make aloe vera ice cube for pimple skin | How To Remove Pimples Using Aloe Vera : चेहऱ्यावर खूप पिंपल्स, काळे डागही पडलेत? 'या' पद्धतीनं ॲलोवेरा आईस क्यूब लावा, कायम दिसेल ग्लोईंग चेहरा

How To Remove Pimples Using Aloe Vera : चेहऱ्यावर खूप पिंपल्स, काळे डागही पडलेत? 'या' पद्धतीनं ॲलोवेरा आईस क्यूब लावा, कायम दिसेल ग्लोईंग चेहरा

अनिमियमित जीवनशैली आणि प्रदूषणामुळे केवळ आपल्या आरोग्यावरच नाही तर त्वचेवरही परिणाम होतो. वाढत्या प्रदूषणामुळे बहुतांश महिलांना चेहऱ्यावर मुरुमांचा त्रास होतो. (How To Remove Pimples Using Aloe Vera) विशेषतः तेलकट त्वचेच्या स्त्रियांना उन्हाळ्यात मुरुम होतात. मुरुमांपासून सुटका मिळवण्यासाठी महिला रासायनिक उपचारांचा अवलंब करतात, परंतु त्यानंतरही चेहऱ्यावर विशेष परिणाम दिसून येत नाही. (How to make aloe vera ice cube for pimple skin)

त्वचेच्या विशेष काळजीसाठी, आपण नैसर्गिक उत्पादनांचा वापर केला पाहिजे. नैसर्गिक गोष्टींचा प्रभाव काही वेळ दिसत असला तरी तो बराच काळ टिकतो तसेच त्याचे कोणतेही दुष्परिणाम होत नाहीत. जर तुम्हालाही पिंपल्सचा त्रास होत असेल तर तुम्ही ॲलोवेराचे बर्फाचे तुकडे चेहऱ्यावर वापरू शकता. तुम्हाला तुमच्या चेहऱ्यावर काही वेळातच फरक नक्कीच दिसेल. त्वचारोगतज्ज्ञ डॉ.अतुल जैन त्यांनी एका वेबसाईटशी बोलताना सांगितले की,  की ॲलोवेरा चेहऱ्यावर वापरल्याने कोणतेही नुकसान होत नाही. विशेषतः मुरुमांच्या त्वचेवर याचा वापर केल्याने त्वचा स्वच्छ आणि डागरहित होते.(Skin Care Tips)

ॲलोवेरा जेल त्वचेची काळजी घेण्यासाठी वरदानापेक्षा कमी नाही. याच्या वापराने त्वचेशी संबंधित सर्व प्रकारच्या समस्या दूर होतात. त्याची सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे याचे चेहऱ्यावर कमी दुष्परिणाम होतात. पिंपल्स- एलोवेरा जेलचा वापर केल्याने तुम्हाला हट्टी पिंपल्सपासून सुटका मिळेल.

जळजळ

उन्हाळ्यात अनेकदा त्वचेवर जळजळ होण्याची समस्या उद्भवते. अशा स्थितीत, त्वचेच्या या जळजळीपासून आराम मिळवण्यासाठी कोरफड जेल खूप प्रभावी आहे.

तेलकट त्वचा

चेहऱ्यावरील अतिरिक्त तेल कमी करण्यासाठी ॲलोवेरा जेलचा वापर केला जाऊ शकतो, ज्यामुळे चेहऱ्यावर मुरुम होत नाहीत.

डाग

ॲलोवेरा जेल चेहऱ्यावरील डाग दूर करण्यासाठी देखील खूप उपयुक्त आहे.

एलोवेरा आईस क्यूब बनवण्याची योग्य पद्धत

उन्हाळ्यात बहुतेक महिलांना मुरुम आणि मुरुमांचा त्रास होतो. या ऋतूत, चेहरा थंड करण्यासाठी आणि त्वचेची काळजी घेण्यासाठी तुम्ही कोरफडीचा बर्फाचा तुकडा वापरू शकता. हा बर्फाचा क्यूब चेहऱ्यावर लावल्याने चमक येईल. आईस क्यूब बनवण्याची स्टेप बाय स्टेप पद्धत जाणून घेऊया.

सर्वप्रथम कोरफडीचे ताजे जेल घ्या. जर तुमच्याकडे ताजे जेल नसेल तर तुम्ही बाजारातून कोरफडीचे जेल घेऊ शकता. एक चमचा एलोवेरा जेलमध्ये गुलाबजल मिसळून पेस्ट बनवा. आता या पेस्टमध्ये व्हिटॅमिन ई कॅप्सूल घाला. आता हे मिश्रण ट्रेमध्ये घालून फ्रीजमध्ये ठेवा. ॲलोवेरा बर्फाचा क्यूब तयार आहे.

आईस क्यूब लावण्याची योग्य पद्धत

त्वचेची योग्य काळजी घेण्यासाठी बर्फाचे तुकडे लावण्याची योग्य पद्धत माहित असणे आवश्यक आहे. असं म्हणतात की बर्फ थेट त्वचेवर लावू नये. पण तुम्ही ॲलोवेरा आईस क्यूब घेऊन चेहऱ्यावर हलक्या हातांनी मसाज करू शकता. 

वयस्कर चेहऱ्याला तरूण बनवण्यासाठी डॉक्टरांनी सांगितले ६ उपाय; नेहमी दिसेल ग्लोईंग त्वचा

सगळ्यात आधी फेसवॉशने चेहरा स्वच्छ करा. जेणेकरून चेहऱ्यावर साचलेली घाण निघून जाईल. आता बर्फाचे तुकडे चेहऱ्यावर लावा. हलक्या हातांनी चेहऱ्याला मसाज करून लावा. २ ते ३ मिनिटे मसाज करा. 10 ते 15 मिनिटांनी चेहरा स्वच्छ पाण्याने धुवा. आता त्वचेवर त्वचेच्या प्रकारानुसार मॉइश्चरायझर लावा.

 कमी वयातच केस खूप पांढरे व्हायला लागले? फक्त ४ सवयी सोडा, कायम काळेभोर राहतील केस

उन्हाळ्याच्या हंगामात सनबर्न होणे सामान्य आहे. अशा स्थितीत, त्वचेची हरवलेली चमक परत मिळवण्यासाठी तुम्ही ॲलोवेरा जेलचा वापर करू शकता. यासाठी ॲलोवेरा चेहऱ्यावर लावा आणि १५ मिनिटांनी चेहरा धुवा. आठवड्यातून तीनदा एलोवेरा जेलचा वापर करा. तुम्हाला काही वेळातच त्वचेत फरक जाणवेल.

Web Title: How To Remove Pimples Using Aloe Vera :  How to make aloe vera ice cube for pimple skin

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.