Join us  

स्ट्रेच मार्क्समुळे त्वचा खराब दिसतेय? स्ट्रेच मार्क्स घालवण्याचे ५ उपाय, क्लिन दिसेल त्वचा

By ऑनलाइन लोकमत | Published: April 16, 2023 1:08 PM

How to Remove Stretch Marks Permanently : बदामाचे तेल लावल्याने कोरडी त्वचा, काळी त्वचा, स्ट्रेच मार्क्स, बारीक रेषा इत्यादीपासून सुटका मिळते.

पोट, कंबरेवर दिसणाऱ्या स्ट्रेच मार्क्सची अनेक कारणं असू सकतात. यामुळे शरीर खेचंल जातं. आणि स्ट्रेच मार्क्स येतात. वजन कमी करताना स्ट्रेच मार्क्सची समस्या  उद्भवते. प्रेंग्नंसीनंतर  कंबर आणि पोटावर स्ट्रेच मार्क्स दिसून येतात. (How to Remove Stretch Marks Permanently) या खुणा दूर करण्यासाठी बाजारात वेगवेगळे केमिकल्स उपलब्ध आहेत पण यांचा फारसा उपयोग होत नाही. स्ट्रेच मार्क्स दूर करण्यासाठी काही नैसर्गिक उपाय केल्यास तुमचं काम सोपं होऊ शकतं आणि जास्त खर्चही येणार नाही. (Oils to reduce stretch marks on waist)

1) ऑलिव्ह ऑईल

स्ट्रेच मार्क्स कमी करण्यासाठी तुम्ही ऑलिव्ह ऑइलनं मालिश करू शकता. स्ट्रेच मार्क्सवर तेल लावून १५ ते २० मिनिटे मसाज करा. नंतर कोमट पाण्याने त्वचा स्वच्छ करा. दिवसातून दोनदा नियमित तेलाने मसाज केल्यास स्ट्रेच मार्क्स कमी होतात.

२) कॅस्टर ऑईल

स्ट्रेच मार्क्सपासून मुक्त होण्यासाठी, एरंडेल तेलाचा वापर देखील फायदेशीर मानला जातो. या तेलात अँटिऑक्सिडंट्ससोबत फॅटी अॅसिडही आढळतात. त्वचेची आर्द्रता वाढवण्यासाठी आणि स्ट्रेच मार्क्स कमी करण्यासाठी बदाम किंवा खोबरेल तेलात मिसळलेले एरंडेल त्वचेवर लावा. या तेलाने 2 ते 3 महिने रोज मालिश केल्यास स्ट्रेच मार्क्स कमी होतात.

३) नारळाचं तेल

कंबरेवर दिसणारे स्ट्रेच मार्क्स काढण्यासाठी खोबरेल तेल वापरा. खोबरेल तेल त्वचेला हायड्रेट ठेवते. खोबरेल तेलाच्या मदतीने त्वचा घट्ट होते ज्यामुळे स्ट्रेच मार्क्स हळूहळू बरे होतात. खोबरेल तेल थेट स्ट्रेच मार्क्सवर लावता येते. खोबरेल तेलात हळद मिसळून लावल्यानेही फायदा होतो.

खूप घाम येतो, बाहेर ऊन; घरात थंड हवा येण्यासाठी एक काम करा, हवेशीर राहील घर

४) मोहोरीचं तेल

स्ट्रेच मार्क्स काढण्यासाठी मोहरीच्या तेलाचा वापर करा. मोहरीचे तेल घ्या आणि दोन्ही हातांना हलके चोळल्यानंतर कंबरेला लावा. हलक्या हातांनी मसाज करा. रोज रात्री झोपण्यापूर्वी त्वचेला मोहरीच्या तेलाने मालिश केल्यास स्ट्रेच मार्क्स कमी होऊ लागतात.

रोज किती पाऊलं चालल्यानं वजन पटापट कमी होतं? सुडौल, फिट राहण्यासाठी तज्ज्ञ सांगतात...

५) बदामाचे तेल

बदामाचे तेल लावल्याने कोरडी त्वचा, काळी त्वचा, स्ट्रेच मार्क्स, बारीक रेषा इत्यादीपासून सुटका मिळते. बदामाच्या तेलात व्हिटॅमिन ई असते. याचा वापर केल्याने त्वचेतील आर्द्रता टिकून राहते. बदामाचे तेल कोमट गरम करा आणि स्ट्रेच मार्क्सवर लावा आणि 15 मिनिटे राहू द्या. नंतर ही प्रक्रिया पुन्हा करा.

टॅग्स :ब्यूटी टिप्सत्वचेची काळजी