Join us  

हिवाळा सुरु होताच हातपाय काळेकुट्ट झाले? खोबरेल तेलात घाला १ गोष्ट- पाहा मऊमऊ जादू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 07, 2024 5:53 PM

How to Remove Sun Tan from Hands and Legs? : हिवाळ्यात हात - पाय टॅन होतातच; यासाठी १ सोपा घरगुती उपाय करून पाहा..

सुंदर हात - पाय कुणाला नाही आवडत (Tanning Removal). पण धूळ प्रदुषणामुळे हात - पाय टॅन होतातच (Beauty Tips). अनेकदा आपले हात - पाय स्वच्छ असतात. पण कोपर, गुडघे आणि टाचा काळे दिसतात. स्कीन हवा, धूळ, माती आणि प्रदूषणाच्या संपर्कात आल्याने असे होतेच. हिवाळ्यात स्किन रुक्ष आणि काळपट पडते. काळपट पडलेले पाय स्वच्छ असूनही अस्वच्छ दिसतात.

टॅनिंग काढण्यासाठी आपण डायरेक्ट ब्यूटी पार्लरमध्ये धाव घेतो. पण ब्यूटी पार्लरमध्ये धाव न घेता, आपण काही घरगुतीही उपाय करून पाहू शकता.

लहान मुलांना खाऊ देऊ नका २ गोष्टी, तरुणपणी डायबिटिस आणि लठ्ठपणाचा धोका छळेल..

टॅनिंग घालवण्यासाठी आपण खोबरेल तेल आणि कॉफीचाही वापर करून पाहू शकता. खोबरेल तेल फक्त केसांसाठी नसून, स्किनसाठीही फायदेशीर ठरते. तर, कॉफीचा वापर स्किन ब्राईट करण्यास मदत करते(How to Remove Sun Tan from Hands and Legs?).

टॅनिंग घालवण्यासाठी घरगुती उपाय

खोबरेल तेल

५ गोष्टींचा त्रास असेल तर कोमट पाणी कधीच पिऊ नका; वजन कमी करण्याच्या नाद पडेल महागात

कॉफी

खोबरेल तेल आणि कॉफीचा उपाय

- कॉफीमध्ये असलेले अँटिऑक्सिडंट्स त्वचेच्या मृत पेशी काढून टाकते. ज्यामुळे त्वचा चमकदार दिसते.

- तर खोबरेल तेलामध्ये दाहक विरोधी गुणधर्म असतात. जे त्वचेला मुलायम आणि तजेलदार बनवते. आपण या दोन्ही गोष्टींचा वापर करून स्क्रब तयार करू शकता.

- हा स्क्रब तयार करण्यासाठी एका बाऊलमध्ये २ चमचे कॉफी पावडर घ्या. त्यात १ चमचा खोबरेल तेल घालून पेस्ट तयार करा. तयार पेस्ट हाता - पायांना लावा. १० - १५ मिनिटे लावून मसाज करा. स्क्रब केल्यानंतर हात - पाय पाण्याने धुवा. आपल्याला पहिल्याच वॉशमध्ये फरक दिसेल.

- उत्तम रिझल्टसाठी आपण याचा वापर आठवड्यातून दोनदा करू शकता. 

टॅग्स :ब्यूटी टिप्सत्वचेची काळजी