Lokmat Sakhi >Beauty > How To Remove Tan Effectively : उन्हामुळे त्वचेवर खूप टॅनिंग झालंय? १ उपाय करा, पार्लरला न जाताच मिळेल ग्लोईंग निखार

How To Remove Tan Effectively : उन्हामुळे त्वचेवर खूप टॅनिंग झालंय? १ उपाय करा, पार्लरला न जाताच मिळेल ग्लोईंग निखार

How To Remove Tan Effectively : टॅनिंग दूर करण्यासाठी अनेक घरगुती उपाय आहेत, जर तुम्ही ते वेळीच वापरून पाहिले तर तुम्हाला फरक लवकर दिसून येतो.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 30, 2022 11:55 AM2022-05-30T11:55:34+5:302022-05-30T12:33:42+5:30

How To Remove Tan Effectively : टॅनिंग दूर करण्यासाठी अनेक घरगुती उपाय आहेत, जर तुम्ही ते वेळीच वापरून पाहिले तर तुम्हाला फरक लवकर दिसून येतो.

How To Remove Tan Effectively : Dermatologist reveals way to remove tanning | How To Remove Tan Effectively : उन्हामुळे त्वचेवर खूप टॅनिंग झालंय? १ उपाय करा, पार्लरला न जाताच मिळेल ग्लोईंग निखार

How To Remove Tan Effectively : उन्हामुळे त्वचेवर खूप टॅनिंग झालंय? १ उपाय करा, पार्लरला न जाताच मिळेल ग्लोईंग निखार

(Image Credit- You Tube , Shruti Arjun Anand)

उन्हाळ्यात टॅनिंगची समस्या उद्भवणं खूप सामान्य आहे. थोडा वेळ उन्हात राहिल्यानंतर त्वचा लगेच काळी पडते. मात्र, टॅनिंगची समस्या केवळ कडक उन्हात राहिल्याने नाही, तर गॅस-चुल्ह्यासमोर उभे राहून बराच वेळ काम केल्यानेही होतो.  त्वचा जास्त उष्णतेमुळे टॅन होऊ शकते, जे काढण्यासाठी बराच वेळ लागू शकतो. टॅनिंगमुळे तुमचे सौंदर्य तर बिघडतेच पण काहीवेळा यामुळे त्वचाही जळते. (Dermatologist reveals way to remove tanning)

तज्ज्ञांच्या मते, टॅनिंग ही एक संरक्षणात्मक यंत्रणा आहे. जिथे त्वचा सूर्यप्रकाशामुळे होणारे नुकसान कमी करण्यासाठी मेलेनिन बनवते. त्वचा टॅन न झाल्यास तुमची त्वचा जळू शकते. हे अगदी संरक्षक कवच सारखे कार्य करते, जे वृद्धत्वाच्या समस्यांपासून संरक्षण करण्यासाठी देखील कार्य करते.

टॅनिंग दूर करण्यासाठी अनेक घरगुती उपाय आहेत, जर तुम्ही ते वेळीच वापरून पाहिले तर तुम्हाला फरक लवकर दिसून येतो. त्वचारोगतज्ज्ञ आंचलने इंस्टाग्रामवर पोस्ट शेअर केली आणि टॅनिंग दूर करण्याचे प्रभावी मार्ग शेअर केले. यासोबतच त्याने अशा काही गोष्टी देखील सांगितल्या आहेत, ज्या तुम्हाला माहित असणे आवश्यक आहे. एक्सपर्ट्स सांगतात की, त्वचेवर टॅनिंगची समस्या वेगवेगळ्या गोष्टींवर अवलंबून असते. खरं तर, काही वेळा ती पटकन जाते. परंतु काहीवेळा असे होते की टॅनिंग जाण्यासाठी बराच वेळ लागतो.  टॅनिंग किती काळ टिकेल, हे या 2 गोष्टींवर अवलंबून आहे.

जर तुम्ही  बाहेर फिरून आला असाल आणि सतत घरामध्ये असाल, तर टॅनिंगची समस्या 6 ते 8 आठवड्यांत दूर होईल. मात्र, चेहऱ्याच्या तुलनेत बॉडी टॅनिंग काढण्यासाठी वेळ लागतो. टॅनिंग काढून टाकण्यासाठी, आपण सूर्यप्रकाशाचा संपर्क टाळणे महत्वाचे आहे. जर तुम्ही घराबाहेर जात असाल तर पूर्ण बाह्यांचे कपडे घाला. असे कपडे घातल्यानं टॅनिंगची समस्या कमी होते. याशिवाय तुम्ही छत्रीही घेऊन जाऊ शकता. यामुळे काळसर त्वचा कालांतराने निघून जाईल आणि नवीन त्वचा हलकी दिसू लागेल.

सनस्क्रीन लावणं गरजेचं

जर तुम्ही सतत उन्हाच्या संपर्कात असाल तर टॅनिंगची समस्या कायम राहते. सनस्क्रीन न लावल्यास कोणत्याही क्रीमचा प्रभाव त्वचेवर दिसणार नाही. आधी सनस्क्रीन लावणे आणि नंतर दुसरी क्रीम लावणे चांगले. जर तुम्हाला टॅनिंग टाळायचे असेल तर ग्लायकोलिक अॅसिड, लॅक्टिक अॅसिड, कोजिक अॅसिड, अर्बुटिन, ग्रॅन्ड इमेटिक अॅसिड किंवा लिकोरिस एक्स्ट्रॅक्ट असलेली क्रीम वापरा. 

ते तुमची त्वचा लवकर उजळ करण्यात मदत करू शकते. त्याच वेळी एक दिवस आड चेहऱ्यावर 6% ग्लायकोलिक ऍसिड वापरण्याचा प्रयत्न करा. जे भाग अधिक गडद झाले आहेत तिथे लावा तसेच मॉइश्चरायझर आणि सनस्क्रीन लावायला विसरू नका.

Web Title: How To Remove Tan Effectively : Dermatologist reveals way to remove tanning

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.