Lokmat Sakhi >Beauty > चेहरा काळवंडलाय? टॅनमुळे चेहरा खराब दिसतो? दूध - साखरेचा बनवा ब्राईटनिंग जेल, १० मिनिटात निखळ त्वचा

चेहरा काळवंडलाय? टॅनमुळे चेहरा खराब दिसतो? दूध - साखरेचा बनवा ब्राईटनिंग जेल, १० मिनिटात निखळ त्वचा

How to Remove Tan from Face and Skin उन्हाळ्यात त्वचा टॅन होणे ही समस्या सामान्य आहे, पण ब्राईटनिंग जेलने त्वचेची काळजी घ्या..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2023 09:30 AM2023-04-17T09:30:00+5:302023-04-17T09:30:02+5:30

How to Remove Tan from Face and Skin उन्हाळ्यात त्वचा टॅन होणे ही समस्या सामान्य आहे, पण ब्राईटनिंग जेलने त्वचेची काळजी घ्या..

How to Remove Tan from Face and Skin | चेहरा काळवंडलाय? टॅनमुळे चेहरा खराब दिसतो? दूध - साखरेचा बनवा ब्राईटनिंग जेल, १० मिनिटात निखळ त्वचा

चेहरा काळवंडलाय? टॅनमुळे चेहरा खराब दिसतो? दूध - साखरेचा बनवा ब्राईटनिंग जेल, १० मिनिटात निखळ त्वचा

उन्हाळ्यात त्वचा टॅन होण्याची समस्या सामान्य झाली आहे. उन्हात गेल्यानंतर साहजिक त्वता काळवंडते. ज्यामुळे त्वचेच्या संबधित अनेक प्रॉब्लेम्स उद्भवतात. त्वचेवर मुरूम, काळे डाग, ड्राय स्किन या समस्येमुळे महिलावर्ग त्रस्त होतात. त्वचेवरील हा काळपटपणा लवकर निघत नाही. टॅनिंग काढण्यासाठी आपण अनेक उपाय करून पाहतो. महागडे प्रॉडक्ट्सचा वापर देखील करतो. पण महागडे प्रॉडक्ट्स वापरण्यापेक्षा घरगुती उपायांचा वापर करून पाहा.

टॅन दूर करण्यासाठी आपण दूध आणि साखरेचा वापर करू शकता. या साहित्यांचा वापर करून ब्राईटनिंग जेल बनवा. दूध त्वचेसाठी खूप फायदेशीर आहे. यातील लॅक्टिक अॅसिड त्वचेला एक्सफोलिएट करण्याचे काम करते. ज्यामुळे चेहरा चमकदार होतो. हे जेल त्वचेवर निखळ सौंदर्य आणण्यासाठी मदतगार ठरेल(Tips to Remove Tan from Face and Skin by Milk Brightening Gel).

ब्राईटनिंग जेल बनवण्यासाठी लागणारं साहित्य

साखर 

दूध

एलोवेरा जेल

नाभीत साचलेला मळ स्वच्छ करण्याचे ५ उपाय, पर्सनल हायजिनकडे दुर्लक्ष पडतं महागात

कोमट पाणी 

या पद्धतीने बनवा ब्राईटनिंग जेल

त्वचा काळवंडली - टॅन झाली असेल तर, ब्राईटनिंग जेल उपयुक्त ठरेल. यासाठी सर्वप्रथम, एका बाऊलमध्ये एक चमचा साखर व कोमट पाणी घालून मिश्रण मिक्स करा. साखर विरघळल्यानंतर त्यात २ चमचे दूध, व एक चमचा एलोवेरा जेल घालून मिश्रण मिक्स करा. मिश्रणाला जेल सारखा घट्टपणा येत नाही तोपर्यंत मिक्स करत राहा. हे मिश्रण काही वेळासाठी फ्रिजमध्ये ठेवा.

उन्हात गेल्यावर चेहरा लाल पडतो? रेडनेस - रॅशेसमुळे त्रस्त आहात, ५ घरगुती उपाय, त्वचेची काळजी घ्या

अशा पद्धतीने ब्राईटनिंग जेल चेहऱ्यावर लावा

चेहरा चांगला धुवून स्वच्छ करून घ्या. त्यानंतर हे जेल चेहऱ्यावर लावा. या जेलने चेहऱ्यावर मसाज करा. ५ मिनिटे मसाज करून झाल्यानंतर १० मिनिटांसाठी चेहऱ्यावर ठेवा. त्यानंतर सामान्य पाण्याने चेहरा धुवून घ्या. याच्या वापरामुळे चेहरा हायड्रेट राहतो, त्वचेवर ग्लो येतो. काळपटपणा निघून जातो. यासह डार्क स्पॉट निघून जाते. आपण या जेलचा वापर आठवड्यातून ३ दिवस करू शकता.

Web Title: How to Remove Tan from Face and Skin

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.