Join us  

हाता - पायाचे काळेकुट्ट टॅनिंग जाता जात नाही? खोबरेल तेलात घाला ४ गोष्टी; टॅनिंग निघेल चुटकीसरशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2024 5:56 PM

How To Remove Tan From Hand & Face Home Remedies - 4 Tips : पावसाळ्यात हात - पाय काळवंडले असतील तर १ घरगुती उपाय करून पाहा..

सुंदर हात - पाय कोणाला नाही आवडत? परंतु, हवामान आणि धुळीमुळे स्कीन टॅन ही होतेच (Home Remedies). अनेकदा आपले हात - पाय स्वच्छ असतात (Tanning Removal). पण कोपर, गुडघे आणि टाचा काळे दिसतात (Skin Care Tips). स्कीन हवा, धूळ, माती आणि प्रदूषणाच्या संपर्कात आल्याने असे होतेच. पावसाळ्यातही चिखलामुळे स्कीन अधिक काळवंडते.

काळवंडलेले पायाची टॅनिंग दूर करण्यासाठी बरेच जण, ब्यूटी पार्लरमध्ये जातात. केमिकल उत्पादनांमुळे स्कीन आणखीन खराब होत जाते. जर आपल्याला महागडे उत्पादनांचा वापर करायच नसेल तर, घरातच घरगुती स्क्रब तयार करा. या स्क्रबमुळे हाता - पायाची स्कीन उजळ होईल. आणि स्कीन तुकतुकीत मुलायम होईल(How To Remove Tan From Hand & Face Home Remedies - 4 Tips).

हाता - पायाची टॅनिंग दूर करण्यासाठी स्क्रब

लागणारं साहित्य

खोबरेल तेल

ग्लिसरीन

भातातून जळका वास - भाजीत जास्त मीठ पडलं? ५ किचन हॅक्स; स्वयंपाक होईल परफेक्ट

मध

बॉडी सोप

कॉफी पावडर

साखर

अशा पद्धतीने तयार करा हाता - पायाची टॅनिंग दूर करणारे स्क्रब

सुनील शेट्टी सांगतो ३ नियम, वयासोबत फिटनेसही वाढेल आणि आजार जवळपास फिरकणार नाहीत

सर्वात आधी एअर टाईट डबा घ्या आणि त्यात खोबरेल तेल, ग्लिसरीन, मध आणि बॉडी सोप घालून मिक्स करा. नंतर त्यात साखर पावडर आणि कॉफी पावडर घाला आणि सर्वकाही चांगले मिसळा. अशा प्रकारे हाता - पायाची टॅनिंग दूर करणारे स्क्रब रेडी.

आता तयार पेस्ट हाता -  पायांना लावा. ५ मिनिटांसाठी स्क्रब करा. नंतर पाण्याने हात - पाय धुवा. आपण या स्क्रबचा वापर आठवड्यातून २ वेळा करू शकता. याने काळवंडलेली त्वचा आणि डेड स्कीन दूर होईल. 

टॅग्स :ब्यूटी टिप्सत्वचेची काळजी