Join us  

पाय टॅन झालेत? पार्लरसारखं पेडिक्युअर घरी करण्याची १ ट्रिक, मळके पाय दिसतील स्वच्छ आणि सुंदर

By ऑनलाइन लोकमत | Published: August 27, 2023 2:20 PM

How to Remove Tan from Legs Naturally : दह्यात दळलेले ओट्स घाला आणि हे मिश्रण २० मिनिटं पायाला लावून ठेवा नंतर याची मसाज करून पाय पुन्हा धुवा.

रोज पाणी, धूळ-मातीच्या संपर्कात आल्याने चेहऱ्याप्रमाणेच पायांवरही टॅनिंग दिसून येतं. फक्त पायच नाही तर हातही काळे पडतात. तर काहीवेळा पायांवर सॅण्डलच्या खुणा दिसतात.  पायांचा काळपट पणा दूर करण्यासाठी पार्लरमध्ये पेडीक्युअर ट्रिटमेंट केली जाते. पण अनेकांना हे खर्चिक वाटतं. तर काहींना यावर वेळ आणि पैसे दोन्ही घालवणं नको वाटतं. अशावेळी तुम्ही घरच्याघरी टॅनिंग काढून टाकण्याचे सोपे उपाय करू शकता. (How to remove tanning From leg's)

 टॅनिंग काढून टाकण्यासाठी तुम्ही काही सोपे उपाय करून पाहू शकता.  पायांचं टॅनिंग घालवण्यासाठी इनो घ्या. त्यानंतर लिंबाचा रस घाला. हे मिश्रण पूर्ण पायांवर पसरवून लावा. नंतर पाण्याने पाय स्वच्छ करा. पायांवर हे मिश्रण लावून  तसंच ठेवा. १० ते १५ मिनिटांनी पाय पाण्याने स्वच्छ  धुवा.

दूध आणि क्रिम

तुम्ही दूध आणि क्रिमचा वापर करून पायांचा काळेपणा सहज दूर करू शकता. यासाठी एका वाटीत ४ ते ५ चमचे कच्चं दूध घेऊन त्यात  १ मोठा चमचा फ्रेश क्रिम घाला किंवा मलईसुद्धा तुम्ही घालू शकता. हातापायांना हे मिश्रण लावून मसाज  करा.  मग अर्ध्या तासानं हात पाय स्वच्छ धुवा. हे मिश्रण तुम्ही रात्रभरसुद्धा पायांना लावून ठेवू शकता. 

खुद्द माधुरी दीक्षित सांगतेय खास तिच्या स्किन केअर टिप्स; चेहऱ्यावर चमक आणि केस सुंदर!

हळद आणि बेसन

हळद आणि बेसनाचा वापर त्वचा उजळवण्यासाठी पूर्वापार केला जात आहे. या दोन्हींचे मिश्रण त्वचेसाठी एक उत्तम घरगुती उपाय आहे.  हे स्क्रब बनवण्यासाठी सगळ्यात आधी एका वाटीत बेसन घ्या आणि अर्धा चमचा हळद घाला. त्यात दही मिसळून पेस्ट तयार करा. १५ ते २० मिनिटं पायांना लावून ठेवा नंतर  स्वच्छ पाण्यानं धुवा. 

पिग्मेंटेशनमुळे चेहरा वयस्कर दिसतोय? बटाट्याचा जादूई फॉर्म्यूला, डाग जातील-ग्लोईंग दिसेल चेहरा

ओट्स आणि दही

दह्यात दळलेले ओट्स घाला आणि हे मिश्रण २० मिनिटं पायाला लावून ठेवा नंतर याची मसाज करून पाय पुन्हा धुवा. हे एक उत्तम स्क्रबच्या स्वरूपात काम करते. चांगल्या परिणामांसाठी तुम्ही आठवड्यातून २ ते ३ वेळा याचा वापर करू शकता. पाय धुतल्यानंतर मॉईश्चरायजर लावायला विसरू नका. 

पपई आणि मध

पपईत मध मिसळून त्याची पेस्ट बनवा. ही पेस्ट आपल्या पायांना लावून अर्ध्या तासासाठी ठेवा.  त्यानंतर पाय स्वच्छ धुवा  पायांवर चांगला ग्लो येण्यासाठी आठवड्यातून २ वेळा हा प्रयोग करा. पपई त्वचा उजळवण्यासाठी एक उत्तम उपाय आहे. 

टॅग्स :ब्यूटी टिप्सत्वचेची काळजी