Join us  

How To Remove Tan From Neck : चेहरा गोरा पण मान जास्तच काळपट दिसते? 5 उपाय, मानेची त्वचा दिसेल ग्लोईंग

By ऑनलाइन लोकमत | Published: September 27, 2022 1:03 PM

How To Remove Tan From Neck : मानेवर साबण वापरू नका. हे मिश्रण मानेवरून धुतल्यानंतर मानेचा रंग सुधारेल.  तुरटीची पेस्ट बेकिंग सोडा आणि गुलाबपाण्यातही मिसळता येते.

मान ही अशी जागा आहे जी घामाच्या थेट संपर्कात येते. (How To Remove Neck Tanning) जास्त घाम आल्याने मान घाण आणि काळी दिसू लागते. काळ्या मानेमुळे अनेक वेळा आवडीचे कपडे घालताना तडजोड करावी लागते. चेहऱ्याचा आणि त्वचेचा रंग वेगळा असल्याने अनेकवेळा अवघडल्यासारखे वाटते. काही घरगुती उपायांच्या मदतीने सहज मानेचा काळपटपणा दूर करता येऊ शकतो.(How to get rid of dark neck problem home Remedies for clean neck)

तुरटी

तुरटीचा (Alum) वापर अनेक गोष्टी स्वच्छ करण्यासाठी केला जातो. गुलाबपाण्यात तुरटी मिसळून मान साफ ​​करता येते. एक चमचा गुलाबपाणी आणि एक चमचा लिंबाचा रस एकत्र करून त्यात तुरटी टाका. हे मिश्रण 15 ते 20 मिनिटे मानेवर ठेवा आणि नंतर पाण्याने धुवा. मानेवर साबण वापरू नका. हे मिश्रण मानेवरून धुतल्यानंतर मानेचा रंग सुधारेल.  तुरटीची पेस्ट बेकिंग सोडा आणि गुलाबपाण्यातही मिसळता येते.

कोरफड आणि मुल्तानी माती

कोरफड आणि मुलतानी माती हे दोन्ही त्वचेसाठी फायदेशीर मानले जातात. कोरफड आणि मुलतानी मातीमध्ये गुलाबपाणी मिसळून मानेवर लावा. द्रावण कोरडे होईपर्यंत ठेवा, नंतर कोमट पाण्याने धुवा. मानेवरील डाग साफ होऊन काळेपणा दूर होऊन रंग उजळतो. हे द्रावण चेहऱ्यावरही लावता येते, ज्यामुळे त्वचेच्या समस्या दूर होतील.

हळद, दूध आणि बेसन

हळद, बेसन आणि दूध एकत्र करून स्क्रब बनवा. हा स्क्रब संपूर्ण मानेवर नीट लावा. 15 ते 20 मिनिटे ठेवा त्यानंतर पाण्याने धुवा. या द्रावणात मलई देखील मिसळता येते, ज्यामुळे मानेची त्वचा मऊ आणि स्वच्छ होईल.

तांदळाचं पीठ आणि बटाटा

तांदळाचे पीठ आणि बटाट्याचा रस एकत्र करून त्यात थोडे गुलाबजल टाका. ही पेस्ट मानेवर लावा. हे कोरडे झाल्यावर पाण्याने स्वच्छ धुवा. हे लावल्याने मानेची घाणही साफ होईल आणि रंगही चमकेल.

टॅग्स :ब्यूटी टिप्सत्वचेची काळजी