उन्हाळ्यात त्वचेची अधिक काळजी घ्यावी लागते (Skin Care Tips). पावसाळ्यातही अनेकांची त्वचा काळवंडते. शिवाय पिंपल्स, मुरुम, टॅनिंग अशा अनेक समस्यांना सामोरे जावे लागते Tanning removal. ज्यामुळे स्किन अधिक डल दिसू लागते. टॅनिंग घालवण्यासाठी आपण विविध सौंदर्य उत्पादनांचा वापर करून पाहतो. पण यामुळे स्किन अधिक खराब होण्याची समस्या निर्माण होते. जर आपण देखील स्किन टॅनिंगने त्रस्त असाल तर, हळदीचा सोपा उपाय करून पाहा. यामुळे १० मिनिटात टॅनिंग दूर होऊ शकते(How To Remove Tan From Your Face and Skin? Use of Turmeric for removing Tanning).
स्किनसाठी हळदीचा फायदे
हळद फक्त स्वयंपाकासाठी नसून, स्किनसाठी उपयुक्त ठरते. हळदीमध्ये अँटी-फंगल आणि अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म असतात. ज्यामुळे त्वचा क्लिअर तर होतेच, शिवाय मुरुमांच्या डागांपासूनही सुटका होते.
टॅनिंग घालवण्यासाठी अशा पद्धतीने करा हळदीचा फेसपॅक
लागणारं साहित्य
हळद
लिंबाचा रस
पांढऱ्या केसांमुळे वय जास्त दिसू लागलं? खोबरेल तेलात मिसळा ५ रुपयाची १ 'साधी' गोष्ट; केस होतील दाट
एलोवेरा जेल
अशा पद्धतीने करा फेसपॅक
सर्वात आधी एका बाऊलमध्ये अर्धा चमचा हळद घ्या. त्यात अर्धा चमचा लिंबाचा रस किंवा टोमॅटोचा रस मिसळा. मिक्स केल्यानंतर त्यात एलोवेरा जेल घाला. अशा प्रकारे फेसपॅक रेडी.
पावसाळ्यात स्किन इन्फेक्शनचा त्रास होतो? आंघोळीच्या पाण्यात घाला १ 'खास' पान; दिवसभर राहाल फ्रेश
फेसपॅक लावण्यापूर्वी चेहरा धुवून घ्या. तयार फेसपॅक चेहऱ्यावर लावा. निदान १० मिनिटांसाठी ठेवा. शेवटी थंड पाण्याने चेहरा धुवा. आपण या फेसपॅकचा वापर आठवड्यातून २ वेळा करू शकता. यामुळे टॅनिंग नक्कीच निघेल.