Lokmat Sakhi >Beauty > चेहरा टॅन झाला-सतत पावडर लावावी लागते? चमचाभर दुधाच्या सायीचा जादूई उपाय-टॅनिंग निघेल

चेहरा टॅन झाला-सतत पावडर लावावी लागते? चमचाभर दुधाच्या सायीचा जादूई उपाय-टॅनिंग निघेल

How to Remove Tan With Malai : दुधाच्या सायीचा वापर करून टॅनिंग काढून टाकू शकता. मलईच्या मदतीने त्वचेचं डि टॅन करणं एक हेल्दी उपाय आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: February 10, 2024 11:48 AM2024-02-10T11:48:51+5:302024-02-10T12:16:47+5:30

How to Remove Tan With Malai : दुधाच्या सायीचा वापर करून टॅनिंग काढून टाकू शकता. मलईच्या मदतीने त्वचेचं डि टॅन करणं एक हेल्दी उपाय आहे.

How to Remove Tan With Malai : Easy Ways To Use Milk Cream How to Get Rid Of A Sun Tan | चेहरा टॅन झाला-सतत पावडर लावावी लागते? चमचाभर दुधाच्या सायीचा जादूई उपाय-टॅनिंग निघेल

चेहरा टॅन झाला-सतत पावडर लावावी लागते? चमचाभर दुधाच्या सायीचा जादूई उपाय-टॅनिंग निघेल

दूध उकळल्यानंतर आपण मलई काढून बाजूला ठेवतो किंवा चहाबरोबर खाऊन टाकतो. हीच मलई त्वचेसाठी अमृतासमान ठरते. दुधाच्या मलईत पोषक तत्व असतात. व्हिटामीन ए, व्हिटामीन डी, व्हिटामीन ई असते. यात पोटॅशियम, कॅल्शियम, मॅग्नेशियम अशी पोषक तत्व असतात. (Simple Home Remedies To Remove Tan) हिवाळ्याच्या दिवसातंही तुम्हाला टॅनिंग पासून सुटका मिळवायची असेल तर मलईचा वापर करू शकता. (How to Remove Tan Naturally)

स्किन केअर रूटीनमध्ये याचा समावेश करून तुम्ही  हेल्दी, नॅच्युरल त्वचा मिळवू शकता. (How to Remove Tan From Your Face At Home) दुधाच्या सायीचा वापर करून टॅनिंग काढून टाकू शकता. मलईच्या मदतीने त्वचेचं डि टॅन करणं एक हेल्दी उपाय आहे. दुधाच्या सायीत लॅक्टिक एसिड असते. (Quick Home Remedies To Remove Sun Tan) त्वचेसाठी नॅच्युरल एक्सफोलिएटरचं काम करते. याशिवाय त्वचेतील घाण निघून जाण्यास मदत होते. ज्यामुळे त्वचा ब्राईट आणि स्मूद राहते. (Effective Home Remedies To Remove Tan)

दुधाच्या सायीचा डि टॅन पॅक कसा तयार करायचा?

१) त्वचा डि टॅन करण्यासाठी त्यात २ टेबलस्पून साय, १ टेबलस्पून मध आणि अर्धा टेबलस्पून लिंबाचा रस घाला.

२)  एका छोट्या बाऊलमध्ये २ टेबलस्पून साय घ्या. त्यात १ टेबलस्पून मध घाला.

ओटी पोट लटकतंय-मांड्या जाड दिसतात? १ ग्लास पाण्यात हा पदार्थ घालून प्या, पटकन वितळेल चरबी

३) लिंबाचा रस आणि टोमॅटो रस एकत्र मिसळून तुम्ही चेहऱ्याला लावू शकता. 

४) मिश्रण व्यवस्थित मिसळून घ्या. तयार आहे मलईचा डि-टॅन पॅक.

मलईचा डि टॅन पॅक चेहऱ्याला  कसा लावायचा? (How to Make Milk Cream For Face)

सगळ्यात आधी चेहरा माईल्ड फेसवॉशने व्यवस्थित धुवून घ्या. चेहऱ्यावर धूळ-माती लागली असेल किंवा मेकअप केला असेल तर आधी मेकअप रिमुव्ह करा नंतर चेहरा स्वच्छ धुवा. नंतर चेहऱ्याला हाताने मलईचा डि टॅन फेस पॅक लावा आणि १५ मिनिटं वाट पाहा. चेहरा किंवा त्वचेला १५ मिनिटांनंतर पाण्याने स्वच्छ धुवा. चेहऱ्यावर क्रिम किंवा लोशन लावा.  मलई लावल्यानंतर उन्हात जाऊ नका. त्वचेवर मलई लावण्यासाठी ताज्या मलईचा वापर करा.

Web Title: How to Remove Tan With Malai : Easy Ways To Use Milk Cream How to Get Rid Of A Sun Tan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.