Join us  

त्वचा खूपच काळी पडलीये? फक्त अर्धा टोमॅटो वापरून घरगुती स्क्रब लावा, चेहरा दिसेल उजळ

By ऑनलाइन लोकमत | Published: February 13, 2023 5:21 PM

How to Remove Tanning : हा उपाय करण्यासाठी सगळ्यात आधी एका वाटीत साखर घ्या. त्यात टोमॅटो बुडवून त्यावर मध लावा.

(Image Credit- Shruti Arjun Anand. You-Tube)

रोज घराबाहेर पडल्यामुळे सुर्याच्या किरणांच्या संपर्कात आल्यानं चेहरा, पाय तसेच हातांची त्वचा काळी पडते. एकदा त्वचेचा टोन बदलला की काहीही केल्या त्वचेच्या रंगात बदल होत नाही. पार्लरमध्ये महागडे  फेशिअल, ब्लिच करूनही हवातसा फरक दिसत नाही. (How to Remove Tanning) अशावेळी  त्वचेचा काळपटपणा दूर करण्यासाठी तुम्ही काही घरगुती करू शकता. या उपायांच्या वापरासाठी जास्त खर्च लागणार नाही. (How to remove a tan at home)

हा उपाय करण्यासाठी सगळ्यात आधी एका वाटीत साखर घ्या. त्यात टोमॅटो बुडवून त्यावर मध लावा. मध आणि साखरेवा लावलेला टोमॅटो काळपट झालेल्या त्वचेवर लावा. १० मिनिट गोलाकार  घासल्यानंतर थोडावेळ तसेच राहूद्या. हे स्क्रब सुकल्यानंतर ५ ते १० मिनिटांनी स्वच्छ धुवा. त्वचेचं सौंदर्य टिकवून ठेवण्यात टोमॅटो, मध आणि साखर फायदेशीर मानली जाते. (Easy Natural Home Remedies To Remove Sun Tan)

मध त्वचेवर मॉईश्चरायजरच्या स्वरूपात काम करते. रात्री चेहऱ्यावर मध लावल्यानं मृत पेशी निघून जाण्यास मदत होते.  यामुळे त्वचा सॉफ्ट ग्लोईंग दिसते. झोपायला जायच्या अर्धा तास आधी तुम्ही मध त्वचेवर लावू शकता १५ ते २० मिनिटांसाठी मध त्वचेवर सोडा आणि चेहरा स्वच्छ धुवून टाका.

बीपी अचानक वाढते? हाय ब्लडप्रेशरचा त्रास आहे? -१ आयुर्वेदिक उपाय- जीवनशैलीतला बदलही आवश्यक

खोबरेल तेलात मध मिसळून त्वचेवर लावल्यास त्वचेच्या छिद्रांमध्ये साचलेली घाण निघून जाते. त्यामुळे ब्लॅकहेड्स दूर होण्यास मदत होते. तसेच सुरकुत्या आणि बारीक रेषा कमी करण्यास आणि त्वचा घट्ट होण्यास मदत करते. 15-20 मिनिटे चेहऱ्यावर लावा आणि थंड पाण्याने धुवा.

टॅग्स :ब्यूटी टिप्सत्वचेची काळजी