Join us  

कोपर-गुडघे-घोटे काळे पडलेत, खडबडीत झाले? कच्च्या दुधाचा उपाय, १० मिनिटांत निघेल मळ-त्वचा स्वच्छ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2023 5:01 PM

How to remove tanning from elbows and knees कोपर-गुडघे-घोटे काळे पडतात, रफ होतात. तिथला काळपटपणा जाता जात नाही, त्यासाठी खास उपाय

चेहरा चमकदार करण्यासाठी आपण अनेक उपाय करून पाहतो. चेहरा सोडून आपण इतर अवयवांकडे दुर्लक्ष करतो. प्रत्येक्षात शरीराचा प्रत्येक अवयव महत्वाचा असतो. अनेकदा कोपर आणि गुडघे हे काळे दिसतात. यामुळे आपण शॉर्ट्स आणि स्लीव्हलेस ड्रेस घालण्यास टाळतो. ज्यामुळे सौंदर्य देखील फिके पडते.

कोपर आणि गुडघ्यांमधील काळपटपणा सहसा लवकर निघत नाही. ज्यामुळे आपल्या सौंदर्यात बाधा येऊ शकते. कोपर आणि गुडघ्यांमधील काळपटपणा घालवण्यासाठी, महागड्या प्रॉडक्ट्सचा वापर करण्यापेक्षा, दुधाचा वापर करून पाहा. दूध हे त्वचेवर क्लिंजर म्हणून काम करते. ज्यामुळे त्वचा स्वच्छ, सुंदर आणि कोमल दिसते(How to remove tanning from elbows and knees).

गुडघे आणि कोपर एवढे काळे का पडतात?

- डेड स्किन न काढल्यामुळे कोपर आणि गुडघ्यांचा रंग काळा होतो. म्हणूनच त्वचेला योग्य प्रकारे एक्सफोलिएट करणं गरजेचं आहे.

- सूर्यप्रकाशामुळे त्वचेचा रंग गडद होऊ लागतो. त्वचेचे सरंक्षण करण्यासाठी आपण सनस्क्रीनचा वापर करू शकता.

रोज रात्री न चुकता पाय धुवून झोपा, ५ फायदे - पाण्यात घाला एक चमचा मीठ कारण...

- शरीरात हार्मोनल बदल झाल्यामुळे त्वचेचा रंग काळपट पडू लागतो. यासह स्किन डिसऑर्डरमुळेही त्वचेचा रंग बदलतो.

- शरीरात मेलेनिनच्या कमतरतेमुळे काही अवयवांचा रंग काळा होऊ लागतो. म्हणूनच आपल्या आहाराची विशेष काळजी घ्यायला हवी.

कोपर आणि गुडघ्यांमधील काळेपणा काढण्यासाठी कच्च्या दुधाचा करा वापर

कोपर आणि गुडघ्यांमधील काळपटपणा काढण्यासाठी एका वाटीत एक चमचा बेसन, चिमुटभर हळद, आणि दोन चमचे दूध घेऊन मिक्स करा. पेस्ट लावण्यापूर्वी कोपर आणि गुडघे स्वच्छ पाण्याने धुवा. नंतर तयार पॅक कोपर आणि गुडघ्यांवर लावा. पेस्ट लावल्यानंतर हाताने थोडावेळ घासून घ्या. १० मिनिटानंतर कोपर स्वच्छ पाण्याने धुवा. ही पेस्ट रोज वापरल्याने काळपटपणा कमी होईल.

फेस वॉश करताना ४ चुका करणे टाळा, अनेक स्किन प्रॉब्लेम्स सुटतील, चेहरा दिसेल क्लिन - फ्रेश

कोपर - गुडघे काळे होऊ नये म्हणून कशी काळजी घ्याल

- दररोज त्वचा स्वच्छ करा. त्वचा स्वच्छ न ठेवल्यानेही काळी पडू लागते. त्वचा स्वच्छ करण्यासाठी क्लीन्सर वापरा. तर शरीराचे इतर अवयव स्वच्छ करण्यासाठी बाजारात उपलब्ध असलेल्या बॉडी वॉशचा वापर करा.

- कोपर आणि गुडघे वारंवार काळपट पडत असतील तर, त्वचेला योग्य प्रकारे एक्सफोलिएट करा.

- सनस्क्रीन वापरा. हे त्वचेचे वृद्धत्व टाळते तसेच त्वचेला टॅन होण्यापासून कव्हर करते.

टॅग्स :ब्यूटी टिप्सत्वचेची काळजी