Lokmat Sakhi >Beauty > दंड गोरे पण कोपर काळेकुट्ट दिसतात? १ सोपा उपाय, काळपटपणा होईल दूर-सुंदर दिसतील हात

दंड गोरे पण कोपर काळेकुट्ट दिसतात? १ सोपा उपाय, काळपटपणा होईल दूर-सुंदर दिसतील हात

How to remove tanning from elbows and knees : कोपर स्वच्छ करण्यासाठी काही घरगुती उपायसुद्धा फायदेशीर ठरू शकतात

By ऑनलाइन लोकमत | Published: June 1, 2023 07:50 PM2023-06-01T19:50:06+5:302023-06-01T20:19:57+5:30

How to remove tanning from elbows and knees : कोपर स्वच्छ करण्यासाठी काही घरगुती उपायसुद्धा फायदेशीर ठरू शकतात

How to remove tanning from elbows and knees : How to Self Tan Tricky Areas home remedies | दंड गोरे पण कोपर काळेकुट्ट दिसतात? १ सोपा उपाय, काळपटपणा होईल दूर-सुंदर दिसतील हात

दंड गोरे पण कोपर काळेकुट्ट दिसतात? १ सोपा उपाय, काळपटपणा होईल दूर-सुंदर दिसतील हात

त्वचेची काळजी घेणं हा स्किन केअर (Skin Care Tips) रूटीनचा एक महत्वाचा भाग आहे. चेहऱ्याच्या स्वच्छतेबरोबरच शरीराच्या इतर अवयवांच्या स्वच्छतेकडे लक्ष दिलं नाही त्वचा काळी पडायला सुरूवात होते. (How to Self Tan Tricky Areas ) तुम्ही अनेकदा पाहिले असेल की लोकांचे चेहरे गोरे असतात पण मान, हाताचे कोपरे काळपट दिसतात. त्वचा एकदा टॅन झाली की पूर्वरत होण्यासाठी बराच वेळ लागतो. (How to lighten fake tan on elbows)

कोपराचा काळेपणा दूर घालवण्यासाठी बाजारात अनेक उत्पादनं आहेत. पण हे प्रोडक्ड्स महागडे असतात. कोपर स्वच्छ करण्यासाठी काही घरगुती उपायसुद्धा फायदेशीर ठरू शकतात. आपल्या सर्वांच्याच घरी गुलाबपाणी, हळद आणि बेसन उपलब्ध असते. (How to remove tanning from elbows and knees)

बेसनातील प्रोपर्टीज त्वचेववर जमा झालेले टॅनिंग कमी करण्यास मदत करतात.   स्किन इन्फेक्शन कमी करण्यासाठी बेसन फायदेशीर ठरते. चेहरा आतून स्वच्छ करण्यासाठी हळदीचा वापर केला जातो. यामध्ये असलेले अँटी बॅक्टेरियल तत्व त्वचेच्या सर्व प्रकारच्या संसर्गापासून संरक्षण करते. त्वचेला तजेलदार बनवण्यासाठी हळदीचा वापर केला जातो. (How To Remove Fake Tan Fast And Easily At Home)

चेहरा आतून स्वच्छ करण्यासाठी हळदीचा वापर केला जातो. यामध्ये असलेले अँटीबॅक्टेरियल तत्व त्वचेच्या सर्व प्रकारच्या संसर्गापासून संरक्षण करते. त्वचेला तजेलदार बनवण्यासाठी हळदीचा वापर केला जातो. गुलाबपाणी हे एक नॅच्युरल टोनर आहे. गुलाब पाणी पोर्सचा आकार मोठा होण्यापासून रोखते. यातील उपस्थित तत्व त्वचेला लवचीक ठेवण्यास फायदेशीर ठरतात.

कोपरांचा काळेपणा दूर करण्यासाठी एका बाऊलमध्ये २ ते ३ चमचे बेसनाचं पीठ घ्या आणि त्यात २ ते ३ चमचे गुलाब पाणी, हळद मिसळा.  हे पदार्थ व्यवस्थित एकत्र करून घ्या. कमीत कमी १० ते २० मिनिटांसाठी ही क्रिम लावलेली राहू द्या. नंतर  एका कापसाच्या मदतीनं हा पॅक काढून टाका. पाण्यानं धुतल्यानंतर तुम्ही हॅण्ड मॉईश्चरायजरचा वापर करू शकता. मॉईश्चरायजर कोणत्याही चांगली ब्रॅण्डचं वापरू शकता. जवळपास २ आठवडे या पॅकचा वापर केल्यास चांगला परीणाम दिसून येईल. 

कोपरांचा काळपटपणा दूर करण्यासाठी तुम्ही कोलगेट आणि लिंबाचा वापरही करू शकता. सगळ्यात आधी लिंबावर कोलगेट लावून कोपरांना ही पेस्ट लावा आणि व्यवस्थित हातांना चोळा. हे मिश्रण सुकल्यानंतर हात स्वच्छ धुवून घ्या. आठवड्यातू २ ते ३ दिवस हा प्रयोग केल्यास फरक दिसून येईल.

Web Title: How to remove tanning from elbows and knees : How to Self Tan Tricky Areas home remedies

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.