Join us  

चेहरा, मान काळवंडली? अंघोळीच्या आधी फक्त दोन मिनिटंच करा १ काम, बघा चेहऱ्याचा नूर

By ऑनलाइन लोकमत | Published: February 21, 2023 5:27 PM

How to Remove Tanning : तेलकट त्वचा असणाऱ्यांसाठी हळद उत्तम मानली जाते.

उन्हामुळे  चेहऱ्याच्या त्वचेबरोबर मानेचीही त्वचा खूपच काळपट पडते. अशावेळी चेहऱ्याला वेगवेगळ्या क्रिम्स लावूनही हवा तसा फरक जाणवत नाही. (Tanning) चेहऱ्यावरचा काळपटपणा काढून टाकण्यासाठी काही सोप्या टिप्स फायदेशीर ठरू शकतात. पार्लरमध्ये महागडे ब्लीच, फेशियल केल्यानंतरही अनेकदा हवातसा ग्लो मिळत नाही. काही घरगुती उपाय तुम्हाला ग्लोईंग त्वचा मिळवून देऊ शकतात. (How to remove tanning) डॉ. किरण कुकरेजा यांनी काही सोपे घरगुती उपाय सांगितले आहेत. ज्याचा वापर करून तुम्ही तरूण, नितळ त्वचा मिळवू शकता. (How to remove tanning from face using home remedies)

साहित्य

४ चमचे भाजलेली हळद पावडर

३ चमचे चण्याचे पीठ

1 टीस्पून कॉफी पावडर

1 टीस्पून मध

3-4 चमचे गुलाबजल 

कृती

सगळ्यात आधी  हळद  भाजून घ्या.  त्यात चण्याचं पीठ आणि कॉफी पावडर घाला. हे मिश्रण व्यवस्थित एकत्र करून घ्या. त्यात मध आणि गुलाबजल घाला आणि हे मिश्रण चेहऱ्याला लावा. मिश्रण चेहऱ्याला लावा. सुकल्यानंतर चेहरा व्यवस्थित धुवा.  आठवड्यातून एकदा हा उपाय करा १५ ते २० मिनिटांनी चेहरा धुवून टाका. 

हळदीचे त्वचेला फायदे

तेलकट त्वचा असणाऱ्यांसाठी हळद उत्तम मानली जाते. हळदीचा फेस पॅक चेहऱ्यावर लावल्याने सेबमचे उत्पादन नियंत्रित होते. सेबम हा तेलकट पदार्थाचा एक प्रकार आहे, जो सेबेशियस ग्रंथीद्वारे तयार होतो. नैसर्गिक पद्धतीने त्वचेतील तेल कमी करण्यासाठी हळदीचा फेस पॅक रोज चेहऱ्यावर लावा.

पिंपल्स, डागांनी चेहरा खराब झालाय? ५ पदार्थ आजपासूनच खाणं सोडा, चेहरा राहील क्लिन

त्वचेच्या कोरड्यापणामुळे भेगा, निर्जीव, निस्तेज त्वचा, डिहायड्रेशन इत्यादी समस्या उद्भवतात. हळद तुमच्या त्वचेला पोषण आणि आर्द्रता प्रदान करते. हा पॅक मृत पेशी काढून त्वचेला खोलवर हायड्रेट करतो. कोरडेपणाची समस्या दूर करतो. 

टॅग्स :ब्यूटी टिप्सत्वचेची काळजी