चेहरा ही प्रत्येकाची पहिली छाप असते, त्यामुळे डागविरहीत आणि चमकणारी त्वचा दिसली की आत्मविश्वास नक्कीच वाढतो. तुमच्या चेहऱ्यावर चमक आणण्यासाठी जास्त प्रयत्न करण्याची गरज नाही. छोट्या-छोट्या टिप्सचा अवलंब करून तुम्ही अशी चमक मिळवू शकता. (Skin Care Tips) ग्लोईंग त्वचा मिळविण्यासाठी तुम्हाला विशेष काही करण्याची गरज नाही. (How To Remove Tanning Instantly) फक्त तुमच्या किचनमध्ये ठेवलेल्या सौंदर्याचा खजिना शोधायचा. अशीच एक गोष्ट तुमच्या मसाल्याच्या डब्यात असते, जी जेवणात टाकल्यावर त्याची चव वाढते. मात्र, ही छोटीशी गोष्ट तुमचे सौंदर्य आणि त्वचेची चमक देखील वाढवू शकते. (Use coriander and its seeds water for shiny and glowing skin)
कोथिंबीर आपल्या सगळ्यांच्याच घरी असतेच. जर तुम्ही त्यांचा स्वयंपाकाप्रमाणेच त्वचेवरही योग्य वापर केला तर तुम्ही त्वचेला एक अद्भुत चमक आणू शकता. धणे आणि कोथिंबीरीची पाने दोन्ही त्वचेसाठी फायदेशीर आहेत. ते मुरुम आणि पुरळ देखील कमी करतात. पिगमेंटेशन, ब्लॅक हेड्स आणि कोरडी त्वचेची समस्याही कोथिंबीर आणि बियांनी कमी होते.
असा करा वापर
१) टोनर म्हणून तुम्ही कोथिंबिरीचे पाणी वापरू शकता.
२) यासाठी तुम्हाला कोथिंबीर रात्रभर भिजवावी लागेल.
३) कोथिंबीर स्वच्छ धुवून पुरेश्या पाण्यात भिजवा.
४) सकाळी पाणी गाळून घ्या.
५) या पाण्यात गुलाबजल आणि लिंबू मिसळा.
६) आता एक स्प्रे बाटली घ्या आणि पाण्याने भरा.
७) तुम्ही हे लिक्विड तुमच्या चेहऱ्यावर टोनर म्हणून रोज वापरू शकता.
८) धणे स्क्रबिंगसाठी देखील उपयुक्त आहेत. यामुळे चेहऱ्यावरील मृत त्वचा आणि निस्तेजपणा दूर होण्यास मदत होईल.
९) कोथिंबीरीच्या पाण्यात व्हिटॅमिन ई कॅप्सूल मिसळा. यासाठी तुम्ही कॅप्सूल उघडून त्याचे द्रावण पाण्यात टाकू शकता.
१०) मैदा किंवा बेसन जे त्वचेला सुट होईल ते अगदी कमी प्रमाणात कोथिंबीरीच्या पाण्यात मिक्स करून चेहऱ्यावर लावा आणि हळू हळू स्क्रब करा. याशिवाय कोथिंबीरीच्या पाण्यात बेसन मिसळा. त्यात चिमूटभर हळद घाला. हा पॅक चेहऱ्यावर लावा आणि काही वेळाने चेहरा धुवा.