Lokmat Sakhi >Beauty > कुंडीतील कोरफड कापून थेट चेहऱ्याला लावता? थांबा, ‘असं’ न करता वापराल तर चेहरा होईल खराब...

कुंडीतील कोरफड कापून थेट चेहऱ्याला लावता? थांबा, ‘असं’ न करता वापराल तर चेहरा होईल खराब...

How to remove latex from aloe vera : How to remove the latex of an aloe vera leaf effectively : एलोवेरा जेल वापरण्याआधी करा १ काम नाहीतर त्वचा आणि केसांवर होतील उलटे परिणाम...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2024 07:34 AM2024-08-27T07:34:47+5:302024-08-27T07:49:25+5:30

How to remove latex from aloe vera : How to remove the latex of an aloe vera leaf effectively : एलोवेरा जेल वापरण्याआधी करा १ काम नाहीतर त्वचा आणि केसांवर होतील उलटे परिणाम...

How to remove the latex of an aloe vera leaf effectively How to remove latex from aloe vera | कुंडीतील कोरफड कापून थेट चेहऱ्याला लावता? थांबा, ‘असं’ न करता वापराल तर चेहरा होईल खराब...

कुंडीतील कोरफड कापून थेट चेहऱ्याला लावता? थांबा, ‘असं’ न करता वापराल तर चेहरा होईल खराब...

कोरफडीचा गर हा खूप औषधी आणि गुणकारी असतो. या कोरफडीच्या गराचा वापर करून त्वचा आणि केसांचे आरोग्य व सौंदर्यात अधिक भर पाडू शकतो. कोरफड केवळ आरोग्यासाठीच नाही तर केस आणि त्वचेसाठीही खूप फायदेशीर आहे.आजकाल बऱ्याच ब्यूटी प्रॉडक्ट्समध्ये या एलोवेरा जेलचा वापर केला जातो. त्वचा आणि केसांसाठी एलोवेरा जेलचे आरोग्यदायी फायदे भरपूर आहेत.  केस आणि त्वचेसाठी एलोवेरा जेलचा वापर वेगवेगळ्या पद्धतीने करता येतो. वेगवेगळ्या प्रकारचे हेअर मास्क आणि फेसपॅक तयार करण्यासाठी त्यात एलोवेरा जेल फार मोठ्या प्रमाणावर वापरलं जात(How To Properly Clean & Remove The Poison From Aloe Vera Before You Use It).

एलोवेरा जेलचा वापर करण्यासाठी  त्याची पाने सोलून आतील पारदर्शक गर त्वचा आणि केसांवर लावता येतो. परंतु काहीवेळा एलोवेरा जेलच्या आतील गर केस आणि त्वचेसाठी वापरल्यांस त्याची आपल्याला एलर्जी होऊ शकते . एलोवेरा जेल हे सगळ्यांना तितकेच सूट होईल असे नाही. काहीवेळ एलोवेरा जेल वापरुन केस आणि त्वचा सुंदर दिसण्याऐवजी त्यांच्या अनेक समस्या सुरु होतात. याचे एक मुख्य कारण म्हणजे एलोवेरा जेलचा (How to remove latex from aloe vera) योग्य पद्धतीने वापर न करणे. शक्यतो आपण एलोवेरा जेलचा वापर करताना कोरफडीचे पान कापून त्यातील गर काढून घेऊन त्याचा थेट त्वचा आणि केसांवर वापर करतो. परंतु हे पूर्णपणे चुकीचे आहे. जर का आपण कुंडीतील कोरफडीचे पान काढून थेट त्याचा गर त्वचा किंवा केसांवर वापरत असाल तर अशी चूक करु नका. कोरफडीचा गर वापरण्याची योग्य पद्धत पाहूयात(How To Properly Remove The Poison Latex from Aloe Vera).

एलोवेरा जेल वापरताना लक्षात ठेवा... 

जेव्हा आपण त्वचा आणि केसांसाठी एलोवेरा जेल लावता तेव्हा आपण थेट कोरफडीचे पान कापून त्यातील गर वापरतो. परंतु ही पद्धती चुकीची आहे, कारण कुंडीत लावलेले कोरफडीचे पान मुळापासून कापल्यानंतर त्याच्या तळाशी पिवळ्या रंगाचा एक प्रकारचा थर दिसतो. या पानाच्या तळाशी असणाऱ्या भागातून एक प्रकारचा चिकट पिवळ्या रंगाचा द्रव पदार्थ बाहेर पडतो त्याला 'लेटेक्स' म्हणजेच चीक असे म्हणतात.

हेअर रिमूव्हलसाठी वॅक्सिंगचे चटके कशाला सहन करता ? नैसर्गिक पदार्थ वापरुन नको असलेले केस काढा सहज...

कोरफडीच्या पानांच्या तळाशी असणाऱ्या भागातून निघणारा चीक आपल्या त्वचा आणि केसांसाठी अपायकारक असतो. हा चीक केस आणि त्वचेवर लावल्यास फार मोठे नुकसान होऊ शकते. यासाठी हा चीक काढून टाकण्याची एक सोपी ट्रिक पाहुयात. 

कोरफडीच्या तळाशी असणाऱ्या भागातील पिवळ्या रंगाचा चीक काढून टाकण्यासाठी एका मोठ्या बाऊलमध्ये पाणी घ्यावे. आता या पाण्यात कोरफडीच्या पानांचा तळाचा भाग पूर्ण बुडेल असा व्यवस्थित बाऊलमध्ये ठेवावा. लक्षात ठेवा कोरफडीचा हा चीक काढून टाकण्यासाठी कोरफड नेहमी या पाण्याच्या बाऊलमध्ये उभी करुन ठेवा. हा चीक संपूर्णपणे काढून टाकण्यासाठी कोरफडीचे पान किमान ४ ते ५ तासांसाठी बाऊलमधल्या पाण्यांत उभे ठेवावे.

शोभितासारखा ग्लो हवा चेहऱ्यावर? पाहा तिचे सोपे सिक्रेट - एकदा लावा चेहऱ्यावर येईल चमक...

४ ते ५ तासानंतर या पानातील गर पूर्णपणे बाऊलमधील पाण्यात उतरून हे पाणी हलकेच पिवळ्या रंगांचे झालेले दिसेल. त्यानंतरच या कोरफडीच्या पानांमधील गर वापरण्यास योग्य असतो. या सोप्या ट्रिकचा वापर करून आपण कोरफडीच्या पानाच्या तळाशी असणारा पिवळा चीक अगदी सहजपणे काढू शकतो.


Web Title: How to remove the latex of an aloe vera leaf effectively How to remove latex from aloe vera

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.