Lokmat Sakhi >Beauty > हाताची त्वचा गोरी पण अंडरआर्म्स काळेकुट्ट झालेत? ५ घरगुती उपाय, टॅनिंग निघेल-त्वचा उजळेल

हाताची त्वचा गोरी पण अंडरआर्म्स काळेकुट्ट झालेत? ५ घरगुती उपाय, टॅनिंग निघेल-त्वचा उजळेल

How to Remove Underarms Darkness (kakhetil kalepana ghalnyache upay) : नारळाच्या तेलाचे बरचे फायदे आहेत. यात व्हिटामीन ई मोठ्या प्रमाणात असते. हे तेल रोज आपल्या काखेत लावून मसाज करा.

By ऑनलाइन लोकमत | Published: December 5, 2023 08:14 PM2023-12-05T20:14:40+5:302023-12-05T20:29:02+5:30

How to Remove Underarms Darkness (kakhetil kalepana ghalnyache upay) : नारळाच्या तेलाचे बरचे फायदे आहेत. यात व्हिटामीन ई मोठ्या प्रमाणात असते. हे तेल रोज आपल्या काखेत लावून मसाज करा.

How to Remove Underarms Darkness : How to lighten dark underarms How to get rid of dark armpits | हाताची त्वचा गोरी पण अंडरआर्म्स काळेकुट्ट झालेत? ५ घरगुती उपाय, टॅनिंग निघेल-त्वचा उजळेल

हाताची त्वचा गोरी पण अंडरआर्म्स काळेकुट्ट झालेत? ५ घरगुती उपाय, टॅनिंग निघेल-त्वचा उजळेल

लग्न  असो किंवा कोणतंही फंक्शन महिलांना स्लिव्हजलेस ड्रेस घायला फार आवडते. पण डार्क अंडरआर्म्समुळे त्या स्लिव्हजलेस ड्रेस घालायला फार विचार करतात. (Home Remedies For Dark Underarms) कारण काखेतील काळेपणामुळे थ्री-फोर स्लिव्हजचे कपडे निवडावे लागतात. काखेचा काळेपणा काढून टाकण्यासाठी तुम्ही काही सोपे उपाय करू शकता. घाम जमा झाल्यामुळे काखेत काळे पॅचेस दिसून येतात. जे डार्क अंडरआर्म्सचे कारण ठरतात.  हा त्रास टाळण्यासाठी तुम्ही घरगुती उपायांची मदत घेऊ शकता. (Underarms Whitening at Home)

नारळाचे तेल

नारळाच्या तेलाचे बरचे फायदे आहेत. यात व्हिटामीन ई मोठ्या प्रमाणात असते. हे तेल रोज आपल्या काखेत लावून मसाज करा. नंतर स्वच्छ पाण्याने धुवून घ्या काही दिवसांतच काखेतील काळेपणा दूर झालेला दिसून येईल. तुम्ही नारळाचे तेल काखेत लावले तर डेड सेल्सही निघून जाण्यास मदत होईल.

लिंबाचा रस

लिंबातील गुणकारी तत्व  त्वचेचा काळेपणा घालवण्यासाठी फायदेशीर ठरतात. याच्या वापराने डार्क अंडरआर्म्सची त्वचा उजळ होते. अंघोळीच्या आधी अर्धा लिंबू कापून अफेक्टेड एरियामध्ये घासून लावा. यामुळे अंडरआर्म्स नैसर्गिकरित्या गोरे दिसतील. १ ते २ आठवडे हा उपाय केल्यास चांगला रिजल्ट दिसून येईल.

एपल सायडर व्हिनेगर

एपल सायडर व्हिनेगरमुळे डेड सेल्स कमी होण्यास मदत होते. यात हलके एसिड असते जे नॅच्युरल क्लिनरप्रमाणे काम करते. एपल सायडर व्हिनेगर बेकिंग सोड्याबरोबर मिसळून अंडरआर्म्समध्ये लावा आणि सुकल्यानंतर पाण्याने स्वच्छ धुवा. 

पोट कमी करायचंय-डाएट जराही जमत नाही? थंडीत सकाळी १ लाडू खा-भराभर वजन कमी होईल

ऑलिव्ह ऑईल

ऑलिव्ह ऑईल स्वंयपाकाप्रमाणेच त्वचेसाठीही फायदेशीर ठरते. सगळ्यात आधी एक चमचा ऑलिव्ह ऑईल आणि १ चमचा ब्राऊन शुगर मिक्सर करून पेस्ट तयार करून घ्या नंतर ही पेस्ट डार्क भागांवर लावा. काही वेळासाठी तसंच सोडून द्या नंतर हात स्वच्छ पाण्याने धुवा. 

दिवसरात्र भात खातात तरी साऊथच्या लोकांचे पोट का सुटत नाही? भात खाण्याची योग्य पद्धत-पाहा

डिओचा वापर जास्त नको

केमिकल्सयुक्त डिओ आणि परफ्यूम थेट स्किनवर अप्लाय केल्यास त्वचेचा काळेपणा वाढू लागतो. यामुळे त्वचेच्या एलर्जी सु्दधा होऊ शकतात. याशिवाय इचिंगही वाढते. अशा स्थितीत केमिकल्सयुक्त उत्पादनांचा जास्त वापर करू नका. नैसर्गिक पदार्थांचा वापर करा.

Web Title: How to Remove Underarms Darkness : How to lighten dark underarms How to get rid of dark armpits

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.