आपण सुंदर, आकर्षक दिसावं असं प्रत्येक मुलीला वाटतं. चेहऱ्यावरचे नको असलेले केस काढून टाकण्यासाठी बऱ्याच मुली थ्रेडींग, ब्लीच, क्रिमचा वापर करतात. (Skin Care Tips) चेहऱ्यावरचं केस काढणं त्रासदायक ठरू शकतं. अनेकदा चेहऱ्यावरचे केस पांढरे पण होतात. केस काढण्यासाठी काय करावं हेच सुचत नाही. चेहऱ्यावरचे केस काढण्याचे सोपे उपाय पाहूया. (How to remove facial Hairs)
१) चेहऱ्यावरचे नको असलेले केस काढताना वेदना होऊ शकतात. या वेदना टाळण्यासाठी डॉक्टरांच्या सल्ल्यानं क्रिम अप्लाय करा.
२) तारूण्यात चेहऱ्यावर केस दिसत असतील तर ते काढण्याची घाई करू नका. कारण हार्मोनल बदलांमुळे चेहऱ्यावर केस येतात. हळूहळू चेहऱ्यावरचे केस कमी होऊ शकतात.
३) केसांना लपवण्यासाठी गरजेपेक्षा जास्त मेकअप करू नका. मेकअपमुळे चेहरा खराब होऊ शकतो.
४) केस काढण्याआधी आणि नंतर चेहरा व्यवस्थित धुवा.
५) नको असलेले केस काढण्यासाठी त्वचा पूर्णपणे स्वच्छ आणि मॉईश्चरमुक्त ठेवा.