शरीरावरील नको असलेले अनावश्यक केस काढण्यासाठी आपण अनेक उपाय करतो. शक्यतो वॅक्सिंग किंवा थ्रेडींग अशा दोन पर्यायांचा वापर खूप जास्त प्रमाणात केला जातो. बऱ्याच स्त्रिया आपल्या हाता-पायांवरचे (How To Remove Unwanted Hair From Body With Lemon) केस काढण्यासाठी दर महिन्याला पार्लर गाठतात. पार्लरमध्ये जाऊन अनावश्यक केस काढण्यासाठी वॅक्सिंग करतात, परंतु ही महागडी वॅक्सिंग ट्रिटमेंट करण्यासाठी पैसे मोजावे लागतात. याशिवाय त्वचेवर वेगवेगळ्या प्रकारचे केमिकल्सयुक्त प्रॉडक्ट्स वापरले जातात(Home Remedies To Remove Body Hair Naturally).
त्वचेवरील नको असलेले केस काढण्यासाठी वारंवार अशा केमिकल्सयुक्त प्रॉडक्ट्सचा वापर केल्यास त्वचेचा नैसर्गिक पोत खराब होऊन त्वचेचे आरोग्य बिघडू शकते. याचबरोबर वॅक्सिंग करताना त्वचा खेचली जाऊन त्वचेवर ताण पडून त्वचा लालसर पडून त्यावर पुरळ येऊ शकतात. अशावेळी त्वचेची काळजी घेऊन हेअर रिमूव्हल करण्यासाठी आपण काही घरगुती पदार्थांचा वापर करून नैसर्गिक उपाय देखील करून पाहू शकतो. घरच्याघरीच हेअर रिमूव्हलसाठी वॅक्सिंग (Try These Home Remedy To Get Rid Of Unwanted Body Hair Naturally) करायचे म्हटलं तर आपण साखर, वॅक्स किंवा मधाचा वापर करतो. परंतु या दुसऱ्या घरगुती नैसर्गिक उपायात आपण घरात सहज उपलब्ध असणाऱ्या पदार्थांचा वापर करून अगदी झटपट वॅक्सिंग करु शकतो. साखर, वॅक्स किंवा मधाचा वापर न करता घरच्याघरीच हातापायांवरचे केस काढण्यासाठीचा घरगुती उपाय कोणता ते पाहूयात(How to remove unwanted hair at home With Lemon).
साहित्य :-
१. लिंबाचा रस - दोन लिंबाचा रस
२. बेकिंग सोडा - १ टेबलस्पून
३. गरम पाणी - १/२ कप
४. गव्हाचे पीठ - १ टेबलस्पून
५. टिश्यू पेपर - २ ते ४ टिश्यू पेपर
कॉमेडियन भारती सिंह सांगते, केस काळे करण्याचा सुपरहिट फॉर्म्युला, पांढऱ्या केसांची चिंताच सोडा....
हिवाळ्यात टाचांना भेगा पडल्या, कोरडी त्वचा? बस्स वाटीभर दही काफी है! पाहा खास उपाय...
कृती :-
१. सगळ्यांत आधी एका बाऊलमध्ये दोन लिंबाचा रस घेऊन त्यात बेकिंग सोडा व हलके उकळवून गरम केलेले पाणी ओतावे.
२. लिंबाचा रस आणि बेकिंग सोडा गरम पाणी ओतून अॅक्टिव्ह करून घ्यावा.
३. सगळ्यांत शेवटी या मिश्रणात गव्हाचे पीठ घालूंन मिश्रण हलवून तयार करून घ्यावे.
४. वॅक्सिंगसाठी मिश्रण तयार आहे.
काही केल्या केसांची वाढच होत नाही? वापरा चमचाभर 'ही' आयुर्वेदिक पावडर, केस होतील लांबसडक-दाट...
याचा वापर कसा करायचा ?
वॅक्सिंग करण्यासाठी हे घरगुती लिंबाचे मिश्रण तयार आहे. या मिश्रणाचा वापर करून आपण हात, पाय तसेच काखेतील अनावश्यक केस अगदी सहजपणे काढू शकतो. अप्पर लिप्स किंवा चेहऱ्यावरचे केस काढण्यासाठी या मिश्रणाचा वापर करु नये. या तयार मिश्रणात टिश्यू पेपर बुडवून हाता - पायांवरील केसांवर हे मिश्रण लावून घ्यावे. त्यानंतर ३ ते ४ मिनिटे ते मिश्रण त्वचेवर तसेच राहू दयावे. थोड्यावेळाने या हे मिश्रण अॅक्टिव्ह होऊन त्याचे लहान बुडबुडे येऊ लागतील. असे लहान बुडबुडे आल्यावर टिश्यू पेपरने हलकेच पुसून घ्यावे. असे केल्याने त्वचेवरील केस अगदी सहजपणे निघतील आणि टिश्यू पेपरला चिकटतील. यामुळे त्वचेला खेचून किंवा ताणून हेअर रिमूव्हल करण्यापेक्षा आपण हा सोपा घरगुती उपाय अगदी सहज घरच्याघरीच करू शकता.
हा उपाय करताना काय काळजी घ्यावी ?
हा घरगुती उपाय सगळ्याच प्रकारच्या स्किनला सूट होईलच असे नाही. यासाठी हा घरगुती उपाय करण्यापूर्वी आपल्या त्वचेवर याची आधी पॅच टेस्ट करून पाहा. याशिवाय तुम्ही हा उपाय फक्त हात आणि पायांवरच करून पहा, कारण त्यात बेकिंग सोडा आणि लिंबू असल्याने कोणत्याही प्रायव्हेट बॉडी पार्टवर किंवा संवेदनशील त्वचेवर वापरू नका.