आपल्या शरीराच्या वेगवेगळ्या अवयवांवर छोटे - छोटे केस असतात. शरीरावरील हे अनावश्यक नको असलेले केस काढण्यासाठी आपण अनेक पर्यायांचा वापर करतो. शरीरावरील हे नको असलेले केस काढण्यासाठी महिला विशेषतः थ्रेडींग किंवा वॅक्सिंगचा वापर करतात. आपल्यापैकी काहीजणी अंडरआर्म्स, हात, पाय, आयब्रो, अप्पर लिप्स यांसारख्या भागांवरचे केस हमखास काढतात. चेहऱ्याची सुंदरता अधिक उठून दिसावी म्हणून स्त्रिया आयब्रो आणि अप्पर लिप्स तर दर महिन्याला करतात. आयब्रो, अप्परलिप्समुळे जशी चेहऱ्याची सुंदरता वाढते तशीच जर त्यात काही चूक झाली तर बिघडून चेहरा विद्रुप किंवा खराब दिसू लागतो(How to Remove Hair from Your Upper Lip Naturally).
आयब्रो आणि अप्पर लिप्स या भागांवरील स्किन तशी नाजूकच असते. थ्रेडींग किंवा वॅक्सिंग करताना या भागावरील नाजूक त्वचेला इजा होऊ शकते. चेहऱ्याची सुंदरता अधिक खुलून येण्यासाठी आयब्रो, अप्पर लिप्स करत असलो तरीही ते करताना फार दुखते. काहीवेळा त्या भागांवर रॅश येणे, रिअॅक्शन, सूज येणे, स्किन लाल होणे यांसारख्या छोट्या - छोट्या समस्या उद्भवतात. जर आपण पार्लरमध्ये जाऊन अप्पर लिप्स करत असाल तर ते करताना थोडी काळजी घेतली पाहिजे. पार्लरमध्ये जाऊन अप्पर लिप्स केले तर थ्रेडींग, वॅक्सिंग अशा पद्धतीचा वापर केला जातो. परंतु आपल्या त्वचेला इजा होऊ न देता घरच्या घरीच अप्पर लिप्स करण्याचे काही सोपे पर्याय पाहूयात(How to remove upper lip hair at home without Threading & Waxing).
घरच्या घरी अप्पर लिप्स करण्याचे सोपे उपाय कोणते ?
१. हळद आणि दूध :- एका छोट्या बाऊलमध्ये हळद घेऊन त्यात थोडे थोडे दूध ओतून ते चमच्याच्या मदतीने मिक्स करुन घ्यावे. ही हळद आणि दुधाची पेस्ट थोडी घट्टसर झाल्यानंतर त्यात चमचाभर मध घालून घ्यावे. आता हे तयार मिश्रण अप्पर लिप्सना लावून किमान १५ ते २० मिनिटांसाठी तसेच राहू द्यावे. त्यानंतर कोमट पाण्याच्या मदतीने हा पॅक स्वच्छ धुवून घ्यावा. आठवड्यातून हा उपाय किमान २ ते ३ वेळा केल्यास अप्पर लिप्स काढण्यास फार मदत होऊ शकते. हा उपाय केल्याने त्वचेला इजा होऊ न देता झटपट अप्पर लिप्स घरच्या घरी करता येतात.
केसातील कोंडा कमी होईल झटपट! किचनमधील १ खास पदार्थ लावा, मैत्रिणी विचारतील सिक्रेट...
२. लिंबाचा रस आणि साखर :- एक छोटे भांडे घेऊन त्यात लिंबाचा रस, साखर आणि थोडे पाणी घेऊन गॅसच्या मंद आचेवर गरम करून घ्यावेत. या सगळ्या मिश्रणाची जोपर्यंत घट्टसर आणि चिकट पेस्ट तयार होत नाही तोपर्यंत हे मंद आचेवर चमच्याने ढवळत राहावे. मिश्रण थोडे थंड झाल्यावर हाताच्या बोटांनी किंवा चमच्याने अप्पर लिप्सना लावून घ्यावे. त्यानंतर या मिश्रणावर एक पातळ कापड ठेवून ज्या दिशेने केसांची ग्रोथ आहे त्याच्या विरुद्ध दिशेने हे कापड जोरात ओढावे. यामुळे अप्पर लिप्स काढण्यासाठी हा उपाय सर्वात सोपा आहे.
३. मध आणि लिंबू :- मध आणि लिंबू हे दोन्ही पदार्थ आपल्या त्वचेसाठी अधिक फायदेशीर असतात. एका बाऊलमध्ये लिंबाचा रस आणि मध घेऊन या दोन्ही पदार्थांची घट्टसर पेस्ट तयार करून घ्यावी. ही तयार पेस्ट आपल्या अप्पर लिप्सवर लावून घ्यावी. ही पेस्ट आपल्या संपूर्ण केसांवर लागेल याची विशेष काळजी घ्यावी. त्यानंतर किमान १५ ते २० मिनिटे ही पेस्ट अप्पर लिप्सवर तशीच लावून ठेवावी. त्यानंतर हाताची बोट पाण्याने थोडीशी भिजवून या अप्पर लिप्सवर लावलेल्या मिश्रणावर हलकेच चोळून घ्यावे. यामुळे आपले अप्पर लिप्स अगदी सहजपणे निघून येण्यास मदत होईल.
मेहेंदीमध्ये चुकूनही मिक्स करु नका ' हे ' पदार्थ, आहेत ते केस गळतील - होईल नुकसान...
४. बेसन पीठ :- बेसन पिठाचा वापर करून देखील आपण आपले अप्पर लिप्स अगदी सहजपणे काढू शकतो. एका बाऊलमध्ये बेसन पीठ, हळद, दूध असे सगळे जिन्नस एकत्रित करुन मिक्स करुन घ्यावे. त्यानंतर किमान १५ ते २० मिनिटे ही पेस्ट अप्पर लिप्सवर आहे तशीच राहू द्यावी. २० मिनिटांनंतर हाताची बोट पाण्याने थोडीशी भिजवून या अप्पर लिप्सवर लावलेल्या मिश्रणावर केसांच्या वाढीच्या विरुद्ध दिशेने हलकेच खेचून घ्यावे. यामुळे अप्पर लिप्स वरील केस काढून टाकण्यासाठी हा उत्तम पर्याय आहे.