Lokmat Sakhi >Beauty > थ्रेडींग-वॅक्सिंग नको, किचनमधील २ पदार्थ वापरुन करा वेदनारहित अप्पर लिप्स, पाहा खास उपाय...

थ्रेडींग-वॅक्सिंग नको, किचनमधील २ पदार्थ वापरुन करा वेदनारहित अप्पर लिप्स, पाहा खास उपाय...

How To Remove Upper Lip Hair Naturally Without Pain : How to Remove Hair from Your Upper Lip Naturally : Remove Upper lip Hair with Natural Home Remedies : How To Remove Upper Lip Hair At Home Immediately : How to keep upper lips clean without threading Waxing : घरच्याघरीच किचनमधील रोजच्या वापरातील पदार्थ वापरुन अप्पर लिप्स करण्याची सोपी पद्धत....

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2025 16:46 IST2025-02-10T16:27:53+5:302025-02-10T16:46:19+5:30

How To Remove Upper Lip Hair Naturally Without Pain : How to Remove Hair from Your Upper Lip Naturally : Remove Upper lip Hair with Natural Home Remedies : How To Remove Upper Lip Hair At Home Immediately : How to keep upper lips clean without threading Waxing : घरच्याघरीच किचनमधील रोजच्या वापरातील पदार्थ वापरुन अप्पर लिप्स करण्याची सोपी पद्धत....

How To Remove Upper Lip Hair Naturally Without Pain How to keep upper lips clean without threading Waxing | थ्रेडींग-वॅक्सिंग नको, किचनमधील २ पदार्थ वापरुन करा वेदनारहित अप्पर लिप्स, पाहा खास उपाय...

थ्रेडींग-वॅक्सिंग नको, किचनमधील २ पदार्थ वापरुन करा वेदनारहित अप्पर लिप्स, पाहा खास उपाय...

शरीरावरील नको असलेले अनावश्यक केस आपण काढून टाकतो. दर महिन्याला आपण पार्लरमध्ये जाऊन अंडरआर्म्स, अप्पर लिप्स, हातापायांवरील केसांचे वॅक्सिंग करतो. परंतु (How To Remove Upper Lip Hair Naturally Without Pain) शरीराच्या कोणत्याही भागावरील केसांचे वॅक्सिंग करायचे म्हटलं की वेदना होतातच. यातही ओठांवरील म्हणजे अप्पर लिप्स ( How to Remove Hair from Your Upper Lip Naturally) करताना काहीजणींना नकोसे होते. वेदना होतात, खूप दुखत, रडू येत, सोबतच त्वेचेची आग होऊन जळजळ देखील होते. अशावेळी अप्पर लिप्स करणे म्हणजे नको वाटते(How to keep upper lips clean without threading Waxing).

शरीराच्या इतर भागांतील केसांच्या तुलनेत ओठांवरील केसांची वाढ भराभर होते. त्यामुळे आपल्याला एकदा का अप्पर लिप्स केले की कायमच दर १५ दिवसांनी करावे लागतात. असे सतत वाढणारे अप्पर लिप्स वेळीच वॅक्सिंग करुन काढले नाही तर चेहऱ्याचे सौंदर्य खराब होते. ओठांजवळील त्वचेचा भाग हा अतिशय नाजूक आणि मऊमुलायम असतो. अशा नाजूक त्वचेवर वॅक्सिंग किंवा थ्रेडींग केल्याने त्वचेची आग होऊन त्वचा लाल पडते. इतकंच नाही तर काहीवेळा पुरळ येतात किंवा त्वचा काळी पडते. असे होऊ नये यासाठी आपण किचनमधील दोन पदार्थांचा वापर करून नैसर्गिकरित्या, वेदना होऊ न देता अगदी सहजपणे अप्पर लिप्स करु शकतो. घरच्याघरीच किचनमधील रोजच्या वापरातील पदार्थांचा वापर करुन अप्पर लिप्स करण्याची सोपी पद्धत पाहूयात.  

आता अप्पर लिप्स करताना दुखणार नाही कारण... 

अप्पर लिप्स करण्यासाठी आपण शक्यतो थ्रेडींग-वॅक्सिंग या दोन पर्यायांपैकी एक निवडतो. परंतु थ्रेडींग असो किंवा वॅक्सिंग ओठांवरच्या नाजूक त्वचेवरील केस काढायचे म्हणजे वेदना होतात. परंतु वेदनारहित अप्पर लिप्स करायचे असल्यास आपण किचनमधील काही रोजच्या वापरातील पदार्थांचा वापर करु शकतो. हे पदार्थ वापरुन आपण नैसर्गिकरित्या वेदनारहित अगदी सहजपणे ओठांवरील केस काढू शकतो.

आठवड्यातून एकदा केसांना दही लावण्याचे पाहा ३ फायदे, केसगळती बंद-कोंडा कमी आणि...

वयाच्या तिशीनंतर खालावते ‘कोलेजन’ची पातळी, त्वचा दिसते म्हातारी; खा ८ गोष्टी-दिसा कायम तरुण... 

१. दूध आणि बेसन :- अप्पर लिप्स काढण्यासाठी आपण दूध आणि बेसनाचा वापर करु शकता. यासाठी एका बाऊलमध्ये दूध आणि बेसन समप्रमाणात घेऊन त्याची थोडी जाडसर, घट्ट पेस्ट तयार करून घ्यावी. ही तयार पेस्ट अप्पर लिप्स वरील केसांवर हलकेच बोटाने लावून मसाज करून घ्यावा. त्यानंतर ही पेस्ट थोडी सुकू द्यावी. जेव्हा ही पेस्ट सुकेल तेव्हा हळूवारपणे त्वचेवर स्क्रब करून घ्यावे. स्क्रबिंग करताना हळूहळू ओठांवरील केस निघून जाऊ लागतील. या पद्धतीने तुम्ही कोणत्याही वेदनेशिवाय ओठांचे केस नैसर्गिकरित्या काढू शकाल.   

प्राजक्ता कोळी म्हणते महागडे ब्यूटी प्रॉडक्ट्स कशाला, मी करते घरगुती उपाय कारण...

२. मध आणि साखर :- दूध आणि बेसनाप्रमाणेच आपण अप्पर लिप्स काढण्यासाठी मध आणि साखरेचा देखील वापर करु शकता. साखर मिक्सरमध्ये हलकेच वाटून त्याची थोडी जाडसर पावडर तयार करून घ्यावी. साखरेत थोडा मध मिसळून त्याची पेस्ट करून घ्यावी. ही तयार पेस्ट ओठांवर लावून घ्यावी. थोड्या वेळासाठी ही पेस्ट ओठांवर तशीच लावून ठेवावी. मग हलकेच स्क्रब करुन ओठांवरील केस काढून घ्यावे. अशाप्रकारे ओठांवरचे केस काढण्यासाठी थ्रेडिंग किंवा वॅक्सिंगची गरजच लागणार नाही. हे वरील दोन उपाय करुन तुम्ही नैसर्गिक पदार्थांच्या मदतीने ओठांवरचे केस अगदी सहजपणे काढू शकता.

Web Title: How To Remove Upper Lip Hair Naturally Without Pain How to keep upper lips clean without threading Waxing

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.