Lokmat Sakhi >Beauty > अप्पर लिप्स करताना खूप दुखते, रॅश येते? ५ टिप्स- न दुखता करता येतील अप्पर लिप्स...

अप्पर लिप्स करताना खूप दुखते, रॅश येते? ५ टिप्स- न दुखता करता येतील अप्पर लिप्स...

How To Remove Upper Lip Hair Without Pain :अप्पर लिप्स करताना थोडी काळजी घेणे गरजेचे आहे जेणेकरुन स्किनचे कोणत्याही प्रकारचे नुकसान होणार नाही.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2023 01:33 PM2023-03-27T13:33:16+5:302023-03-27T13:50:20+5:30

How To Remove Upper Lip Hair Without Pain :अप्पर लिप्स करताना थोडी काळजी घेणे गरजेचे आहे जेणेकरुन स्किनचे कोणत्याही प्रकारचे नुकसान होणार नाही.

How To Remove Upper Lip Hair Without Pain | अप्पर लिप्स करताना खूप दुखते, रॅश येते? ५ टिप्स- न दुखता करता येतील अप्पर लिप्स...

अप्पर लिप्स करताना खूप दुखते, रॅश येते? ५ टिप्स- न दुखता करता येतील अप्पर लिप्स...

बहुतेक आपल्या शरीराच्या सगळ्या अवयवांवर छोटे छोटे केस असतात. शरीराच्या काही अवयवांवरचे हे अतिरिक्त केस विशेषतः महिला थ्रेडींग किंवा वॅक्सिंगने किंवा इतर पद्धतीने काढतात. महिला हात, पाय, अंडरआर्म्स, आयब्रो, अप्पर लिप्स यांसारख्या भागांवरचे केस हमखास काढतात. चेहऱ्याची सुंदरता अधिक उठून दिसावी म्हणून महिला आयब्रो व अप्पर लिप्स करतात. आयब्रो व अप्पर लिप्समुळे जशी चेहेऱ्याची सुंदरता वाढते तशीच त्यात जर काही चूक झाली तर चेहेरा विचित्र दिसू शकतो. आयब्रो आणि अप्पर लिप्स या दोन्ही भागावरील केसांची वाढ लगेच होत असल्याकरणाने महिला ते काढण्यासाठी पार्लरमध्ये जातात. 

आयब्रो आणि अप्पर लिप्स या भागांवरील स्किन तशी फारच नाजूक असते. थ्रेडींग किंवा वॅक्सिंग करताना या नाजूक भागाला देखील इजा होऊ शकते. चेहेऱ्याची सुंदरता अधिक खुलून येण्यासाठी आयब्रो, अप्पर लिप्स करत असलो तरीही ते करताना फार दुखते. काहीवेळा त्या भागावर रॅश येणे, रिअ‍ॅक्शन्स, सूज येणे, स्किन लाल होणे यांसारख्या छोट्या - छोट्या समस्या उद्भवतात. जर आपण पार्लरमध्ये जाऊन अप्पर लिप्स करत असाल तर ते करताना थोडी काळजी घेणे गरजेचे आहे जेणेकरुन स्किनला कोणत्याही प्रकारचे नुकसान होणार नाही(How To Remove Upper Lip Hair Without Pain).     

अप्पर लिप्स करताना नक्की कोणती काळजी घ्यावी ?

१. योग्य पद्धत माहिती असणे :- अप्पर लिप्स करताना ते कसे करायचे याची योग्य पद्धत माहिती असणे गरजेच आहे. अप्पर लिप्स करताना आपण आपल्या जिभेची मदत घेतो. अप्पर लिप्स करताना आपण आपली जीभ तोंडाच्या आतल्या बाजुंनी वर ओठांना चिकटवतो. असे केल्याने आपल्याला अप्पर लिप्स करताना  आधार मिळतो. असे केल्याने थ्रेडींग चांगल्या पद्धतीने होते व ओठांवरील सगळे केस व्यवस्थित काढले जातात. आपण काहीवेळा खूप दिवसांनंतर अप्पर लिप्स करतो अशावेळी आपल्याला अप्पर लिप्स करतानाची योग्य पद्धत माहिती असणे गरजेचे असते. खूप दिवस उलटून गेल्यानंतर जर आपण अप्पर लिप्स करत असाल अशावेळी जर आपल्याला फारच दुखत असल्यास आपल्या ब्यूटिशियनला थोडावेळ थांबण्यास सांगावे. तसेच दोन्ही नाकपुड्यांच्या अगदी जवळ थ्रेडींग करणे टाळावे. नाकाच्या अगदी जवळ थ्रेडींग केल्याने त्याजागी छोटे - छोटे पिंपल्स येण्याची शक्यता असते. 

२. योग्य जागेवर थ्रेडींग करावे :- अप्पर लिप्स करताना योग्य जागेवर थ्रेडींग करावे. अप्पर लिप्स करताना केवळ ओठांच्या वरच्या भागातच अप्पर लिप्स करावे. ब्यूटिशियनला अप्पर लिप्स करण्याची योग्य जागा माहित असली पाहिजे. काहीवेळा ब्यूटिशियन गालावरचे किंवा ओठांच्या आसपासच्या इतर भागातील केस देखील थ्रेडींग करुन काढतात. यामुळे चेहेऱ्यावरील अतिरिक्त केस काढल्याने चेहरा दिसताना विचित्र दिसतो. अशावेळी अप्पर लिप्स करताना आपल्या ब्यूटिशियनला अप्पर लिप्स करण्याची योग्य जागा माहित असली पाहिजे.

३. स्किनला सूट होणाऱ्या क्रिमचा वापर करा :- अप्पर लिप्स करण्याआधी किंवा नंतर फार दुखू नये, इजा होऊ नये, केस लगेच निघावेत म्हणून, स्किन ड्राय न होण्यासाठी म्हणून क्रिमचा वापर केला जातो. परंतु आपण लावत असलेली क्रिम आपल्या  स्किनला सूट होणारी आहे की नाही याची खबरदारी घ्यावी. काहीवेळा या क्रिम्समुळे देखील ओठावर रिअ‍ॅक्शन होऊन त्याभागावर पुरळ किंवा पिंपल्स येण्याची शक्यता असते. त्यामुळे अप्पर लिप्स केल्यानंतर त्याभागावर क्रिम्सचा वापर करताना आपल्याला ती क्रिम सूट होते की नाही याचा विचार करावा. 

४. स्किन ड्राय होणार नाही हे पहावे :- अप्पर लिप्स करताना आपली स्किन ड्राय नाही, याची खात्री करुन घ्यावी. जर ड्राय स्किनवर अप्पर लिप्स केल्यास तिथली स्किन सोलवटली जाण्याची शक्यता असते. त्यामुळे नेहमी अप्पर लिप्स करण्याआधी आणि नंतर तिथली स्किन मॉइश्चराइज करुन घ्यावी. ओठांवरील स्किन संपूर्णपणे मॉइश्चराइज केल्यानंतरच अप्पर लिप्स करावेत. 

५. वॅक्सची मदत घ्यावी :- अप्पर लिप्स करण्यासाठी थ्रेडींगसोबत आपण वॅक्सचा देखील वापर करु शकतो. थ्रेडींग करताना जर आपल्याला फार दुखत असेल तर अशावेळी वॅक्सची मदत घ्यावी. सध्याच्या काळात अप्पर लिप्स वॅक्सिंग फारच ट्रेंडमध्ये आहे. वॅक्सच्या एकाच वापरात आपले अप्पर लिप्स न दुखता सहज  निघू शकतात.     

आयब्रो करताना वेदना होवू नयेत म्हणून ७ टिप्स, आग होणे विसरा आणि करा न घाबरता आयब्रो...

अप्पर लिप्स करण्यापूर्वी :- 

1) थ्रेडिंग करण्यापूर्वी ती जागा डेटॉल किंवा अँस्ट्रोजनच्या साहाय्याने चांगल्याप्रकारे स्वच्छ करावी.
2) त्यानंतर त्या भागांवर पावडर लावावी त्यामुळे आपल्या चेहर्‍यावरील घाम तसेच तेल कमी होण्यास मदत होईल.
3) थ्रेडिंग केल्यानतंर जर रँशेज किंवा स्किन लाल झाल्यास त्यावर मॉइश्चराइजर लावावे.

Web Title: How To Remove Upper Lip Hair Without Pain

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.