उन्हाळा सुरु झाला की, आपण त्वचेची काळजी घेतो. पंरतु, अनेकदा पायांकडे दुर्लक्ष होते. (How to Repair Cracked Heels Fast) पायांना भेगा पडणे, काळे पडणे किंवा नखात घाण साचणे यांसारख्या समस्या वाढतात. वाढत्या उन्हाचा आपल्या त्वचेवर अधिक परिणाम होतो.(Instant Foot Care) टाचा आपल्या शरीराचा अत्यंत महत्त्वाचा भाग आहे पण त्याची काळजी घेणेही महत्त्वाचे आहे. (How to Repair Cracked Heels at Home)
पायांवर पडणारे काळे चट्टे, नखांचे सौंदर्य याचा आपण विचार करतो. (Moisturizing and Softening Your Feet with Easy Home Remedies) परंतु, टाचांना भेगा पडतात, टाचा अगदी फाटतात अशावेळी उपाय करण्याऐवजी दुर्लक्ष करतो. यात पाणी किंवा घाण अडकल्यामुळे आपले दुखणे वाढते. (Cracked Heel Repair) टाचा सुंदर दिसण्यासाठी त्या फाटलेल्या किंवा त्यांना भेगा नसाव्यात. काही घरगुती उपाय केले तर टाचा पु्न्हा नव्यासारख्या होतील. त्याच्या भेगा देखील भरून निघतील. ज्यामुळे आपल्या सौंदर्यात आणखी भर पडेल. (Best Natural Remedies for Healthy Feet)
1. पाय स्वच्छ करण्यासाठी
टाचा स्वच्छ करण्यासाठी एका भांड्यात दही ४ ते ५ चमचे, २ चमचे शाम्पू, १ इनोचे पॅकेट घेऊन सगळं नीट व्यवस्थित मिक्स करा. सर्व मिश्रण पायांना व्यवस्थित लावून चोळून घ्या. त्यानंतर स्पंजने पाय स्वच्छ पुसून घ्या. पायांवरील काळे चट्टे निघण्यास मदत होईल.
2. टाचांच्या भेगा भरण्यासाठी
काचेच्या बाऊलमध्ये मेणबत्तीचे तुकडे आणि १ चमचा व्हॅसलीन घाला. कढईत पाणी घालून ते काचेचा बाऊल त्यात ठेवून मेण वितळवून घ्या. त्यानंतर हे मिश्रण संपूर्ण तळव्याला लावा. त्यावर प्लास्टिकची पिशवी लावून १० मिनिटे ठेवा, चांगले चोळून घ्या. यामुळे टाचांच्या भेगा भरण्यास मदत होईल. आठवड्यातून दोन वेळा उपाय केल्याने फायदा होईल. तसेच टाचा मऊ आणि सुंदर होतील.
3. टाचांना मऊ करण्यासाठी
आपली टाच मऊ आणि सुंदर दिसण्यासाठी रोज रात्री पाय स्वच्छ धुवा. नंतर त्यावर हलक्या हातांनी क्रीम लावा. हा उपाय रोज केल्याने भेगा भरून निघण्यास मदत होईल.
4. टाचांना भेगा पडल्यावर?
टाचांना भेगा पडल्यानंतर त्या पायाचे सौंदर्य खराब करतात. टाचा जास्त फाटल्या असतील तर चालताना त्रास होतो. त्या अधिक दुखतात. सतत पाण्यात काम करणे आणि चुकीच्या आहारामुळे टाचांना भेगा पडतात. शरीराला पुरेशा प्रमाणात व्हिटॅमिन्स आणि जीवनसत्त्व न मिळाल्याने टाचा फाटतात. यासाठी त्वचेची जितकी काळजी आपण घेतो तितकीच टाचांची देखील घ्यायला हवी.