काही अपवाद सोडले तर जवळपास बहुतांश जणी नेलपेंट लावतातच.. बऱ्याचदा असंही होतं की आपल्याकडे बऱ्याच नेलपेंट असतात त्यामुळे आपण त्यांचा आलटून पालटून वापर करतो. त्यामुळे त्यांच्यापैकी एखादी नेलपेंट मग सुकते. नेमकी तीच शेड आपल्याला हवी असते. अशावेळी ती सुकलेली नेलपेंट पुन्हा पातळ करण्यासाठी अनेक जणी थीनर वापरतात. पण प्रत्येकीच्या घरी थीनर असेलच असं नाही. म्हणूनच हा एक अगदी सोपा उपाय पाहून घ्या (simple home hacks to reuse dry nail paint). हा उपाय करून तुम्हाला तुमची बाटलीमध्ये घट्ट झालेली, सुकलेली नेलपेंट पुन्हा वापरण्याजोगी पातळ करता येईल.(how to reuse dry nail polish again?)
बाटलीमधली नेलपेंट वाळून घट्ट झाली असेल तर काय करावे?
बाटलीमधली नेलपेंट घट्ट झाली असेल तर ती पुन्हा वापरात आणण्यासाठी कोणता घरगुती उपाय करता येऊ शकतो, याविषयी माहिती सांगणारा व्हिडिओ shiprarai2000 या इंस्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आला आहे.
चैत्रगौर डेकोरेशनसाठी खास आयडिया- सगळ्यांपेक्षा आकर्षक होईल तुमच्या घरची सजावट
हा उपाय करण्यासाठी सगळ्यात आधी तर एका भांड्यामध्ये पाणी गरम करायला ठेवा. पाणी चांगलं तापलं की मग त्यावर चाळणी ठेवा. भांड्यामधलं पाणी उकळायला लागलं तरी ते चाळणीच्या छिद्रांमधून बाहेर येणार नाही एवढंच पाणी पातेल्यात असावं याची काळजी घ्या.
आता तुमच्याकडची जी नेलपेंट सुकली आहे ती या चाळणीवर ठेवा आणि वरून एखादं झाकण ठेवा. १ ते २ मिनिटं गरम पाण्याच्या वाफेमध्ये नेलपेंटची बाटली राहू द्या.
तुपापासून फक्त २ मिनिटांत तयार होतं विकतसारखं मस्त बटर- बघा एकदम सोपी रेसिपी
यानंतर गॅस बंद करा. नेलपेंटची बाटली चाळणीतून बाहेर काढा. एखाद्या मिनिटाने नेलपेंटच्या बाटलीचं झाकण उघडून पाहा. नेलपेंट पातळ झालेली दिसेल आणि नखांवरही अगदी छान बसेल.