Join us  

वापरलेली ग्रीन टी- बॅग फेकून देऊ नका, हाताचे सौंदर्य खुलवण्यासाठी वापरा, हात होतील मऊ- मुलायम, सुंदर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 16, 2023 2:07 PM

Beauty Tips For Tanned Hands And Feet: चहा करून झाला की ग्रीन टी बॅग (green tea bag) फेकून दिली जाते. पण टॅन झालेले हात स्वच्छ करण्यासाठी तिचा खूप चांगला वापर करता येतो.

ठळक मुद्देतुमचेही हात अकाली सुरकुत्यासारखे वाटत असतील किंवा खूप टॅन झाले असतील, तर हा एक उपाय करून बघा...

चेहऱ्याची आपण खूप चांगली काळजी घेतो. पण त्या नादात कधी- कधी हातांकडे आणि पायांकडे मात्र दुर्लक्ष होते. त्यामुळे मग हात आणि पाय काळवंडलेले दिसतात. काही जणांच्या बाबतीत तर कमी वयातच हात कोरडे झालेले आणि सुरकुतलेले वाटू लागतात. कारण आपण चेहऱ्याला तर व्यवस्थित मॉइश्चराईज ठेवतो. पण हातांना- पायांना मॉइश्चराईज करणे विसरून जातो. तुमचेही हात अकाली सुरकुत्यासारखे वाटत असतील किंवा खूप टॅन झाले असतील (How to get rid of tanned hands and feet), तर हा एक उपाय करून बघा...(Homemade scrub for hands and leg)

 

हात टॅन झाले असतील, ड्राय झाले असतील तर उपायहा उपाय mysha_beauty_queen या इन्स्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आला असून तो करून बघण्यासाठी आपल्याला फक्त ४ गोष्टी लागणार आहेत.१. वापरून झालेली १ ग्रीन टी बॅग

२. १ टीस्पून कॉफी पावडर

बूट ओलसर राहिल्याने कुबट वास येतो? ३ उपाय, बुटांमधली दुर्गंधी होईल गायब

३. १ टीस्पून तांदळाचे पीठ 

४. १ टीस्पून दही किंवा ताक

 

हातांसाठी डी- टॅन लेप करण्याची आणि वापरण्याची पद्धत१. ग्रीन टी बॅग फोडून तिच्यातली पावडर एका वाटीत काढून घ्या. 

२. त्यातच तांदळाचे पीठ, कॉफी पावडर आणि दही किंवा ताक टाका. सगळं मिश्रण व्यवस्थित हलवून घ्या. हा झाला तुमच्यासाठी नॅचरल स्क्रब तयार.

रोजचं भाजी- वरण होईल खमंग- चविष्ट, फक्त 'हा' सिक्रेट पदार्थ करून ठेवा आणि घाला, बघा रेसिपी

३. आता हात थोडेसे ओलसर करून घ्या. त्यानंतर तयार केलेला स्क्रब हातावर आणि पायावर चोळून लावा. या स्क्रबने ५ ते ७ मिनिटे हातांना आणि पायांना मालिश करा. त्यानंतर थंड पाण्याने हात- पाय धुऊन टाका. आठवड्यातून एकदा हा उपाय करावा. यामुळे हात आणि पाय स्वच्छ होण्यास मदत होईल. 

 

टॅग्स :ब्यूटी टिप्सहोम रेमेडीत्वचेची काळजी