Lokmat Sakhi >Beauty > गणपतीला वाहिलेली जास्वंदाची फुलं फेकू नका... केसगळती थांबविण्यासाठी त्याचा उपयोग करा, बघा तो नेमका कसा 

गणपतीला वाहिलेली जास्वंदाची फुलं फेकू नका... केसगळती थांबविण्यासाठी त्याचा उपयोग करा, बघा तो नेमका कसा 

How To Make Jaswand Hair Pack And Hair Oil: जास्वंदाच्या फुलाचे अनेक उपयोग आहेत. त्यामुळे गणेशोत्सवादरम्यान (ganpati festival)  गणपतीला वाहिलेली जास्वंदाची फुलं फेकू नका. उलट केसांसाठी त्यांचा कसा उपयोग करायचा ते बघा.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 31, 2022 01:18 PM2022-08-31T13:18:18+5:302022-08-31T13:19:19+5:30

How To Make Jaswand Hair Pack And Hair Oil: जास्वंदाच्या फुलाचे अनेक उपयोग आहेत. त्यामुळे गणेशोत्सवादरम्यान (ganpati festival)  गणपतीला वाहिलेली जास्वंदाची फुलं फेकू नका. उलट केसांसाठी त्यांचा कसा उपयोग करायचा ते बघा.

How to reuse Jaswand or Hibiscus flower, hibiscus hair pack and hair oil for hair fall  | गणपतीला वाहिलेली जास्वंदाची फुलं फेकू नका... केसगळती थांबविण्यासाठी त्याचा उपयोग करा, बघा तो नेमका कसा 

गणपतीला वाहिलेली जास्वंदाची फुलं फेकू नका... केसगळती थांबविण्यासाठी त्याचा उपयोग करा, बघा तो नेमका कसा 

Highlightsकेसांचं गळणं तर कमी होईलच पण केसांत खूप कोंडा होत असेल, तर तो घालविण्यासाठीही जास्वंदाच्या फुलांचा उपयोग होईल.

गणपतीला जास्वंदाचं फुल अतिप्रिय असतं. त्यामुळे आपण ते गणेशोत्सवात गणपतीला वाहतोच. काही काही घरांमध्ये तर गणपतीला जास्वंदाच्या फुलांची (Hibiscus flower) माळ घालतात. दुसऱ्यादिवशी ही फुलं सरळ निर्माल्यात टाकली जातात. पण जास्वंदाची फुलं (Jaswand) केसांच्या अनेक समस्या सोडविण्यासाठी अतिशय उपयुक्त आहेत, हे आपल्याला माहिती आहे. त्यामुळे गणपतीला वाहिलेली जास्वंदाची फुलं अजिबात निर्माल्यात टाकून देऊ नका. ही फुलं इतर निर्माल्यातून वेगळी करा आणि तुमच्या केसांसाठी त्याचा खास उपयोग करा. केसांचं गळणं (how to control hair fall) तर कमी होईलच पण केसांत खूप कोंडा (home remedies for dandruff) होत असेल, तर तो घालविण्यासाठीही जास्वंदाच्या फुलांचा उपयोग होईल.

 

केसांसाठी असा करा जास्वंदाचा उपयोग
१. निर्माल्यातील जास्वंदाच्या फुलांचा केसांसाठी वापर करायचा असल्यास सगळ्यात आधी ती फुलं व्यवस्थित धुवून घ्या. कारण पुजा करताना त्या फुलांवर हळद- कुंकू, गुलाल असं पडलेलं असण्याची शक्यता असते. 

२. जास्वंदाच्या फुलांचा उपयोग तुम्ही केसांसाठी तेल बनविण्यासाठी किंवा मग त्याचा हेअर पॅक बनविण्यासाठी करू शकता. या दोन्ही गोष्टी कशा करायच्या त्याची ही खास पद्धत. 

 

केसांसाठी जास्वंदाचं तेल
जास्वंदाची काही फुलं, असतील तर जास्वंदाची पानं, कढीपत्ता आणि विड्याची ३ ते ४ पानं एकत्र करा. हे सगळं मिश्रण मिक्सरमध्ये वाटून त्याची पेस्ट करून घ्या. पेस्ट जर एखादा कप भरून असेल तर त्यात साधारण दिड कप तेल टाका. हे सगळं मिश्रण पातेल्यात एकत्र करून उकळायला ठेवा. जेव्हा तेलातील फुलं किंवा पानांमधलं मॉईश्चर संपून जाईल आणि ते कुरकुरीत होतील, तेव्हा गॅस बंद करा. हे तेल गाळून घ्या आणि एका बरणीत भरून ठेवा. आठवड्यातून दोन वेळा रात्री झोपताना या तेलाने डोक्याला मसाज करा. केस गळणं कमी होईल.

 

जास्वंदाचा हेअरपॅक
- जास्वंदाची फुलं आणि दही एकत्र करून मिक्सरमध्ये वाटून घ्या. ही पेस्ट केसांच्या मुळांना लावा. एखाद्या तासाने केस धुवून टाका. केसांचं गळणं आणि केस अकाली पांढरे होण्याचं प्रमाण कमी होईल. 
 

Web Title: How to reuse Jaswand or Hibiscus flower, hibiscus hair pack and hair oil for hair fall 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.