Lokmat Sakhi >Beauty > पांढरे झालेले केस पुन्हा काळे करायचे तर करा ४ गोष्टी, आयुर्वेदतज्ज्ञ सांगतात...

पांढरे झालेले केस पुन्हा काळे करायचे तर करा ४ गोष्टी, आयुर्वेदतज्ज्ञ सांगतात...

How to Reverse Greying of Hair Naturally 4 Best Home Remedies : केस पांढरे व्हायला सुरुवात झाली असेल तर त्यासाठी कोणते उपाय करावेत हे सांगताहेत आयुर्वेदतज्ज्ञ डॉ. हंसाजी योगेंद्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2022 10:15 AM2022-07-25T10:15:13+5:302022-07-25T10:20:02+5:30

How to Reverse Greying of Hair Naturally 4 Best Home Remedies : केस पांढरे व्हायला सुरुवात झाली असेल तर त्यासाठी कोणते उपाय करावेत हे सांगताहेत आयुर्वेदतज्ज्ञ डॉ. हंसाजी योगेंद्र

How to Reverse Greying of Hair Naturally 4 Best Home Remedies : Do 4 things to turn gray hair back to black, says Ayurveda expert... | पांढरे झालेले केस पुन्हा काळे करायचे तर करा ४ गोष्टी, आयुर्वेदतज्ज्ञ सांगतात...

पांढरे झालेले केस पुन्हा काळे करायचे तर करा ४ गोष्टी, आयुर्वेदतज्ज्ञ सांगतात...

Highlightsकमी वयात केस पांढरे होऊ नयेत यासाठी घरच्या घरी करता येतील असे आयुर्वेदिक उपायएकदा केस पांढरे व्हायला लागले की ते काळे करण्यासाठी नेमके काय करायचे असा प्रश्न आपल्याला पडतो

केस हे आपल्या सौंदर्यातील महत्त्वाची गोष्ट असून ते लांबसडक आणि घनदाट असावेत असे प्रत्येक महिलेला वाटते. मात्र काही ना काही कारणांनी कधी केस खूप गळतात तर कधी त्यात कोंडा होतो आणि ते रुक्ष होतात. वय झाल्यावर शरीरातील मेलानिन कमी झाल्याने केस नकळत पांढरे व्हायला लागतात. पण अनेकदा कमी वयातच केस पांढरे झाल्याने आपण विनाकारण वयस्कर असल्यासारखे दिसायला लागतो. एकदा केस पांढरे व्हायला लागले की ते काळे करण्यासाठी नेमके काय करायचे असा प्रश्न आपल्याला पडतो. मग कधी डाय करुन तर कधी घरगुती उपायांनी पांढरे झालेले केस काळे करण्याचा आपण प्रयत्न करतो. आपली जीवनशैली, आहार-विहार, ताणतणाव यांमुळे केस पांढरे होण्याची शक्यता असते. अनेकदा आपण नियमितपणे केसांची आणि केसांच्या मुळांची योग्य रितीने काळजी घेत नाही. आता केस पांढरे व्हायला सुरुवात झाली असेल तर त्यासाठी कोणते उपाय करावेत हे सांगताहेत आयुर्वेदतज्ज्ञ डॉ. हंसाजी योगेंद्र (How to Reverse Greying of Hair Naturally 4 Best Home Remedies)...

(Image : Google)
(Image : Google)

१. जास्वंद - दही हेअर पॅक

४ चमचे दही आणि १ चमचा जास्वंदाच्या फुलाची पावडर एकत्र करा. ही पेस्ट एकजीव करुन ती केसांच्या मुळांशी लावा. ३० ते ४० मिनीटे हा पॅक केसांवर तसाच ठेवा. त्यानंतर केस कोमट पाण्याने धुवा. नैसर्गिक पदार्थांमुळे केसांना कोणताही अपाय तर होणार नाहीच पण पांढरे होणारे केसही काळे होण्यास मदत होईल. 

२. भृंगराज आणि आवळा तेल

भृंगराज तेलात हरीतकी आणि जटामासी असे केसांसाठी अतिशय उपयुक्त असे घटक असतात. या दोन्ही घटकांचा केसांचा पांढरेपणा कमी होण्यास चांगली मदत होते. रात्री झोपताना भृंगराज तेलात काही प्रमाणात आवळा तेल एकत्र करा आणि हे एकत्रित केलेले तेल केसांच्या मुळांना लावा. या दोन्ही तेलांमध्ये असणारे घटक केसांचे पोषण होण्यास उपयुक्त असतात. तसेच त्यामुळे केसांचा पांढरेपणा कमी होण्यासही मदत होते. तसेच या दोन्ही तेलांचा केसांची शाइन वाढण्यासही चांगला उपयोग होतो. केसांची वाढ चांगली होण्यासाठी आणि रक्तप्रवाह सुरळीत होण्यासाठी आवळ्याचे तेल उपयुक्त असते. 

३. अश्वगंधा 

अश्वगंधा ही आयुर्वेदातील एक अतिशय उपयुक्त अशी वनस्पती आहे. त्यामुळे मेलामाइनचे प्रमाण वाढण्यास मदत होते आणि केस पांढरे होण्याचे प्रमाण कमी होते. अश्वगंधामध्ये टायरोसिन नामक अमिनो अॅसिड असते ज्यामुळे मेलामाइनची निर्मिती होण्यास मदत होते. अनेकदा आपले केस रुक्ष झाल्याने फाटे फुटतात. पण अश्वगंधामुळे हे फाटे फुटण्याची समस्या कमी होते. अश्वगंधा पावडर किंवा अश्वगंधाच्या काड्या १० ते १५ मिनीट पाण्यात चांगल्या उकळवाव्यात. त्यानंतर या भांड्यावर झाकण ठेवून हे चांगले मुरू द्यावे. या पाण्यात मध आणि लिंबाचा रस घालून हे ग्लासभर पाणी चहासारखे प्यावे. त्यासोबत मखाना खाल्ला तर त्याचाही आणखी चांगला फायदा होतो. 

(Image : Google)
(Image : Google)

४. योगासने 

योगासने आरोग्यासाठी जितकी चांगली असतात तितकीच ती आपल्या सौंदर्यासाठीही चांगली असतात. विपरीत करणी, सर्वांगासन, हस्तपादासन, शिर्षासन अशी उलटे होण्याची आसने केसांच्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरतात. एरवी आपण कायम पायावर उभे असतो, त्यामुळे आपला रक्तप्रवाह हा खालच्या बाजुने होत असतो. मात्र डोक्याच्या बाजूला असलेली आसने केल्यास रक्तप्रवाह डोक्याकडे होतो आणि त्यामुळे केसांची चांगली वाढ होण्यास तसेच त्यांचा पांढरेपणा कमी होण्यास मदत होते. 


 

Web Title: How to Reverse Greying of Hair Naturally 4 Best Home Remedies : Do 4 things to turn gray hair back to black, says Ayurveda expert...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.