सणावाराचे दिवस आले की पटापट कपाटातून महागड्या साड्या, भारीभारीचे ड्रेस बाहेर निघतात. महागड्या साड्यांचे नाजूक पदर आणि भरजरी ओढण्या सांभाळताना अनेकींना नाकी नऊ येतात. कारण साडी किंवा ओढणी जेवढी महागडी तेवढा तिच्यात अधिक जीव असतो. म्हणूनच तर ती आपण अगदी जपून वापरतो. कधी कधी मात्र पदर- ओढणी कुठेतरी अडकून खचकन ओढल्या जाते आणि पदराला किंवा ओढणीला (saree/ dupatta pin up ideas) ज्या जागी पिन लावलेली असते, त्याठिकाणी ती फाटते (How to save Saree/dupatta from Safety Pins?). असं होऊ नये, यासाठी डॉली जैन यांनी एक सोपा उपाय सांगितला आहे.
कोण आहेत डॉली जैन?
डॉली जैन या सुप्रसिद्ध सेलिब्रिटी साडी ड्रेपर आहेत. त्यांच्याकडे साडी ड्रेपिंगच्या एक से एक आयडिया असून प्रोफेशनल साडी ड्रेपर म्हणून त्या ओळखल्या जातात. अनेक चित्रपटांमध्ये अभिनेत्रींना साडी नेसवून देण्याचं किंवा ओढणी कशी घ्यायची, याची स्टाईल ठरवण्याचं काम डॉली जैन यांच्याकडेच असतं. आलिया भटला तिच्या लग्नासाठी लेहेंगा- ओढणी ड्रेपिंगही डॉली यांनीच करून दिलं होतं.
पिनमध्ये अडकून साडी- ओढणी फाटू नये म्हणून...
महागड्या साड्यांच्या पदरांना किंवा भरजरी ओढण्यांना आपण बऱ्याचदा सांभाळत- घाबरत साडी पिन लावतो. कारण पदर किंवा ओढणी चुकून ओढल्या गेलीच तर ती फाटण्याची भिती असते.
प्लेन साडी- डिझायनर ब्लाऊज, दिसाल स्टनिंग! नवरात्र- दसऱ्यासाठी साडी खरेदीच्या १० खास आयडिया
साडीला आपण जी सेफ्टी पिन लावतो, त्या पिनेच्या खालच्या टोकाला एक गोलाकार भाग असतो. जेव्हा साडी किंवा ओढणी जोरात ओढल्या जाते तेव्हा पदराचा किंवा ओढणीचा भाग पिनला असलेल्या गोलकार भागात अडकून बसतो. आणि तिथून तो काढणं खूप अवघड असतं. कारण तो हमखास फाटतोच.
घाईघाई गरम पदार्थ खाताना जीभ पोळली? ३ उपाय, आग थांबून मिळेल पटकन आराम
असं होऊ नये म्हणून पिनेमध्ये आधी एखादा मोती किंवा बटन घालून ठेवा. जेणेकरून त्या गोलाकार भागात पदर- ओढणी अडकणार नाही, असा सल्ला डॉली यांनी दिला आहे.