Join us  

शॅम्पू लावताना ९० % लोकं ‘ही’ चूक हमखास करतात, हेअर स्टाइलिस्ट जावेद हबीब सांगतात योग्य पद्धत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 08, 2023 7:54 PM

How To Shampoo Right By Jawed Habib केसांना शॅम्पू लावण्याची ही एक चूक पडू शकते महागात, केस होतात कोरडे आणि...

प्रत्येक जण केस धुण्यासाठी शॅम्पूचा वापर करतो. आजीच्या काळातील महिला केस धुण्यासाठी शिकाकाई वापरायचे. ज्यामुळे त्यांचे केस घनदाट व काळेभोर दिसायचे. सध्या शॅम्पूमध्ये अनेक केमिकल रसायनांचा वापर केला जातो. ज्यामुळे केसांची योग्यरित्या वाढ होत नाही. केस गळणे, केसात कोंडा, केसांना फाटे फुटणे, केस विरळ होणे, ही समस्या अनेक महिला व पुरुष वर्गाला होत आहे.

केसांना शॅम्पू लावण्याची योग्य पद्धत माहित असणं गरजेचं आहे. अनेक जण डायरेक्ट केसांवर शॅम्पू लावतात, ज्यामुळे केस कोरडे होण्याची दाट शक्यता निर्माण होते. फेमस हेअर स्टाइलिस्ट जावेद हबीब यांनी केसांना शॅम्पू लावण्याची योग्य पद्धत सांगितली आहे. त्यांनी ही पद्धत आपल्या इन्स्टाग्रामवर शेअर केली आहे(How To Shampoo Right By Jawed Habib).

पातळ झालेले केस पुन्हा दाट करायचेत? घरात आहेत का हे ४ तेल, सोप्यात सोपे उपाय

केसांना शॅम्पू लावण्याची योग्य पद्धत कोणती

जावेद हबीब यांच्या मते, ''शॅम्पू नेहमी पाण्यात मिसळून लावावे. असे केल्याने शॅम्पूचे काही तोटे टाळण्यात येतात. जेव्हा आपण केसांना थेट शॅम्पू लावतो, तेव्हा त्यातील कंसंट्रेशनचे प्रमाण जास्त असते, व काही एक्टिव कंपाउंड केसांना नुकसान पोहोचवू शकतात. तसेच, पाण्यात न मिसळता शॅम्पू लावल्याने, त्यातील काही रसायने केसांना इजा पोहचवतात. त्यामुळे केसांच्या निगडीत समस्या वाढतात.''

मुठभर तांदळाचे करा फर्मेंटेड राइस वॉटर, केसांची होईल वाढ, हेअर ग्रोथसाठी उपयुक्त

शॅम्पू लावण्यापूर्वी केसांना तेलाने मसाज करा

शॅम्पू करण्यापूर्वी केसांना तेल लावणे फार महत्वाचे आहे. खरं तर, त्याचे बरेच फायदे आहेत. ते केसांना शॅम्पूच्या रसायनांमुळे होणाऱ्या नुकसानापासून वाचवते. दुसरे म्हणजे केसांचा रंग सुधारण्यास मदत होते, व त्यामुळे केसांना ताकद मिळते. याशिवाय केस कोरडे होण्यापासून वाचतात, व केस मॉइश्चराइज होतात.

टॅग्स :केसांची काळजीहोम रेमेडी