केस गळण्याच्या समस्येचा सामना सगळ्याच वयोगटातील लोकांना करावा लागत आहे. महागड्या हेअर केअर उत्पादननांचा वापर करूनही केसांचं गळणं थांबत नाही. अशावेळी केस वाढवण्यासाठी आणि नवीन केस येण्यासाठी काय करावं असा प्रश्न पडतो. (Benefits of pumpkin seeds for hair fall) तुम्हाला कल्पना नसेल पण भोपळ्याच्या बिया केसांसाठी खूप फायदेशीर असतात. या बीया केसांचं गळणं कमी करू शकतात (Hair care Tips) आणि केसांना चमक परत देऊ शकते. केसांची वाढ आणि कोंडा मुळापासून दूर करण्यासाठी देखील हे गुणकारी आहे. जर तुम्हाला तुमच्या कोरड्या आणि खराब केसांचा त्रास होत असेल तर त्यासाठी तुम्ही भोपळ्याच्या बियांचाही वापर करू शकता. (How To Stop Hair Fall Faster)
जस्त, सेलेनियम, तांबे, मॅग्नेशियम, लोह, कॅल्शियम आणि जीवनसत्त्वे अ, ब आणि क ही पोषक आणि खनिजे भोपळ्याच्या बियांमध्ये आढळतात. हे केस पातळ होण्यापासून रोखण्यास मदत करतात. तुम्ही या बीया भाजून संध्याकाळच्या चहासोबतही खाऊ शकता.
१) जर तुमचे केस वेगाने गळत असतील तर ते थांबवण्यासाठी तुम्ही भोपळ्याच्या बिया वापरू शकता. यामुळे केस लवकर वाढतात आणि चमकदार होतात. याचा समावेश तुम्ही तुमच्या रोजच्या आहारात करू शकता. याच्या बियांमध्ये आढळणारे घटक केसांना आतून पोषण देतात. केसांना पोषण देण्यासाठी भोपळ्याचे दाणे भाजून खाऊ शकता. संध्याकाळच्या नाश्त्यात चहासोबतही घेऊ शकता.
किडनी फेल झाल्याचं संकेत असू शकतो लघवीच्या रंगात झालेला 'असा' बदल; वेळीच समजून घ्या लक्षणं
२) केसांची सर्वात मोठी समस्या म्हणजे कोंडा. कोंडा झाला की तो सहजासहजी निघून जात नाही आणि त्यामुळे केस गळू शकतात. यामुळे तुमची टाळू तेलकट होऊ शकते किंवा खाज सुटू शकते. भोपळ्याच्या बियांमध्ये अँटी-डँड्रफ गुणधर्म आढळतात, ज्यामुळे टाळूची खाज आणि जळजळ कमी होण्यास मदत होते. याशिवाय केस गळतीही कमी होते. यासाठी तुम्ही भोपळ्याच्या बियांचे तेल वापरू शकता. रात्री झोपण्याच्या अर्धा तास आधी या तेलानं केसांना मसाज करून चांगल्या शाम्पूने केस धुवा. यावेळी बाहेर पडू नका कारण यामुळे टाळूवर घाण बसू शकते आणि केस खराब होऊ शकतात. त्यामुळे रात्री तेल लावा आणि सकाळी केस धुवा.
३) अनेकवेळा केस फारसे गळत नाहीत आणि टाळूमध्ये समस्या उद्भवत नाहीत परंतु पोषणाच्या अभावामुळे केस सुंदर आणि निरोगी दिसत नाहीत. अशा परिस्थितीत केसांचा कोरडेपणा तुमचा लुक खराब करू शकतो. यामुळे केस निर्जीव दिसू लागतात आणि पातळ होण्याची समस्या देखील होऊ शकते. यासाठी केसांमध्ये भोपळा हेअर मास्क लावू शकता. यामुळे केसांचे पोषण होते आणि ते सुंदर आणि जाड दिसतात.
नसांना चिकटलेल्या घातक कोलेस्ट्रॉलला बाहेर काढतील ५ फळं; रोज खा, गंभीर आजारांपासून लांब राहाल
भोपळ्याच्या बियापासून केसांचा मास्क तयार करण्यासाठी, आपण भोपळ्याच्या बिया मिसळू शकता. नंतर त्यात खोबरेल तेल किंवा ऑलिव्ह ऑईल घाला. याशिवाय तुम्ही त्यात वाळलेल्या मेथीची पावडर किंवा हिबिस्कसची फुलेही घालू शकता. सर्वकाही नीट मिसळल्यानंतर त्याचा पॅक तयार करा आणि केसांना लावा. अर्धा तास कोरडे ठेवल्यानंतर चांगले धुवा आणि केसांना कंडिशनर लावा.
४) तुमचे केस कोरडे असतील तर ते तुटण्याची शक्यता जास्त असते. तसेच, केसांना फाटे फुटू शकतात आणि मुळाशी कमकुवत होऊ शकतात. कोरडेपणामुळे केस अधिक तुटतात, त्यामुळे केसांमध्ये भोपळ्याच्या बिया वापरा. यामुळे केस सुंदर, स्थिर आणि आकर्षक दिसतात. भोपळ्याचे तेल केसांमध्ये थोडेसे गरम करून लावू शकता. हे केसांना पोषण देते आणि टाळूची चांगली मालिश देखील करू शकता. तुम्हाला हवे असल्यास, भोपळ्याच्या बिया भिजवल्यानंतर त्या पाण्यानं तुम्ही तुमचे केस पाण्याने धुवू शकता.