Join us

कंगव्यात केसांचे भरपूर पुंजके अडकतात? ३ उपाय, १ आठवड्यात केस वाढतील-दाट होतील

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2025 13:55 IST

How To Stop Hair Fall : काही घरगुती उपाय करून तुम्ही केसांचं गळणं थांबवू शकता. ज्यामुळे केसांचे आरोग्य चांगले होईल. (How To Stop Hair Fall)

केस गळणं (Hair Fall) ही एक सामान्य समस्या आहे.  केस जास्त प्रमाणात गळणं ही चिंतेची बाब आहे. याचा अर्थ असा की शरीरात पोषक तत्वांची  कमतरता भासत आहे. अशा स्थितीत खाण्यापिण्यात व्हिटामीन सी, ई, आयर्न भरपूर पोषक तत्वांचा समावेश करायला हवा. (Best Ways To Stop Hair Loss) याव्यतिरिक्त काही घरगुती उपाय तुम्ही केसांचं गळणं थांबवू शकता. ज्यामुळे केसांचे आरोग्य चांगले होईल. (How To Stop Hair Fall)

आवळा आणि नारळाचं तेल

आवळा केसांसाठी बराच फायदेशीर ठरतो. २ चमचे आवळा पावडर घ्या. त्यात २ चमचे नारळाचं तेल मिसळा. नंतर केसांच्या मुळांना व्यवस्थित लावून घ्या. (Hair Care Tips How To Stop Hair Fall) ३० मिनिटं तसंच लावून सोडून द्या. नंतर कोमट पाण्यानं केस धुवून घ्या. हा उपाय आठवड्यातून २ ते ३ वेळा करा.  ज्यामुळे केस गळणं थांबेल आणि केस  मजबूत होतील. 

हळदी कुंकवासाठी ५० रुपयांपेक्षा कमी किमतीत घ्या सुंदर दागिने, वाण असे की सर्वांना आवडेल

आवळ्यात आवश्यक व्हिटामीन्स असतात. ज्यातील  व्हिटामीन सी कोलेजन प्रोटीन शोषण्यास साहाय्य  करतात. जेव्हा तुम्ही आवळ्याचं पाणी पिता तेव्हा केसांची मुळं मजबूत होतात. केस निरोगी राहतात आणि स्काल्पला पोषण मिळते.

मेथी दाण्यांचा हेअर पॅक

मेथी दाणे केस वाढवण्यासाठी आणि केसांच्या मुळांना मजबूती देण्यास मदत करतात. ज्यामुळे केस गळणं, केस तुटणं रोखता येतं. दह्यातील प्रोटीन आणि व्हिटामीन केसांना भरपूर पोषण देते. अशा स्थितीत तुम्ही रात्री २ चमचे मेथीचे दाणे रात्रभर पाण्यात भिजवून ठेवा.

प्रोटीनसाठी 'हे' पदार्थ खाता पण त्यात प्रोटीन आहे का? आहारतज्ज्ञ सांगतात, कोणत्या पदार्थांत प्रोटीन नसतं..

नंतर सकाळी मेथीचे दाणे वाटून पेस्ट बनवून घ्या. नंतर ही पेस्ट केसांच्या मुळांना लावा. ३० मिनिटांनी ही पेस्ट केसांना लावून शॅम्पूनं केस धुवा. आठवड्यातून २ ते ३ वेळा हा उपाय करा. ज्यामुळे केस गळणं कमी होईल आणि केस  मुलायम होतील.

या गोष्टींची काळजी  घ्या

केसांचं तुटणं, गळणं कमी करण्यासाठी रात्री केसं घट्ट बांधू नका. यामुळे हेअर फॉलिकल्सवर दबाव येतो. ज्यामुळे केस कमजोर होतात आणि तुटू लागतात.

टॅग्स :ब्यूटी टिप्सत्वचेची काळजी