लांब दाट केसांमुळे व्यक्तिमत्व खुलून दिसंत. आजकाल चुकीच्या खाण्यापिण्याच्या सवयी, स्ट्रेटनिंगसारख्या हेअर ट्रिटमेंट्स करणं, हिटिंग टुल्सचा वापर आणि वाढत्या प्रदूषणामुळे कमीत वयातच केस गळण्याच्या त्रासाचा सामना करावा लागवा लागतो. पुन्हा चांगले केस उगवण्यासाठी काहीजण पार्लर ट्रिटमेंट्स घेतात तर काहीजण औषधांचे सेवन करतात. (Home Remedy for Hair Problems) यामुळे खर्चही होतो आणि काही उत्पादनांचे रिजल्ट्स हे तात्पुरतेच दिसतात.
हेअर फॉलची समस्या रोखण्यासाठी घरगुती तेल वापरल्यास केसांनाही याचा पुरेपूर फायदा मिळतो. केस वाढवण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारची तेलं, शॅम्पू बाजारात उपलब्ध आहेत. याऐवजी तुम्ही घरच्याघरी सोप्या पद्धतीनं सिरम, तेल तयार करून केसांची काळजी घेऊ शकता. (Hair Care Tips)
घरगुती तेल कसे बनवायचे?
हे तेल बनवण्यासाठी सगळ्यात आधी एक कांदा कापून त्याची पेस्ट बनवून घ्या. ही पेस्ट चाळणीमध्ये घालून रस काढून घ्या. आता कांद्याच्या रसात एक टेबलस्पून एलोवेरा जेल आणि राईचं तेल मिसळा. आता हे तेल टाळूला आणि केसांच्या लांबीला लावा. ५ मिनिटं या तेलानं मसाज करा. आता अर्धा तास हे तेल केसांना लावलेलं राहूद्या. नंतर हेअर वॉश करा. हा उपाय आठवड्यातून दोनवेळा करा. यामुळे तुमच्या केसांच्या लांबीत सुधारणा झालेली दिसेल, हेअर फॉलही जास्त होणार नाही. याशिवाय केस वाढणं सुरू होईल.
दुसरा उपाय
हे तेल बनवण्यासाठी सगळ्यात आधी १ टेबलस्पून मेथी, एक टेबलस्पून कलौंजीच्या बीया, फिल्टर वॉटर घ्या. एक लहान भाडं गॅसवर गरम करण्यासाठी ठेवा. त्यात मेथी, कलौंजीच्या बीया आणि पाणी घालून ५ मिनिटांसाठी उकळवून घ्या. हे द्रावण थंड झाल्यानंतर एका स्प्रे बॉटलमध्ये भरून ठेवा.
हा होममेड स्प्रे तुम्ही १५ दिवसांसाठी फ्रिजमध्ये स्टोअर करून ठेवू शकता. हा स्प्रे रोज केसांना लावून रात्रभर लावून तसंच ठेवा. यामुळे तुमची हेअर ग्रोथ चांगली होईल. याशिवाय पुळ्या, टक्कल पडणं, केस तुटणं, केसांना फाटे फुटणं या समस्यांवरही आराम मिळेल.