केस वाढवण्यासाठी बरेच घरगुती उपाय आहेत पण याचा फारसा उपयोग होताना दिसत नाही. केसांना काय लावावं काय लावू नये याबाबत अनेकांच्या मनात संभ्रम असतो. दाट, लांबसडक केस सर्वांनाच आवडतात पण सध्याच्या लाईफस्टाईलमध्ये लांब केस मिळवणं खूपच कठीण झालंय. (How to grow hairs naturally rice water with fenugreek for hair growth)
प्रत्येकाच्या घरात रोज तांदळापासून तयार केलेले पदार्थ बनवले जातात. याचाच उपयोग तुम्ही केसांवरही करू शकता. तांदूळ आणि मेथीच्या पाण्याचं मिश्रण केसांसाठी कमालीचं ठरतं. केस धुण्यासाठी नैसर्गिक कॉम्पोनेंट्सचा उपयोग केल्यास स्काल्प आणि हेअर ग्रोथ होण्यास प्रोत्साहन मिळते. यामुळे केस गळणं कमी होतं आणि केस मजबूत बोतात. (How to stop hair fall)
मेथीच्या बीया केस गळणं कमी करण्यासाठी आणि चांगल्या केसांच्या वाढीसाठी उपयुक्त ठरतात. मेथीच्या बीया आयर्न, प्रोटीनचा एक उत्तम स्त्रोत आहेत. केसांच्या वाढीसाठी मेथीच्या बीया फायदेशी ठरतात. याव्यतिरिक्त मेथीच्या बीया फॉलिक एसिड, व्हिटामीन ए, के आणि व्हिटामीन सी, पोटॅशियम, कॅल्शियमसारख्या खनिजांचा भंडार आहेत.
केसांसाठी तांदळाच्या पाण्याचे फायदे
केसांची अशी कोणतीही समस्या नाही ज्यावर तांदळाचं पाणी गुणकारी ठरत नाही. याव्यतिरिक्त व्हिटामीन, एमिनो एसिड्स आणि अन्य ट्रेस मिनरल्स जसं की जिंक, मॅग्नेशियन, व्हिटामीन बी, सी यात मोठ्या प्रमाणात असते. याशिवाय एंटी ऑक्सि़डेंट्सही भरपूर प्रमाणात असतात. तांदळाच्या पाण्याचा उपयोग केल्यानं केस सहज विंचरले जातात. कंडिशनरमध्येही याचा वापर केला जातो.
केसांना लावण्यासाठी मेथी आणि तांदळाचं पाणी कसं बनवावं?
मेथीचे दाणे रात्रभर पाण्यात भिजवून ठेवा. सकाळी अर्धा कप तांदळात १ कप पाणी मिसळा आणि कमीत कमी २ ते तास भिजवायला ठेवा. त्यानंतर तांदूळ आणि मेथीचं पाणी वेगवेगळं करून एका कढईमध्ये मंद आचेवर ५ ते ७ मिनिटांसाठी गरम करा जेणेकरून ते हलक गरम होईल. नंतर हे पाणी थंड करून एका बरणीत भरा आणि १ दिवस तसेच ठेवून द्या.
पोट सुटलंय, शरीर बेढब दिसतं? रोजच्या जेवणात 'हा' छोटा बदल करा, आपोआप स्लिम व्हाल
हेअर टॉनिकचा वापर कसा करावा
केस धुण्यासाठी गरम पाण्याचा वापर करू नका. कोमट पाणी वापरा यामुळे केस चांगला धुवून होतील. एकदा शॅम्पूने केस धुतल्यानंतर हे तांदूळ आणि मेथीचं पाणी केसांना लावा आणि ५ ते १० मिनिटांसाठी केसांवर राहू द्या आणि मसाज करा आणि शॉवर कॅपने केस झाकून ठेवा. १५ ते २० मिनिटं थांबून पुन्हा पाण्याने केस स्वच्छ धुवा.