Join us  

How to Stop Hair Fall : केस पातळ झालेत, वाढ थांबली? दाट, काळ्या केसांसाठी १ उपाय, केस वाढतील भराभर

By ऑनलाइन लोकमत | Published: December 16, 2022 6:20 PM

How to Stop Hair Fall : रात्री मेथीचे दाणे भिजवून ठेवा आणि सकाळी उठल्यानंतर गॅसवर हे पाणी उकळून घ्या

हेअर फॉल कंट्रोल ठेवण्यासाठी (Hair fall Control Tips) आजकाल प्रत्येकजण उपाय शोधत असतो.  पार्लरमध्ये हजारो रूपये खर्च करूनही हवातसा लूक मिळत नाही. केमिकल्सच्या वापरानं केसाचं गळणं वाढतं किंवा केस पांढरे होतात. काही घरगुती उपाय   करून पाहिल्यास कमीत कमी खर्चात तुम्हाला  केसांच्या आरोग्यात बदल दिसू शकतो. मेथीच्या दाण्यांचा वापर स्वयंपाकाची चव वाढवण्यासाठी केला जातो. हेच मेथीचे दाणे केसांसाठी फायदेशीर ठरू शकतात.  (How to stop hair fall and get thick hair with methi dana or fenugreek seeds explains yoga expert)

योगा इंस्टिट्यूटचे डायरेक्टर डॉ, हंसा योगेंद्र यांनी आपल्या एका व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की मेथीच्या दाण्यांमध्ये आयरन आणि प्रोटिन्स मोठ्या प्रमाणात असतात. यामुळे केसांशी निगडीत समस्या दूर होण्यास मदत होते. जसं की हेअर फॉल, डैंड्रफ, कोरडे केसांची समस्या दूर होते. मेथीच्या दाण्यांचा वापर कशा पद्धतीनं केल्यास  जास्तीत जास्त फायदे मिळतात ते पाहूया.

मेथीचा वापर कसा करायचा

1) मूठभर मेथी दाणे रात्रभर पाण्यात भिजत ठेवा. सकाळी रिकाम्या पोटी गाळून हे पाणी प्यावे.  मेथीचे पाणी गाळून स्प्रे बाटलीत भरून ठेवा. सकाळी हेअर स्प्रेप्रमाणे केसांवर लावा. संध्याकाळी केस धुवा.

2) मेथीच्या दाण्यांचा आहारात वेगवेगळ्या प्रकारे समावेश करूनही त्यातील पोषक तत्वांचा फायदा घेता येतो.

3) रात्रभर भिजवलेले मेथी दाणे सॅलेडमध्ये घालता येतात. यासोबत ते सॅलड सॉसमध्येही मिसळता येतात.

4) मेथीचे दाणे पावडरच्या स्वरूपात बारीक करा आणि नंतर आपल्या मसाल्याच्या मिश्रणात घाला. हा मसाला कोणत्याही डिशमध्ये वापरा.

केसावर मेथी लावण्याची योग्य पद्धत

१) रात्री मेथीचे दाणे भिजवून ठेवा आणि सकाळी उठल्यानंतर गॅसवर हे पाणी उकळून घ्या.

२) पाणी उकळल्यानंतर ते थंड करून घ्या आणि मिक्सरमध्ये वाटून घ्या,  वाटल्यानंतर मेथीचे दाणे जास्वंदच्या पानांसह वाटून स्कॅल्पवर लावा आणि ३० मिनिटं तसंच ठेवा.

३) नंतर शॅम्पूने केस स्वच्छ धुवून टाका.

टॅग्स :त्वचेची काळजीकेसांची काळजी