Join us  

कंगवा फिरवताच केस तुटतात? शॅम्पूमध्ये हा पदार्थ मिसळा, एका दिवसात केस होतील शायनी

By ऑनलाइन लोकमत | Published: April 05, 2023 12:37 PM

How to stop hair fall : कंगवा फिरवल्यानंतर बरेच केस कंगव्यात अडकतात तर खाली पडतात. त्यात जर केसांमध्ये गुंता झाला असेल तर गुंता सोडवताना बरेच केस गळतात.

आपले केस लांबसडक, दाट असावेत असं प्रत्येक महिलेला वाटतं. केसांमुळे महिलेच्या सौंदर्यात भर पडते. पण रोजच्या धावपळीत केसांची काळजी घेणं शक्य होतचं असं नाही. रोज केस विंचरताना केस गळतीची समस्या अनेकींना उद्भवते. केस गळणं रोखण्यासाठी वेळीच उपाय केले नाही तर टक्कल पडण्याची शक्यता असते. (How can i stop my hair fall)  कंगवा फिरवल्यानंतर बरेच केस कंगव्यात अडकतात तर खाली पडतात. त्यात जर केसांमध्ये गुंता झाला असेल तर गुंता सोडवताना बरेच केस गळतात. (How to stop hair fall) 

अशावेळी सिरम लावून गुंता सोडवल्यास केस गळणं कमी होतं. शॅम्पू बदलला किंवा केस जास्त कोरडे झाले तरीही गळतात. केस दाट, चांगले राहण्यासाठी शॅम्पू करताना काही घरगुती प्रयोग केल्यास केसांची चांगली वाढ होऊ शकते. घरगुती उपायांचे कोणतेही साईट इफेक्ट्सही नसतात. 

केस गळणं थांबतच नाही? फक्त १ कांदा वापरुन हेअर टॉनिक केसांना लावा; भराभर वाढतील केस 

हा उपाय करण्यासाठी सगळ्यात आधी एका वाटीत १ चमचा साखर घाला, त्यात १ चमचा नारळाचं तेल आणि  तुमच्याघरी उपलब्ध असलेला कोणताही शॅम्पू घाला. हे मिश्रण चांगलं फेटून घ्या. त्यात २ ते ३ चमचे पाणी घाला. फेस येईपर्यंत हे मिश्रण ढवळा आणि या मिश्रणानं केस स्वच्छ धुवा. आठवड्यातून २ वेळा असा महिनाभर हा प्रयोग केल्यास चांगला फरक दिसून येईल. 

केस गळणं थांबवण्यासाठी काय करायचं?

1) केस गळणं थांबवण्यासाठी आठवड्यातून कमीत कमी २ वेळा केसांच्या टाळूची मसाज करा. यामुळे केसांची वाढ भराभर होण्यास मदत होईल.

2) स्ट्रेननर, ड्रायर अशा हिटींग टुल्सचा वापर करू नका. आजकाल केमिकलयुक्त उत्पादनांचा वापर केल्यानं केस गळण्याची समस्या सर्वाधिक तरूणींमध्ये वाढली आहे.

3) केस गळणं नियंत्रित करण्यासाठी कांद्याचा रस देखील प्रभावी आहे. यासाठी फक्त कांदा बारीक करून त्याचा रस काढा. ते केसांच्या मुळांना लावून मसाज करा. साधारण अर्ध्या तासानंतर पाण्याने धुवा. असे केल्याने तुम्हाला आराम मिळेल. 

टॅग्स :केसांची काळजीब्यूटी टिप्स