Join us  

एका आठवड्यात थांबेल केस गळणं; दाट केसांसाठी रामदेव बाबांनी सांगितले ७ उपाय

By ऑनलाइन लोकमत | Published: August 03, 2022 12:07 PM

How to Stop Hair Fall Immediately : योगगुरूंनी जेवणाशी संबंधित गोष्टींकडेही लक्ष देण्यास सांगितले. पौष्टिक आहार, हिरव्या भाज्या, फळे खाण्यास सांगितले. यासोबतच त्यांनी अधिक तळलेले आणि मसालेदार पदार्थांपासून दूर राहण्याचा सल्ला दिला

केस गळणे ही एक समस्या आहे ज्याचा जगातील लाखो लोक दररोज सामना करतात. (Hair Fall Solution) त्यात महिलांपासून पुरुषांपर्यंतचा समावेश आहे. या समस्येपासून मुक्ती मिळवण्यासाठी लोक भरपूर पैसे खर्च करण्यास मागेपुढे पाहत नाहीत. कोणी महागडे शॅम्पू विकत घेतात, कोणी हजारो रुपयांचे उपचार घेतात. इतकं करूनही एकतर केस गळणं पुन्हा-पुन्हा येतं किंवा थांबायचं नाव घेत नाही. विशेषत: महिलांसाठी ही समस्या  त्रासदायक ठरते. अशावेळी कोणाला केसांची ट्रिटमेंट घ्यावी लागते तर कोणाला केस लहान करावे लागतात. (How to stop hair fall) 

केसगळतीमुळे त्रासलेल्या अशा लोकांसाठी बाबा रामदेव यांनी सांगितलेले काही उपाय रामबाण उपाय ठरू शकतात. (Baba ramdev simple ways and tips to prevent hair fall within 7 days) सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे या टिप्स फॉलो करणे खूप सोपे आहे. (hair care tips)

त्यांच्या एका व्हिडीओमध्ये योगगुरूंनी ((Baba Ramdev) खासकरून महिलांना महागडे शॅम्पू आणि कंडिशनर विकत न घेण्याचा सल्ला दिला. याआधी डोक्याला मोहरीचे तेल, खोबरेल तेल किंवा दही कसे लावले जात होते. त्यामुळे केस आजपर्यंत मजबूत राहतात याची आठवण त्यांनी करून दिली. कृत्रिम सुगंधी तेल न वापरण्याचा सल्ला देत त्याला 'विष', 'जहर' असे संबोधले. (How to grow hair fast naturally)

हेअर फॉल कमी करण्याचे उपाय

१) दोन्ही हातांची नखे एकत्र 5 मिनिटे घासण्यास सांगितले.

२) जर हृदयविकार आणि उच्च रक्तदाबाची समस्या नसेल तर 2 ते 5 मिनिटे हेडस्टँड किंवा सर्वांगासन केले जाऊ शकते. हे केसांसाठी उत्तम आहेत.

३) आवळ्याचा रस, पावडर, अमलकी रसायन, च्यवनप्राश यांचे सेवन करावे, असा सल्ला त्यांनी दिला. आवळा केसांसाठी खूप चांगला आहे.

४) दुधीचा रस आणि आवळ्याचा रस नियमित प्यायल्याने आठवडाभरात केस गळती थांबते.

५) केस धुण्याच्या आदल्या रात्री केसांना तेल लावावे.

६)  केस धुण्यासाठी दही किंवा आंबट ताक वापरता येते. त्यांचा वापर केल्याने कोंडा, बुरशी किंवा खाज येण्याची समस्या दूर होते. ताकामध्ये मुलतानी माती, थोडे खोबरेल तेल आणि लिंबाचा रस मिसळा. डोके स्वच्छ करण्यासोबतच केसांना रेशमी बनवते.

७)पौष्टिक आहार, हिरव्या भाज्या, फळे खा.  तळलेले आणि मसालेदार पदार्थांपासून दूर राहा. ज्यांना जास्त राग येतो किंवा चिंता वाटते त्यांचे केसही जास्त गळतात. अशा स्थितीत योगासने करून मन शांत करण्याचा प्रयत्न करा.

टॅग्स :हेल्थ टिप्सआरोग्यकेसांची काळजीब्यूटी टिप्सरामदेव बाबा