Join us  

पावसाळ्यात केस गळणं वाढलंय? फक्त अर्धा कांदा केसांना 'या' पद्धतीने लावा, दाट होतील केस

By ऑनलाइन लोकमत | Published: June 28, 2024 11:23 PM

How To Stop Hair Fall : केस गळणं रोखण्यासाठी तुम्ही स्वंयपाकघरातील वस्तूंचा वापर करू शकता.

सध्याच्या स्थितीत केस गळणं खूप कॉमन झालंय. (Hair Care Control Tips) आजकाल बरेचजण केस गळतीच्या प्रोब्लेममुळे ताण-तणावाखाली येतात.   खाण्यापिण्याची चुकीच पद्धत, केमिकल्सयुक्त उत्पादनं यामुळे केस कमकुवत होता. ज्यामुळे केस गळण्याची समस्या उद्भवत नाही. (How To Stop Hair Fall in Monsoon) केस गळणं रोखण्यासाठी तुम्ही स्वंयपाकघरातील वस्तूंचा वापर करू शकता. ज्यामुळे तुम्हाला केसांच्या समस्या टाळण्यास मदत होईल. कांद्यात सल्फर केसांना दाट आणि बनवते. (Use one Onion Hair Pack For Stop Hair Fall Hair Care Tips)

हेल्थलाईनच्या रिपोर्टनुसार कांद्याचा रस केस गळती थांबवण्यासाठी उत्तम ठरतो याशिवाय केसांना शाईन येते आणि कांद्यामुळे अकाली केस पांढरे होण्याची समस्या टाळता येते. 2002 च्या एका अभ्यासात दिसून आलं की ज्या गटाने कांद्याच्या रसाने केस धुतले त्यांचे केस  दाट होते तुलनेने जे साध्या पाण्याने केस धुतात त्यांच्या केसांची जास्त वाढ झाली नव्हती. कांद्याचा रस  कसा कार्य करतो आणि त्याचे फायदे काय आहेत यााबत संशोधन करणं आवश्यक आहे.  नैसर्गिक उपायााने केस गळती थांबवण्यास मदत होते.

जवळजवळ 74 टक्के सहभागींना जाणवले की 4 आठवड्यांनंतर केसांची थोडीशी वाढ झाली आणि 6 आठवड्यांनंतर सुमारे 87 टक्के लोकांनी केस पुन्हा वाढण्याचा अनुभव घेतला. अभ्यासात पुरुष आणि स्त्रिया दोघांनी भाग घेतला आणि केसांची वाढ पुरुषांमध्ये जास्त होती.

जर्नल ऑफ डर्माटोलॉजीच्या रिपोर्टनुसार एका छोट्याश्या अभ्यासात दिसून आलं की कांद्याचा रस टाळूवर लावल्याने  केस वाढण्यास मदत होते. संशोधकांना असं दिसून वापरल्यानंतर 2 आठवड्यानंतर केसांची वाढ सुरू होते. ज्यामुळे दिवसातून दोनवेळा टाळूला तुम्ही हे लावू शकता. 

कांद्यातील पोषक तत्व

कांद्यात व्हिटामीन बी, सी, ई, फॉलिक एसिड, जिंक, पोटॅशियम आणि एंटी बॅक्टेरियल गुण असतात. ज्यामुळे केस हेल्दी राहण्यास मदत होते. ज्यामुळे स्काल्प आणि बॅक्टेरिया आणि कोंडा दूर होण्यास मदत होते. 

कांद्याचा रस केसांवर कसा वापरावा (How To Use Onion On Hairs)

कांद्याचा रस केसांवर लावण्यासाठी कांदा सोलून याचा रस काढून घ्या. त्यानंतर मिक्सरमध्ये बारीक करून याचा रस गाळून घ्या. नंतर हा रस आपल्या केसांच्या मुळांना लावा. हलक्या हाताने मसाज करा. त्यानंतर  माईल्ड शॅम्पूने केस धुवा.  ज्यामुळे केसांची वाढ चांगली होईल आणि हेअर फॉल  कमी होण्यास मदत होईल.

टॅग्स :ब्यूटी टिप्सत्वचेची काळजी