केसांची समस्या पावसाळ्यात (hairfall in monsoon) खूप जास्त वाढलेली असते. तसेही काही जणींचे केस एरवीही गळतातच. पण पावसाळ्यात त्याचं प्रमाण आणखी जास्त वाढतं. याशिवाय केस कोरडे होऊन केसांना फाटे फुटण्याचा त्रासही अनेकींना असतो. फाटे फुटलेले केस (split hair problem) अजिबातच चांगले दिसत नाहीत. त्यामुळे ते वेळच्यावेळी ट्रिम करावे लागतात. त्यामुळे मग ज्यांना लांब केसांची आवड असते, अशा मुलींना अजिबातच केस आवडीप्रमाणे वाढवता येत नाहीत. हा सगळा त्रास कमी करण्यासाठी हा एक खास आयुर्वेदिक उपचार करून बघा.(use of brahmi for hair)
केसांसाठी ब्राह्मीचा उपयोग
- ब्राम्ही या औषधी वनस्पतीमध्ये कॅल्शिअम, झिंक, पोटॅशिअम, मॅग्नेशिअम, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ई, बायोकेमिकल कम्पाउंड्स असे केसांसाठी उपयुक्त ठरणारे अनेक घटक असतात. या घटकांमुळे केसांचे पोषण होते आणि केस निरोगी, सशक्त होतात. त्यामुळेच केस काेरडे होऊन त्यांना फाटे फुटण्याचं प्रमाणही खूप कमी होतं. व्हॅक्सिंग करण्यापूर्वी आठवणीने करा 6 गोष्टी, त्वचेवर येईल ग्लो आणि त्रासही होणार नाही..
- त्यासोबतच व्हिटॅमिन बी १, बी २ देखील मोठ्या प्रमाणात असते. या सगळ्याच गोष्टी केसांसाठी अतिशय पोषक असल्याने अनेक हेअर प्रोडक्ट्समध्ये ब्राह्मीचा वापर केला जातो.
- ब्राह्मीमध्ये ॲण्टीबॅक्टेरियल आणि ॲण्टीफंगल गुणधर्म असल्याने स्काल्पला असलेले इन्फेक्शन दूर करण्यासाठी उपयोग होतो. यामुळे डोक्यातला कोंडाही कमी होतो. तुमच्या ७ हेअरस्टाइलच ठरतात केस गळण्याचं मोठं कारण! हेअरस्टाइल करताना काय काळजी घ्याल?
- स्काल्पला योग्य ते पोषण मिळाल्याने केसांची वाढही जोमाने होते.
कसा करायचा ब्राह्मी हेअरपॅक?
ब्राह्मी हेअरपॅक करण्यासाठी २ टेबलस्पून मेहंदी पावडर, २ टेबलस्पून ब्राह्मी पावडर आणि २ टेबलस्पून दही घ्या. हे सगळे मिश्रण एका भांड्यात टाकून व्यवस्थित एकत्र करून घ्या. आता हा लेप एखाद्या तासासाठी झाकून ठेवा. त्यानंतर डोक्याच्या त्वचेला तसेच केसांच्या लांबीवर हा लेप लावा. पावसाळ्यात ऑइली त्वचा जास्तच चिपचिपी दिसते, करा ५ छोटे बदल - चेहरा दिसेल फ्रेश त्यावर हेअरकॅप घाला. हेअरकॅप नसेल तर प्लास्टिकची एखादी पिशवी लावली तरी चाले. एखादा तास हा लेप केसांवर राहू द्या. त्यानंतर नेहमीप्रमाणे शाम्पू लावून केस धुवून टाका. हर्बल किंवा आयुर्वेदिक शाम्पूचा वापर केल्यास अधिक चांगले. आठवड्यातून एकदा नियमितपणे हा उपाय करून बघा. केसांचं गळणं कमी होऊन त्यांची वाढ अधिक चांगली होईल.