Lokmat Sakhi >Beauty > १ चमचा चहा पावडरने होतील तुमचे केस दाट! ‘या’ पद्धतीने चहा लावा आणि केस गळणं थांबेल

१ चमचा चहा पावडरने होतील तुमचे केस दाट! ‘या’ पद्धतीने चहा लावा आणि केस गळणं थांबेल

How to stop hair fall using tea powder : सगळ्यात आधी एका पातेल्यात १ ते २  ग्लास पाणी गरम करण्यासाठी ठेवा. त्यात चहा पावडर घाला.

By ऑनलाइन लोकमत | Published: July 31, 2023 12:11 PM2023-07-31T12:11:35+5:302023-07-31T13:30:39+5:30

How to stop hair fall using tea powder : सगळ्यात आधी एका पातेल्यात १ ते २  ग्लास पाणी गरम करण्यासाठी ठेवा. त्यात चहा पावडर घाला.

How to stop hair fall using tea powder : Hairfall Solution How To Stop Hair Fall using tea levaes | १ चमचा चहा पावडरने होतील तुमचे केस दाट! ‘या’ पद्धतीने चहा लावा आणि केस गळणं थांबेल

१ चमचा चहा पावडरने होतील तुमचे केस दाट! ‘या’ पद्धतीने चहा लावा आणि केस गळणं थांबेल

केस गळण्याची (Hair Fall Soulution) समस्या आजकाल सर्वच वयोगटातील लोकांमध्ये उद्भवते. केस गळायला लागले की  आत्मविश्वास कमी होतो. पुन्हा नवीन केस कधी येतील याची चिंता सतावते. दुसरीकडे केसांची वाढ होण्यासाठी बाजारातल्या वेगवेगळ्या उत्पादनांवर आणि पार्लर ट्रिटमेंट्सवर खर्च करणं सुरू असतं. केस गळती कमी करण्यासाठी घरगुती उपाय देखिल फायदेशीर ठरू शकतात.  चहाच्या पानांमध्ये अँटीसेप्टिक, अँटी-इंफ्लेमेटरी आणि अँटीऑक्सिडंट गुणधर्म आढळतात, जे केस निरोगी आणि चमकदार ठेवण्यासाठी काम करू शकतात. (How to stop hair fall using tea powder)

सगळ्यात आधी एका पातेल्यात १ ते २  ग्लास पाणी गरम करण्यासाठी ठेवा. त्यात चहा पावडर घाला. चहा पावडर उकळल्यानंतर त्यात गुलाबाच्या पाकळ्या घाला. झाकण ठेवून १० मिनिटांसाठी उकळू द्या नंतर हे पाणी गाळून एका बाटलीत भरा. हे पाणी केसांच्या मुळांना लावून हलक्या हातानं मसाज करा. १ ते २ तासांनी केस स्वच्छ धुवा. या उपायानं केस गळती थांबेल आणि लांबसडक, दाट केस होतील.  काळ्या चहामध्ये असलेले कॅफिन डीएचटीला ब्लॉक करते परिणामी केस गळणं थांबतं आणि केस पांढरेही होत नाहीत.

१) चहा पावडरमध्ये ४ % नायट्रोजन, ०.२४% फॉस्फरस,   ०.२५ %  पोटॅशिम टक्के असते. (Tea Nutrition value) यातील पोषक तत्व केस गळणं, तुटणं यांसारख्या समस्यांपासून सुटका मिळवून देतात. इतकंच नाही तर चहाच्या पानांचा वापर करून तुम्ही पांढऱ्या केसांना पुन्हा काळे बनवू (Tea for Hair Growth) शकता. चहाच्या पानातील पोषक घटक केसगळती रोखण्यासाठी उपयुक्त ठरतात. विशेषत: आठवड्यातून दोनदा ग्रीन टीच्या पाण्याने केस धुतल्यास केस गळणे, तुटणे आणि केसांना फाटे फुटणे या समस्यांपासून आराम मिळू शकतो.

२) चहा पावडरमध्ये असणारा नैसर्गिक काळा रंग पांढरे केस दूर करण्यासाठी उपयुक्त ठरू शकतो. ज्या लोकांचे अकाली केस पांढरे होतात त्यांना आठवड्यातून 2 ते 3 वेळा चहाच्या पानांचे पाणी वापरण्याचा सल्ला दिला जातो.

३) चहाच्या पानांनी केस धुतल्याने केसांची चमक वाढते. चहाच्या पानात विशेष पोषक घटक आढळतात, ज्यामुळे केसांचा कोरडेपणा  दूर होतो आणि नवीन चमक येते.

Web Title: How to stop hair fall using tea powder : Hairfall Solution How To Stop Hair Fall using tea levaes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.