Lokmat Sakhi >Beauty > केस पातळ झाले-धुताना फार गळतात? एलोवेरात हा पदार्थ मिसळून केसांना लावा, दाट केस होतील

केस पातळ झाले-धुताना फार गळतात? एलोवेरात हा पदार्थ मिसळून केसांना लावा, दाट केस होतील

How to Stop Hair Loss And Regrow Hair Naturally : तुम्ही एलोवेरा जेल थेट केसांनाही लावू शकता. ज्यामुळे केसांची चांगली वाढ होण्यास मदत होईल.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 25, 2024 03:12 PM2024-03-25T15:12:50+5:302024-03-25T16:03:26+5:30

How to Stop Hair Loss And Regrow Hair Naturally : तुम्ही एलोवेरा जेल थेट केसांनाही लावू शकता. ज्यामुळे केसांची चांगली वाढ होण्यास मदत होईल.

How to Stop Hair Loss And Regrow Hair Naturally : Natural Ingredients For Hair Growth And Thickness | केस पातळ झाले-धुताना फार गळतात? एलोवेरात हा पदार्थ मिसळून केसांना लावा, दाट केस होतील

केस पातळ झाले-धुताना फार गळतात? एलोवेरात हा पदार्थ मिसळून केसांना लावा, दाट केस होतील

सध्याच्या स्थितीत केस गळणं (Hair Growth) हे खूपच कॉमन झालंय. केस  गळायला लागले की  कितीही प्रयत्न केले तरी पुन्हा आधीसारखे होत नाहीत. (Skin Care Tips) केस गळण्याची समस्या टाळण्यासाठी तुम्ही काही सोपे उपाय करू शकता. केस गळण्याची समस्या टाळण्यासाठी हेअर केअर उत्पादनं वापरू शकत पण त्यातील केमिकल्समुळे केसांचे प्रचंड नुकसान होते हे टाळण्यासाठी तुम्ही काही सोपे घरगुती उपाय करू शकता. एलोवेरा (Aloe Vera) हा केसांच्या समस्या टाळण्यासाठी एक उत्तम उपाय आहे. ज्यामुळे केस गळती थांबते आणि केसांची वाढही होत नाही.  (Natural Ingredients For Hair Growth And Thickness)

वेबएमडीच्या रिपोर्टनुसार एलोवेरात एक्टिव्ह इंग्रेडिएंट्स आणि मिनरल्स असतात ज्यामुळे केस  स्ट्रेट राहण्यास मदत होते. यात फॅटी एसिड्स, अमायनो एसिड्स आणि व्हिटामीन ए, बी-१२ आणि व्हिटामीन ई असते. ज्यामुळे हेअर फॉलिकल्स  मजबूत होण्यास मदत होते. एलोवेरामुळे फॅट ब्रेकडाऊन होण्यास मदत होते याशिवाय केसांमधील एक्स्ट्रा ऑईलही निघून जाते. अनेक अभ्यासांमधून दिसून आले की की फ्रेशएलोवेरामुळे एल्ट्रावॉयलेट रेजपासून बचाव  होतो. युव्ही एक्सपोजरमुळे हेअर फॉल होण्याची शक्यता असते.

तुम्ही एलोवेरा जेल थेट केसांनाही लावू शकता. ज्यामुळे केसांची चांगली वाढ होण्यास मदत होईल. एलोवेरा ३० मिनिटांसाठी केसांला लावून ठेवा त्यानंतर व्यवस्थित धुवून घ्या.  ज्यामुळे केसांचे आरोग्य चांगले राहण्यास मदत होईल. १ ते २ टेबलस्पून एलोवेरा जेल १ टेबलस्पून लिंबाचा रस आणि पाण्यात मिसळा. त्यानंतर थोड्यावेळासाठी तसंच ठेवा काही वेळानं केस स्वच्छ धुवा. 

केसासाठी एलोवेरा शॅम्पू कसा तयार करायचा?

केस वाढवण्यासाठी तुम्हाला हा सोपा उपाय करायचा असेल तर तुम्ही  फ्रेश एलोवेराची पानं घ्या.  एलोवेरा स्वच्छ धुवून सुरीच्या साहाय्याने कापून घ्या. एका मिक्सरच्या भांड्यात एलोवेराची पानं घाला. मिक्सरमधून फिरवून घेऊन याचा थर काढून घ्या. चहाच्या गाळणीत एलोवेराची पानं घेऊन ते गाळून घ्या.  गर बाजूला ठेवा आणि पाणी वेगळं करून घ्या.

वजनानुसार कोणी किती पाणी प्यावं? पाहा-आयुर्वेदानुसार पाणी पिण्याची योग्य वेळ आणि पद्धत

एका भांड्यात एलोवेराचा गाळलेला रस घेऊन त्यात २ चमचे नारळाचं तेल घाला. अर्धा लिंबू पिळून घाला, शॅम्पू घाला चमच्याने ढवळून  घ्या.  माईल्ड शॅम्पूचा वापर करा. शॅम्पू जास्त स्टाँग नसेल याची काळजी घ्या. या शॅम्पूच्या पाण्याने केस धुवा. ज्यामुळे केसांची वाढ चांगली होईल आणि केस नैसर्गिकरित्या वाढण्यास मदत होईल.

Web Title: How to Stop Hair Loss And Regrow Hair Naturally : Natural Ingredients For Hair Growth And Thickness

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.