Lokmat Sakhi >Beauty > केस खूप पातळ झालेत? टक्कल पडण्याआधी ३ उपाय करा, केस राहतील दाट, लांब

केस खूप पातळ झालेत? टक्कल पडण्याआधी ३ उपाय करा, केस राहतील दाट, लांब

How to Stop Hair Loss :जर केस पातळ असतील तर अशा केसांमध्ये स्ट्रेटनर किंवा ड्रायरसारख्या गरम साधनांचा वापर करणे टाळावे.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 26, 2022 03:21 PM2022-09-26T15:21:43+5:302022-09-26T15:34:06+5:30

How to Stop Hair Loss :जर केस पातळ असतील तर अशा केसांमध्ये स्ट्रेटनर किंवा ड्रायरसारख्या गरम साधनांचा वापर करणे टाळावे.

How to stop Hair Loss : Avoid these things to avoid baldness hair care tips for thin hair | केस खूप पातळ झालेत? टक्कल पडण्याआधी ३ उपाय करा, केस राहतील दाट, लांब

केस खूप पातळ झालेत? टक्कल पडण्याआधी ३ उपाय करा, केस राहतील दाट, लांब

दाट आणि जाड केस सौंदर्य वाढवतात. पण काही लोकांचे केस लहानपणापासूनच पातळ असतात, ते अनुवांशिक कारणांमुळे असू शकतात. जर पालकांपैकी एकाचे केस पातळ असतील तर मुलांसाठी पातळ केस असणे स्वाभाविक आहे. केस जास्त गळू लागले तर डोक्याची टाळू दिसू लागते. (How to stop Hair Loss) केस गळणे ही समस्या वाढू शकते आणि टक्कल पडू शकते. जाणून घेऊया केस गळणे कसे थांबवता येईल. (Avoid these things to avoid baldness hair care tips for thin hair)

जर केस पातळ असतील तर अशा केसांमध्ये स्ट्रेटनर किंवा ड्रायरसारख्या गरम साधनांचा वापर करणे टाळावे. हिटींग टुल्स केसांसाठी चांगले मानले जात नाही आणि त्यामुळे केस कोरडे आणि निर्जीव होऊन गळू लागतात. काही लोक केस सरळ करण्यासाठी किंवा कुरळे करण्यासाठी स्ट्रेटनर किंवा चिमट्यासारख्या गरम गोष्टी वापरतात, अशा गोष्टी केसांपासून दूर ठेवाव्यात.

कंडिशनरचा वापर करू नका

कंडिशनर केसांना सिल्की बनवण्याचे काम करते. केस पातळ असल्यास कंडिशनरचा वापर टाळावा, यामुळे केसांची शाईन निघून जाते आणि केस अधिक पातळ दिसू लागतात. पातळ केस असलेल्या लोकांनी कंडीशनर लावल्यानं केस जास्त खराब दिसू लागतात. अनेक केमिकलयुक्त कंडिशनर केस पातळ करतात.

जेल वापरू नका

जर तुम्ही तुमचे केस स्टाइल करत असाल तर केसांमध्ये जेलसारख्या गोष्टी वापरणे टाळावे. यामुळे केस पातळ दिसू लागतात, जे खराब दिसतात आणि केसांच्या आरोग्यालाही हानी पोहोचवतात.

योग्य हेअर केअर प्रोडक्ट्सची निवड

केमिकल हेअर प्रोडक्ट्स लावल्याने  केस सुंदर दिसतात. पण नंतर केस गळतात. या रसायनांमुळे केस मुळापासून कमकुवत होतात. केसांसाठी उत्पादने खरेदी करताना, हे देखील लक्षात ठेवले पाहिजे की  उत्पादनं आपल्या केसांच्या गरजेनुसार असावेत. कोरड्या केसांसाठी मॉइश्चरायझिंग उत्पादने आणि तेलकट केसांसाठी तेलमुक्त उत्पादने निवडली पाहिजेत.

Web Title: How to stop Hair Loss : Avoid these things to avoid baldness hair care tips for thin hair

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.