Join us  

लहान मुलांचेही केस गळतात? लक्षात ठेवा ६ टिप्स- मुलांच्या केसात कोंडा-केस गळणे थांबेल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 02, 2024 4:59 PM

How to Stop Hair Loss in Children : मोठे झाल्यानंतर टक्कल पडू नये म्हणून, लहानपणीच मुलांच्या केसांची 'अशी' काळजी घ्या..

केस गळती (Hair Fall) ही एक अशी समस्या अनेकांना सतावते (Hair Loss). वाढत्या वयानुसार केसांच्या संमस्याही वाढतात. पण लहानपाणीचं केस गळतीची समस्या निर्माण झाली तर? आपण पाहिलं असेल घरातल्या लहान मुलांचे (Child Care) केस कमी वयातच फार गळू लागतात (Hair Fall). केस गळण्यामागचं कारण काय? (Home remedy)

बरेच पालक लहान मुलांचे केस अशा पद्धतीने बांधतात, ज्यामुळे केसांची मुळे कमकुवत होऊन गळू लागतात. कमी वयात टक्कल पडू लागते. जर लहान वयातच केस गळत असतील तर, बालरोगतज्ज्ञ डॉ.पवन मांडविया यांनी सांगितलेला सल्ला आणि काही टिप्स फॉलो करून पाहा. केस गळती होणार नाही(How to Stop Hair Loss in Children).

मुलांमध्ये केस गळण्याची कारणे

डॉक्टर म्हणतात, बरेच आई त्यांच्या मुलींची वेणी अगदी घट्ट घालतात. असे केल्याने मुलींचे केस फार पातळ होतात आणि मुळे कमकुवत होतात. ज्यामुळे कमी वयात केस गळतात. त्यामुळे मुलांचे केस विंचरण्यापूर्वी तेल लावून मसाज करा. नंतर मोकळी वेणी घाला. घट्ट वेणीमुळे मुलींचे केस लहान वयातच गळायला लागतात.

नवरात्र स्पेशल : येत्या ९ दिवसांत खा ‘या’ ४ पैकी १ पदार्थ! वाढेल फिटनेस-पोटही होईल कमी

या गोष्टींचीही काळजी घ्या

- लहान मुलांच्या केसांवर विविध हेअर स्टाईल ट्राय करू नका. केसांवर जास्त वेळ कंगवा फिरवू नका.

- जास्त रसायने असलेली उत्पादने मुलांच्या केसांवर वापरू नका. मुलांसाठी जितकी कमी उत्पादने वापरली जाऊ शकतात तितके चांगले.

- मुलांचे हेअर स्टाईल करताना मशीन वापरू नका. शक्य तितक्या नैसर्गिकरित्या मुलांचे केस स्टाईल करा.

- लहान मुलांच्या केसांवर हेअर स्प्रे किंवा रसायने असलेल्या सीरमचीही गरज नसते. मुलांचे केस नैसर्गिक पद्धतीने स्टाईल करा.

मूल नापास झालं-अपयशी ठरलं तर? चिडणाऱ्या बाबांना विकास दिव्यकीर्ती सांगतात १ टीप

- आठवड्यातून एकदा केसांना कोमट तेल लावून मसाज करा. यामुळे रक्ताभिसरण सुधारते आणि केस वाढण्यासही मदत होते.

- तसेच लहान मुलांचे केस जास्त कोरडे किंवा जास्त तेलकट होणार नाहीत याची काळजी घ्या. 

टॅग्स :केसांची काळजीब्यूटी टिप्स